Daily Archives: November 27, 2019

तीन पायांची शर्यत

बहुमताचे आकडे जुळवण्याच्या सगळ्या शक्यता मोडून पडल्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन अखेर देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना – राष्ट्रवादी कॉंग्रेस – कॉंग्रेस यांच्या महाराष्ट्र विकास आघाडीला काल मैदान मोकळे केले. सर्वोच्च न्यायालयाने विश्वासदर्शक ठरावाची मुदत तीस तासांवर आणून संभाव्य घोडेबाजाराला लावलेला चाप आणि ज्यांच्या भरवशावर हा सारा खेळ भाजपने मांडला होता, त्या अजित पवारांची घरवापसी यामुळे सर्वस्वी नाईलाज आणि निरुपाय झाल्यानेच ... Read More »

कसे रोखणार हे अत्याचार?

ऍड. प्रदीप उमप बाल लैंगिक अत्याचाराविषयी सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्य सरकारे आणि केंद्र सरकार यांना अधिक सक्रीय राहाण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मुलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना पाहता सर्वोच्च न्यायालयाने स्वतःच पुढाकार घेऊन याविषयीची सुनावणी सुरू केली. न्यायालयाने घेतलेल्या पुढाकाराचे कायद्यात रूपांतर होऊन त्वरेने त्याची अंमलबजावणी कशी होईल, याचा विचार कऱणे महत्वाचे आहे. बाल लैंगिक शोषण आणि बलात्कार ही प्रकरणे निकालात काढण्याच्या ... Read More »

उद्धव ठाकरे होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

>> १ रोजी घेणार शपथ; फडणवीस, अजित पवारांचा राजीनामा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे आगामी मुख्यमंत्री होणार आहेत. महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांनी आगामी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची एकमताने निवड केली. येत्या १ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता शिवतीर्थावर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. काल मंगळवारी सायंकाळी हॉटेल ट्रायडंट येथे शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांची एक बैठक झाली. ... Read More »

प्रसंगी सरकार उलथवून टाकावे लागेल ः वेलिंगकर

>> पेडण्यात म्हादई बचाव आंदोलन म्हादई ही जीवनदायिनी आहे तिच्या रक्षणासाठी आता प्रत्येक गोमंतकीयाने जागृत राहून आंदोलनाच्या उपक्रमात सहभागी व्हायला हवे. वेळप्रसंगी हे सरकार उखडून टाकावे लागेल. आता पाच वर्षांसाठी थांबण्याची गरज नाही दरदिवशी जागृत होऊन राजकर्त्याना धडा शिकवावा लागेल, अन्यथा पुढील पिढी आम्हाला माफ करणार नाही. आमची म्हादई आम्हाला वाचवायला हवी असे प्रतिपादन गोवा सुरक्षा मंचाचे सुभाष वेलिंगकर यांनी ... Read More »

म्हादईप्रश्‍नी गोवा फॉरवर्डच्या याचिकेने सरकारला समस्या

>> मुख्यमंत्र्यांचा दावा गोवा फॉरवर्डने राष्ट्रीय हरित लवादासमोर (एनजीटी) खास याचिका दाखल म्हादई प्रकरणात आम्हांला त्रासात टाकले आहे. एनजीटीने गोवा फॉरवर्डची याचिका फेटाळली आहेे, असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल केला. म्हादई प्रश्‍नी कुठलीही तडजोड केली जाणार नाही. आपला केंद्र सरकार आणि केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावर पूर्ण विश्वास असून गोव्याला निश्‍चितपणे न्याय मिळणार आहे. नागरिकांनी ... Read More »

कुठ्ठाळी येथे महिन्याभरात पर्यायी मार्ग ः मुख्यमंत्री

कुठ्ठाळी येथे राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. रेल्वे मार्गाच्या बाजूने पर्यायी रस्ता तयार करण्यासाठी मान्यता मिळाली असून येत्या महिनाभरात रेल्वे मार्गाच्या बाजूने पर्यायी रस्ता तयार करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. कुठ्ठाळी येथे महामार्गावरून वाहतूक सुरू असताना नवीन रस्त्याचे काम करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. ... Read More »

रेफ्रीच्या दुर्लक्षाचा गोव्याला फटका

>> अपराजित घोडदौड खंडित >> कॅस्टेलच्या गोलमुळे जमशेदपूर विजयी रेफ्रीच्या दुर्लक्षाचा काल गोव्याला घरच्या मैदानावर जोरदार फटका बसला. त्यांची यंदाच्या हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) सहाव्या मोसमात अपराजित मालिका घरच्या मैदानावर संपुष्टात आली. मंगळवारी जमशेदपूर एफसीने गोव्याला नेहरू स्टेडियमवर एकमेव गोलने हरविले. स्पेनचा २४ वर्षीय स्ट्रायकर सर्जिओ कॅस्टेल याने पूर्वार्धात केलेला गोल निर्णायक ठरला. पंरतु पहिल्या सत्राच्या अंतिम क्षणात गोव्याने ... Read More »

मुंबई सिटीविरुद्ध आज नॉर्थईस्टची लढत

हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) बुधवारी येथील इंदिरा गांधी ऍथलेटीक स्टेडियमवर मुंबई सिटीविरुद्ध नॉर्थईस्ट युनायटेडची लढत होत आहे. गुणतक्त्यात वरच्या भागात असलेले स्थान भक्कम करण्याचा नॉर्थइस्टचा प्रयत्न असेल. नॉर्थईस्टने आपल्या मोसमाला धडाक्यात सुरुवात केली. अद्याप अपराजित असलेल्या तीन संघांमध्ये त्यांचा समावेश आहे. प्रशिक्षक रॉबर्ट जार्नी यांचा खेळाडूंच्या साथीत छान समन्वय जुळून आल्याचे दिसते. या क्लबने चार सामन्यांतून आठ गुण मिळविल्यामुळे ... Read More »