Daily Archives: November 23, 2019

शेवटचा शिलेदार

मराठी वृत्तपत्रसृष्टीतील मालक – संपादक परंपरेचे शेवटचे अध्वर्यू म्हणता येईल असे पत्रपंडित नीळकंठ खाडिलकर यांचे काल निधन झाले. ‘अग्रलेखांचा बादशहा’ अशी स्वतःची ओळख निर्माण केलेल्या खाडिलकरांचा ‘नवाकाळ’ आजही मुंबईत भांडवलदारी वर्तमानपत्रांच्या गळेकापू स्पर्धेमध्ये जिद्दीने तग धरून आहे आणि त्यांच्या कन्या त्यांच्यामागून ती लढाई लढत आल्या आहेत. कोणत्याही वर्तमानपत्राची खरी ताकद ही त्याच्या खपापेक्षा त्याच्या वाचकांवरील प्रभावावरून मोजली जात असते. खप ... Read More »

जम्मू काश्मीरचा बदलता ताळेबंद

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) जम्मू-काश्मीरच्या पुनरर्चनेसाठी काढण्यात आलेल्या दुसर्‍या राष्ट्रपती अध्यादेश २०१९ मुळे काश्मीरच्या मस्तकावर मागील ७० वर्षं भळभळत असलेल्या कलम ३७० व ३५ अ च्या जखमेवर मलम लावले गेले आणि काश्मीर खोर्‍यात हिंदू-मुस्लिम सहजीवनाचा मार्ग मोकळा झाला. आजतागायत आंतरराष्ट्रीय दबाव आणि विकृत इतिहासाच्या माध्यमातून जम्मू-काश्मीरमधील नागरिकांच्या मूलभूत हक्कांची होत असलेली गळचेपी आता यापुढे बंद होईल. १९४७ मधील फाळणीच्या वेळी ... Read More »

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे

>> शरद पवार यांची माहिती, तिन्ही पक्षांची बैठकीत मान्यता महाराष्ट्रातील सत्तापेच सुटण्याच्या मार्गावर असून मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी महाआघाडीची सहमती झाली आहे. त्यामुळे आज शनिवारी संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये तशी घोषणा करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगतले. यामुळे राज्यातील राष्ट्रफती राजवट लवकरच उठणार असून राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार येणार असल्याचे संकेत मिळत ... Read More »

पत्रादेवीत स्थानिकांनी महामार्ग रोखला

>> रस्त्यावरील खड्‌ड्यांमुळे नागरिकांत नाराजी सक्राळ धुसकी (पत्रादेवी) येथील नागरिकांनी काल शुक्रवारी रस्त्याबाबत संताप व्यक्त करत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुमारे एक तास रोखून धरली. पेडणे तालुक्यातील पत्रादेवी ते धारगळ महाखाजन या राष्ट्रीय महामार्ग ६६ चे नव्याने रुंदीकरण करण्याचे काम जोरात चालू आहे. मात्र ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे या रस्त्यावरील खड्‌ड्यात पडून अपघातात नऊ जणांचे बळी गेले. त्या ठेकेदारांविरुद्ध गुन्हा नोंद करावा अशी ... Read More »

जहाजातील नाफ्ता काढण्यासाठी ‘त्या’ कंपनीला आदेश : मुख्यमंत्री

दोनापावल येथे समुद्रात रुतलेल्या नलिनी नाफ्तावाहू जहाजातील नाफ्ता काढण्याचा कामाचा आदेश हॉलण्ड येथील मास्टर मरिना या कंपनीला काल देण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली. मास्टर मरिना कंपनीला येत्या ३० दिवसात नाफ्ता बाहेर काढून रुतलेले जहाज बाहेर काढण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्यात अरबी समुद्रातील वादळामुळे मुरगाव बंदरात नांगरून ठेवलेले नाफ्तावाहू जहाज भरकटत दोनापावल ... Read More »

समुद्र किनार्‍यावरील रेव्ह पार्ट्यांवर सरकारचे नियंत्रण नाही ः पालयेकर

राज्यातील समुद्रकिनारी भागात रेव्ह पार्टी आणि अमलीपदार्थ पार्टीचा सुळसुळाट झाला आहे. सरकारी यंत्रणेचे या पार्ट्यांवर कोणतेही नियंत्रण नाही. शिवोली मतदारसंघात पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक हे ड्रग्स माफियासोबत फिरताना दिसत आहेत, असा आरोप शिवोलीचे आमदार तथा माजी मंत्री विनोद पालयेकर यांनी गोवा फॉरवर्डच्या मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल केला. राज्यातील किनारी भागातील रेव्ह पार्टी आणि अमलीपदार्थ पार्टीवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. ... Read More »

मुख्यमंत्र्यांकडून आरोपांचे खंडन

शिवोलीचे आमदार तथा माजी मंत्री विनोद पालयेकर यांचे अमलीपदार्थ प्रकरणावरून आरोप करण्यामागे वेगळे नाटक असू शकते, अशा शब्दात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्यावरील निष्क्रियतेच्या आरोपाचे खंडन केले आहे. शिवोलीचे आमदार पालयेकर यांनी राज्यातील अमलीपदार्थ व्यवहाराबाबत केलेला आरोप निराधार आहे. गेल्या आठ महिन्यांत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अमलीपदार्थ विक्रीच्या अनेक प्रकरणाची नोंद केली आहे. एका व्यक्तीकडून तीन कोटी रुपयांचे अमलीपदार्थ हस्तगत ... Read More »

गोवा नागरी सेवेतील १९ अधिकार्‍यांच्या बदल्या

गोवा नागरी सेवेतील १९ अधिकार्‍यांच्या बदलीचा आदेश काल जारी करण्यात आला आहे. या अधिकार्‍यांच्या बदलीचा आदेश पर्सनल खात्याचे अवर सचिव शशांक ठाकूर यांनी जारी केला आहे. कबिर शिरगावकर यांची उच्च शिक्षण संचालनालयात उपसंचालक (विकास) आणि उत्तर विभाग कोमुनिदादच्या प्रशासकपदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे. उदय प्रभुदेसाई यांची सांगेचे उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कुडचडे- काकोडा नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि रवींद्र ... Read More »

खनिजवाहू ट्रकांना रस्ता कर माफ ः मुख्यमंत्री

राज्यातील खनिजवाहू टिप्पर ट्रक मालकांना आर्थिक वर्ष २०१६-२०१७ मधील सुमारे ७.२२ कोटी रुपयांचा रस्ता कर माफ करण्यास राज्य मंत्रिमंडळाने सर्क्युलेशन पद्धतीने काल मान्यता दिली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली. खनिजवाहू टिप्पर ट्रक मालकांना एका वर्षाचा रस्ता कर माफ करण्याच्या निर्णयाने सरकारी तिजोरीला ७ कोटी २२ लाख ३७ हजार ६०० रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. ... Read More »

‘गुलाबी’ कसोटीवर भारताची पकड

>> बांगलादेशचा १०६ धावांत खुर्दा; इशांतचे पाच बळी गुलाबी चेंडूने खेळविण्यात येत असलेल्या भारताच्या पहिल्यावहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने मजबूत स्थिती गाठली आहे. बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या १०६ धावांत संपवून टीम इंडियाने दिवसअखेर ३ बाद १७४ धावा करत ६८ धावांची आघाडी घेतली आहे. भारताचे अजून सात गडी शिल्लक असून किमान २५० धावांच्या आघाडीचे विराटसेनेचे लक्ष्य असेल. विराट पाच ... Read More »