Daily Archives: November 22, 2019

राजकीय कालापव्यय

म्हादईच्या बाबतीत केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने गोव्यावर केलेल्या अन्यायाचे तीव्र पडसाद ‘इफ्फी’च्या उद्घाटन सोहळ्यावेळी उमटले. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याविरुद्ध तेथे जोरदार घोषणाबाजीही झाली. म्हादईच्या विषयावर गोमंतकीय शांत, सुशेगाद नाहीत, तर जागृत आहेत आणि त्यांना गृहित धरता येणार नाही, हा संदेश जावडेकर महोदयांच्या कानीकपाळी जाण्याची आवश्यकता होती आणि त्यामुळे ज्यांनी हा संदेश आंदोलनाद्वारे त्यांच्या कानी पोहोचवला त्यांच्याविरुद्ध कोणतेही गुन्हे ... Read More »

चित्तरकथा मधुबाला, साबू आणि अमिताभची!

शंभू भाऊ बांदेकर दोन-तीन हॉलिवूड चित्रपटांत भूमिका केल्या किंवा तीन-चार नाटकांतून प्रसिद्धी मिळाली की, आकाशाला हात टेकले अशा भावनेने झपाटलेल्या आपल्या कलाकारांपुढे मधुबाला, साबू दस्तगीर आणि अमिताभ बच्चन यांचा आदर्श असला तर तेही आकाशाला गवसणी घालू शकतील. गोव्यात संपन्न होत असलेल्या ‘इफ्फी’च्या निमित्ताने यावर विचार व्हावा.. गोव्यात संपन्न होत असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सुवर्ण महोत्सवी उद्घाटन सोहळ्यात ‘बिग बी’ ... Read More »

म्हादई बचाव आंदोलनातर्फे २५ पासून म्हादईवर जागृती

म्हादई बचाव आंदोलनातर्फे येत्या २५ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर २०१९ दरम्यान तालुका पातळीवर म्हादई जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे, असे म्हादई बचाव आंदोलनाचे समन्वयक सुभाष वेलिंगकर यांनी पत्रकार परिषदेत काल दिली. यावेळी म्हादई आंदोलनाचे संयोजक अरविंद भाटीकर, समन्वयक एल्वीस गोम्स यांची उपस्थिती होती. म्हादई आंदोलनाने रस्त्यावर उतरण्याची तयारी चालविली आहे. तालुका पातळीवर निदर्शने, धरणे आंदोलन करून जनजागृती केली जात आहे. ... Read More »

महाराष्ट्रात सत्तास्थापनेवर झाले कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकमत

>> आज मुंबईत शिवसेनेबरोबर महत्त्वाची बैठक कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या बैठकांमधून महाराष्ट्रात सरकार स्थापनेविषयी एकमत झाले आहे. या दोन्ही पक्षांचे नेते आज मुंबईत शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात दिल्लीत झालेल्या बैठकीतील सर्व माहिती शिवसेनेला दिल्यानंतर मुंबईत सरकार स्थापनेचा फॉर्म्युला व अन्य विषयांबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण ... Read More »

सरकारी खात्यांमधील घोटाळे रोखण्यात कॅगची भूमिका महत्वाची

>> मोदी ः नवी साधने विकसित करावी सरकारी खात्यांमधील भ्रष्टाचारावर नियंत्रण आणण्यासाठी तांत्रिक साधने विकसित करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल महालेखापाल (कॅग) परिषदेवेळी बोलताना केले. भारताला पाच ट्रिलियन अमेरिकी डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठण्यासाठी ही कृती सहायक ठरू शकेल, असे ते म्हणाले. सरकारी खात्यांमधील संभाव्य घोटाळे नियंत्रणाखाली आणण्यासाठी कॅगने नवनव्या पद्धती विकसित कराव्या असे मोदी म्हणाले. प्रशासनातील कौशल्य विकासासाठी ... Read More »

पर्यावरणीय मंजुरी पत्र स्थगित ठेवावे

>> कॉंग्रेसची मागणी ः गोव्यातील जमावबंदी आदेश मागे घ्यावा केंद्रीय पर्यावरण, वन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कर्नाटकला कळसा भांडुराबाबत दिलेले पर्यावरण पत्र स्थगित ठेवावे आणि गोवा सरकारने राज्यात लागू केलेले जमावबंदीचा आदेश त्वरीत मागे घ्यावा, अशा मागण्या विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी कॉंग्रेस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल केल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या अयोध्या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर देशभर जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला ... Read More »

अटकेतून सुटलेल्या पदाधिकार्‍यांचे कॉंग्रेसकडून जोरदार स्वागत

>> पोलिसांकडून सतावणूक झाल्याचा दावा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) उद्घाटन सोहळ्यात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या भाषणाच्या वेळी म्हादई प्रश्‍नावरून आवाज उठविल्यामुळे पोलिसांनी प्रतिबंधात्मक कलमाखाली अटक केलेल्या कॉंग्रेसच्या तिघा पदाधिकार्‍यांची चोवीस तासांनंतर गुरुवारी संध्याकाळी सशर्त जामिनावर सुटका करण्यात आली आहे. या तिघांना हमीदार म्हणून सरकारी कर्मचारी देण्याची सूचना करण्यात आली. तसेच तिघांना आगशी पोलीस स्टेशनवर २५ नोव्हेंबरपर्यंत हजेरी लावण्याची अट ... Read More »

राज्य वन्यजीव मंडळाची सरकारकडून स्थापना

राज्य सरकारने राज्य वन्यजीव मंडळाची स्थापना केली आहे. या मंडळाचे अध्यक्षपद मुख्यमंत्र्याकडे राहणार आहे. तर उपाध्यक्षपद वन मंत्र्यांकडे राहणार आहे. या मंडळावर पर्येचे आमदार प्रतापसिंह राणे, कुठाळ्ळीच्या आमदार एलिना साल्ढाणा, सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वन्यजीव मंडळावर एकूण ३१ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वन्य जीव समितीवर पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर, अमृत सिंह, चरण देसाई, अर्नोड नोरोन्हा, ... Read More »

खाण व्यवसाय डिसेंबरमध्ये सुरू होण्याचा मुख्यमंत्र्यांचा आशावाद

सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यामुळे राज्यातील बंद असलेला खाण व्यवसाय येत्या डिसेंबर महिन्यात पूर्ववत होणार असल्याचा आशावाद मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खाण क्षेत्रातील कामगार संघटना आणि मायनिंग पीपल्स फ्रंटच्या पदाधिकार्‍यांबरोबर घेतलेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल व्यक्त केला. गोवा मायनिंग पीपल्स फ्रंट आणि खाण कामगार संघटना या दोन संघटनांच्या प्रतिनिधीशी राज्यातील खाण व्यवसायासंबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या फेरआढावा ... Read More »

‘गुलाबी’ कसोटी आजपासून

>> टीम इंडिया प्रथमच खेळणार ऐतिहासिक डे-नाईट टेस्ट भारतीय क्रिकेटची पंढरी मानल्या जाणार्‍या ऐतिहासिक ईडन गार्डनवर आजपासून टीम इंडिया आपली पहिलीवहिली ‘गुलाबी’ कसोटी खेळणार आहे. दिवस-रात्र पद्धतीने व गुलाबी चेंडूने भारत तसेच बांगलादेशचा हा पहिलाच कसोटी सामना असेल. इंदूरमधील पहिली कसोटी तीन दिवसांत जिंकलेला भारतीय संघ १-० असा आघाडीवर असून दुसर्‍या सामन्यासह मालिका २-० अशी जिंकण्यावर भारताचा भर असेल. भारतीय ... Read More »