Daily Archives: November 28, 2019

जागे व्हा!

म्हादईच्या रक्षणासाठीच्या आंदोलनाची सूत्रे म्हादई बचाव अभियानकडून ‘म्हादई बचाव आंदोलन’ या नव्या संघटनेकडे गेेलेली असल्याने सरकारला हे आंदोलन जड जाईल अशी अटकळ आम्ही यापूर्वीच व्यक्त केलेली होती. ज्या प्रकारे तालुक्या तालुक्यातून सध्या या आंदोलनाचे मोहोळ उठवले जात आहे, ते पाहाता सरकारने या विषयामध्ये अधिक सक्रियता दाखवली नाही, तर येणार्‍या काळामध्ये शैक्षणिक माध्यम आंदोलनाची पुनरावृत्ती म्हादईच्या आंदोलनात घडण्याची शक्यता दिसते आहे. ... Read More »

ब्रिक्स परिषदेतून काय साधले?

शैलेंद्र देवळणकर रशिया, चीन, आणि भारत या तीन देशांना दहशतवादाचा मुख्य प्रश्‍न भेडसावत असला तरीही त्यामध्ये ङ्गरक आहेच. रशियातील चेचेन्यात दहशतवादाचे आव्हान आहे, शिन शिआंग प्रांतातील दहशतवाद हा चीनचा अंतर्गत प्रश्‍न आहे. भारतात इतर देशांतून प्रशिक्षित झालेले दहशतवादी हल्ला करतात. तसा प्रकार चीनमध्ये नाही. त्यामुळे दहशतवादाचा मुद्दा जरी सामायिक असला तरीही तो निर्मूलनासाठी जी बांधिलकी लागते त्याबाबतीत ब्रिक्सच्या व्यासपीठावरून ठोस ... Read More »

३०० कोटींच्या विकासकामांना १५ दिवसांत मान्यता

सार्वजनिक बांधकाम खात्यातील अंदाजे ३०० कोटींच्या रस्ते, पाणी व इतर प्राधान्यक्रमांच्या विकासकामांना येत्या पंधरा दिवसांत वित्तीय मान्यता दिली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना काल दिली. यावेळी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर, मंत्री मायकल लोबो, नीलेश काब्राल, फिलीप नेरी रॉड्रीगीस, मिलिंद नाईक, गोविंद गावडे, दीपक पाऊसकर यांची उपस्थिती होती. सार्वजनिक ... Read More »

इफ्फीनंतर जमावबंदी मागे ः मुख्यमंत्री

>> म्हादई आंदोलन दडपण्यासाठी जमावबंदी ः कॉंग्रेसची टीका राज्यात लागू असलेला जमावबंदीचा आदेश इफ्फीचा समारोप झाल्यानंतर मागे घेतला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या अयोध्या खटल्याच्या निकालाच्या वेळी ७ नोव्हेंबर २०१९ रोजी राज्यात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. अयोध्या खटल्याच्या निकालानंतर जमावबंदीचा आदेश मागे घेण्यात आलेला नसल्याने विरोधी पक्षांकडून नाराजी व्यक्त ... Read More »

…तोपर्यंत केंद्रीय नेत्यांना गोवा बंदी

>> म्हादईप्रश्‍नी डिचोलीत नागेश करमली यांचा इशारा कर्नाटकने बेकायदा धरण प्रकल्प उभारत गोव्याची जीवनदायिनी म्हादईचा गळा घोटला आहे. मात्र राजकीय स्वार्थासाठी गोवा व केंद्राने हे कारस्थान आखले असून जोपर्यंत गोव्याचे हित केंद्र सरकार जपत नाही तोपर्यंत केंद्रातील एकाही मंत्र्याला गोव्यात पाऊल टाकू दिले जाणार नाही असा इशारा ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली यांनी डिचोली येथे दिला. सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत म्हादई बचावसाठी ... Read More »

पाणी पिण्यासाठी शाळेत आता खास ‘दो’ मिनट

राज्यातील शालेय मुलांना पाणी पिण्यासाठी खास दोन मिनिटांचा वेळ उपलब्ध करून दिला जाणार आहे. यासंबंधीचे एक परिपत्रक शिक्षण खात्याने २६ नोव्हेंबर २०१९ रोजी जारी केले आहे. राज्यातील सरकारी, अनुदानित, विना अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि विशेष मुलांच्या विद्यालयांना या आदेशाचे पालन करण्याची सूचना करण्यात आली आहे. शाळेत मुले योग्य प्रमाणात पाणी पीत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अनेक मुलांना ... Read More »

नॉर्थईस्ट युनायटेड-मुंबई सिटी लढत बरोबरीत

हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) बुधवारी नॉर्थईस्ट युनायटेड एफसी आणि मुंबई सिटी एफसी यांच्यातील रंगतदार लढतीत २-२ अशी बरोबरी झाली. इंदिरा गांधी ऍथलेटीक स्टेडियमवरील लढतीत सर्व गोल पूर्वार्धात झाले. नॉर्थइस्टने नवव्याच मिनिटाला आघाडी घेतली होती. ग्रीसच्या २७ वर्षांच्या पॅनागिओटीस ट्रीयाडीसने हा गोल केला होता. ट्युनिशीच्या ३१ वर्षीय अमीने चेर्मिटी याने नऊ मिनिटांत दोन गोल करीत मुंबईला आघाडी मिळवून दिली. घानाच्या ... Read More »

पीव्हीसी पर्रा, बिदेश इलेव्हनचे विजय

>> जीएफए-वेदान्ता महिला फुटबॉल लीग पीव्हीसी पर्रा आणि बिदेश इलेव्हन स्पोर्ट्‌स क्लबने शानदार विजय नोंदवित गोवा फुटबॉल संघटना आयोजित ३र्‍या जीएफए-वेदान्ता महिला फुटबॉल लीग स्पर्धेत काल पूर्ण गुणांची कमाई केली. सिरसई मैदानावर झालेल्या सामन्यात पीव्हीसी पर्रा संघाने चर्चिल ब्रदर्स क्लबवर २-१ अशी मात केली. तर अस्नोडा मैदानावरील लढतीत बिदेश इलेव्हनने आल्बर्ट डेव्हलपर्स संघावर १-० अशी निसटती मात केली. ट्रेसी पिंटोच्या ... Read More »