Daily Archives: November 26, 2019

सत्तानाट्याचा दुसरा अंक

महाराष्ट्रातील सत्तानाट्याचा दुसरा अंक काल रंगला. एकीकडे सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्यपालांच्या निर्णयासंदर्भात जोरदार युक्तिवाद करताना अजित पवार यांनी गेल्या २२ नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या राज्यपालांना सादर केलेल्या पत्राच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित केले गेले, तर दुसरीकडे शिवसेना – राष्ट्रवादी कॉंग्रेस – कॉंग्रेस व काही अपक्षांच्या महाविकासआघाडीने आपल्यापाशी १६२ आमदारांचे बहुमत असल्याचे सांगणारे पत्र काल राज्यपालांना सादर केले. एकूण घटनाक्रम पाहिला तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बहुतेक ... Read More »

फेक न्यूज ः एक घातक प्रवृत्ती

देवेश कु. कडकडे (डिचोली) मुद्दे संपले की काही लोक गुद्द्यांवर येतात तर काही जण फेक न्यूजचा आधार घेतात. यावर आता समाजानेच संयम दाखवून त्यांना जशास तसे उत्तर देण्याचे सामर्थ्य दाखवले आणि एकजुटीने या खोटारड्यांचा बुरखा फाडला, तर परत यांची हिंमत होणार नाही आणि नक्कीच वठणीवर येतील. महाभारत युद्धात श्रीकृष्णाने ‘अश्‍वत्थामा मेला’ अशी खोटी बातमी पसरवून द्रोणाचार्यांच्या हत्येचा मार्ग सुकर केला. ... Read More »

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे शक्तिप्रदर्शन

>> १६२ आमदारांची परेड, सत्ता स्थापनेचा दावा राष्ट्रवादीचे बंडखोर नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर भाजपकडून दगाफटका होण्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने १६२ आमदारांचे जोरदार शक्तीप्रर्दशन केले. हॉटेल ग्रँड हयातमध्ये तिन्ही पक्षांच्या १६२ आमदारांची परेड करण्यात आली. ही परेड हा राज्यपालांवर दबाव आणण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी यावेळी प्रस्तावना केली. राष्ट्रवादीचे आमदार ... Read More »

म्हादई प्रश्‍न १५ दिवसांत सोडवा

>> म्हापशातील जनजागृती मोहिमेत मागणी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर हे राज्य सरकारला खोटी आश्‍वासने देतात आणि हे सरकार त्याला बळी पडत आहे. २०१२ पासून राज्य सरकारने खोटारडेपणाच करून जनतेला रस्त्यावर येण्यासाठी भाग पाडले आहे. म्हादई प्रश्‍न येत्या १५ दिवसांत सुटला नाही तर गोव्यातील विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि लोक रस्त्यावर येणार असल्याचा इशारा सुभाष वेलिंगकर यांनी दिला. म्हापसा येथील हुतात्मा चौकात ... Read More »

म्हादईप्रश्‍नी आज पेडण्यात मोहीम

पेेडण्यात आज दि. २६ रोजी म्हादई बचावासाठी जनजागृती मोहीम हाती घेण्यात येणार आहे. सायंकाळी ४ वाजता पेडणे उपजिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात येईल. या जनजागृती मोहिमेत सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन पेडणे येथे घेण्यात आलेल्या म्हादई बचाव आंदोलन समितीने पत्रकार परिषदेत केले. यावेळी आपचे प्रसाद शहापूरकर, गोवा सुरक्षा मंचाचे विनायक च्यारी, शरद गावडे, भारत माता की जयचे गजानन ... Read More »

डिचोलीत उद्या धरणे

डिचोली येथील कॅफे ममता येथे आयोजित पत्रकार परिषदेत उद्या बुधवारी डिचोलीत सायंकाळी ४ वा. म्हादई प्रश्‍नावर धरणे व जागृती कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. यावेळी अमृत सिंग, आपचे प्रदीप घाडी आमोणकर, श्रीकृष्ण धोंड, भोला गाड, सुरेश परवार, शैलेश फातर्पेकर, स्वयं कामत, नारायण बेतकीकर उपस्थित होते. Read More »

म्हादईप्रश्‍नी कॉंग्रेसकडून ‘डिजिटल जनजागृती’

>> रोज एक पोस्टर प्रकाशित करणार गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीच्या म्हादई जागोर आंदोलनाला अधिक चालना देण्याचा भाग म्हणून डिजिटल जनजागृती मोहीम कालपासून सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती गोवा प्रदेश कॉंग्रेस समिती प्रवक्ते उर्ङ्गान मुल्ला यांनी काल दिली. केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाने कर्नाटकाच्या कळसा भांडुरा प्रकल्पाला दिलेला पर्यावरण दाखला रद्द करावा यासाठी आंदोलन प्रखर करण्याच्या दिशेने उचलण्यात आलेले आणखीन ... Read More »

जानेवारीपासून केंद्रीय मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी ः गुदिन्हो

राज्यात नवीन केंद्रीय मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी जानेवारी २०२० पासून केली जाणार आहे. वाहतूक नियमभंग प्रकरणी वाहन चालकांवर दंडात्मक कारवाईसाठी गुजरात मॉडेलचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. दारूच्या नशेत वाहन चालविणे, विनापरवाना वाहन चालविणे आदी वाहतूक नियम भंगाच्या दंडात कोणतीही कपात केली जाणार नाही. तर, वाहतूक नियम भंगाच्या काही ... Read More »

बांडोळी-धारबांदोड्यात चुलत भावाचा खून

दारूच्या नशेत झालेल्या बाचाबाचीनंतर आपल्याच चुलतभावाला विस्तव पेटवण्यासाठी वापरल्या जाणारी फुंकणी डोक्यावर वार करून खून केला. धारबंदोडा तालुक्यातील बांडोळी गावाच्या मैसाळ येथील क्रशरवर हा प्रकार रविवारी मध्यरात्री घडला. यात दिलीप पीयूष केरकेटा (२४) याचा मृत्यू झाला असून हा खून संशयित अजितकुमार केरकेटा (३०) याने केला. या घटनेनंतर अजितकुमार हा मैसाळ येथील घनदाट जंगलात लापूल बसला होता पण हे प्रकरण उघडकिला ... Read More »

अपराजित गोव्याची आज जमशेदपूरशी लढत

हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसलएल) आज मंगळवारी फातोर्डाच्या पं. नेहरू स्टेडियमवर एफसी गोवा आणि जमशेदपूर एफसी यांच्यात लढत होईल. गोव्याचे दोन खेळाडू निलंबित आहेत. आघाडीवरील संघांच्या आसपास राहण्यासाठी गोव्याला विजय अनिवार्य आहे. गोवा आतापर्यंत अपराजित आहे. त्यांनी चार सामन्यांतून आठ गुण मिळविले आहेत. जिंकल्यास ते आघाडी घेऊ शकतील. प्रशिक्षक सजिर्र्ओ लॉबेरा यांना मात्र चिंता असेल, याचे कारण गोवा अद्याप सलग ... Read More »