Daily Archives: November 25, 2019

पर्रीकरांच्या समाधीसाठी ८.५९ कोटींची निविदा जारी

गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाने मिरामार पणजी येथे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे स्मृती स्थळ बांधण्यासाठी ८ कोटी ५९ लाख ७९ हजार ७०४ रूपयांची निविदा जारी केली आहे. मिरामार येथे गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या समाधीस्थळाजवळ दिवंगत मुख्यमंत्री पर्रीकर यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले होते. सरकारने त्याच ठिकाणी पर्रीकर यांचे आकर्षक स्मृती स्थळ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या स्मृती ... Read More »

गुलाबी कसोटीत टीम इंडियाचा डावाने विजय

>> मालिकेत २-० असे निर्भेळ यश >> वेगवान त्रिकुटाचा प्रभावी मारा ईडन गार्डनवरील ऐतिहासिक गुलाबी कसोटीत काल रविवारी भारताने बांगलादेशचा एक डाव आणि ४६ धावांनी पराभव केला. तिसर्‍या दिवशी केवळ ८.४ षटकांत व ५० मिनिटांच्या खेळात भारताने बांगलादेशच्या दुसर्‍या डावातील उर्वरित तीन बळी घेतले. शनिवारी जखमी झालेला महमदुल्लाह फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला नाही. कालच्या विजयासह भारताने २ कसोटींची मालिका २-० ... Read More »

ओडिशा एफसी-एटीके यांच्यात गोलशून्य बरोबरी

इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) रविवारी ओडिशा एफसीने नव्या होमग्राऊंडवर आघाडीवरील एटीकेला गोलशून्य बरोबरीत रोखले. येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील लढतीत दोन्ही संघांना दमदार चाली रचता आल्या नाहीत. बरोबरीच्या एका गुणासह एटीकेची आघाडी मात्र वाढली. एटीकेची पाच सामन्यांत पहिलीच बरोबरी झाली असून तीन विजय व एक पराभव अशी त्यांची कामगिरी आहे. त्यांनी दहा गुणांसह निर्विवाद आघाडी घेतली. बंगळुरू एफसी ५ सामन्यांतून ... Read More »

‘पनामा पेपर्स’च्या गौप्यस्फोटामागचे नाट्य

एडिटर्स चॉइस – परेश प्रभू साडे अकरा लाख गोपनीय कागदपत्रांचा अभ्यास करून २.६ टेर्राबाईट संगणकीय डेटा पडताळून जगभरातील ७६ देशांतील शंभरहून अधिक प्रतिष्ठित वृत्तसमूहाच्या साडे तीनशे पत्रकारांनी तब्बल नऊ महिने खपून ‘पनामा पेपर्स’चा गौप्यस्फोट केला आणि जगभरातील बड्या धेंडांनी विदेशात दडवलेल्या पैशाचे बिंग फुटले. भारतात ही आघाडी लढवली ‘इंडियन एक्स्प्रेस’ने. या गौप्यस्फोटामागील सारे नाट्य सांगणारे हे पुस्तक आहे… जगभरातील शोधपत्रकारांची ... Read More »

हसवणूक

 दत्ताराम प्रभू-साळगावकर मोठमोठ्यानं व खळखळून हसलं तर म्हणे आपल्या शरीरातील गात्रं प्रफुल्लित होतात. देवानं दिलेला जन्म रडण्या-कुढण्यासाठी नाही, हसण्यासाठीच आहे! ‘येतो तो क्षण अमृताचा,’ असं म्हणूनच जगावं व म्हणावं- ‘हसण्यासाठी जन्म आपुला!’   ईश्‍वरानं माणसाला, जी अन्य कुठल्याही सजीवाला दिलेली नाही, अशी हसण्याची उत्तम देणगी दिलेली आहे. विनोद घडला, ऐकला तर आपण दिलखुलास हसतो. मजा वाटली, चांगली गोष्ट घडली, समाधान ... Read More »

जादा प्राप्तीकर भरला गेल्यास…

 शशांक मो. गुळगुळे रिफंड अजूनपर्यंत परत न मिळण्यासाठी अनेक कारणे असू शकतात. पण त्यातले बहुतेकांच्या बाबतीत प्रमुख कारण असते ते म्हणजे, आयकर रिटर्न फाईल करण्यासाठीच्या आयटीआर फॉर्ममध्ये नमूद केलेला चुकीचा खाते क्रमांक! आर्थिक वर्ष २०१८-१९ आणि ऍसेसमेन्ट वर्ष २०१९-२० चा प्राप्तीकर रिटर्न तुम्ही मुदतीपूर्वी म्हणजे ३१ जुलै पूर्वी फाईल केला असेल व तुम्ही जर प्राप्तीकर जास्त भरला असेल तर आतापर्यंत ... Read More »

म्हादईच्या गळ्यावर कर्नाटकचं भूत!

 प्रमोद ठाकूर म्हादईच्या रक्षणासाठी राज्य सरकार अपयशी ठरत असल्याने जनतेने पुढे येण्याची नितांत गरज आहे. कर्नाटक सरकारने कळसा, भांडुरा, हलतरा येथे नदीचे पाणी वळविण्यासाठी आवश्यक वन परवाना मिळविण्यासाठी प्रयत्न चालविला आहे. गोमंतकीयांनी वेळीच जागरूक होऊन लढा न दिल्यास एके दिवशी म्हादईचा गळा निश्‍चितपणे घोटला जाण्याची शक्यता आहे. म्हादई ही गोव्याची जीवनदायिनी असल्याचा राजकीय नेत्यांकडून उल्लेख नेहमीच केला जातो. तथापि, म्हादईच्या ... Read More »