Daily Archives: November 21, 2019

निव्वळ उपचार

राज्यातील ८८ खाण लीजांचे नूतनीकरण रद्द करणार्‍या सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी ७ फेब्रुवारीला दिलेल्या निवाड्याचा फेरविचार करावा अशी विनंती करणारी याचिका अखेर राज्य सरकारने तब्बल २१ महिन्यांनंतर सर्वोच्च न्यायालयात सादर केली आहे. अर्थात, मागील सरकारने अशी फेरविचार याचिका दाखल करावी का, यासंदर्भात ज्येष्ठ विधीज्ञ हरीश साळवे यांचा कायदेशीर सल्ला घेतला होता, तेव्हा त्यांनी गोवा सरकारने अशा फेरविचार याचिकेचा विचार करू ... Read More »

श्रीलंका प्रखर राष्ट्रवादाच्या नव्या वळणावर…

शैलेंद्र देवळणकर राजेपक्षे यांनी अल्पसंख्याकांच्या विरोधात अत्यंत कडवी धोरणे राबवावीत अशा प्रकारची अपेक्षा या निवडणुकीतून व्यक्त झाली असून ही मानसिकता, अपेक्षा अत्यंत धोकादायक आहे. गोताबाया यांचा राष्ट्रवाद हा अल्पसंख्याकांसाठी कर्दनकाळ ठरू शकतो. याचा परिणाम जवळपासच्या देशांवर होऊ शकतो. भारताचा शेजारी देश असणार्‍या श्रीलंकेमध्ये नुकत्याच झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकांमध्ये उदारमतवादी, कल्याणकारी लोकशाहीच्या संकल्पनेची मांडणी करणार्‍या व आश्वासन देणार्‍या साजिथ प्रेमदासा यांना ... Read More »

चित्रपट निर्मात्यांसाठी ‘एक खिडकी’ योजना

>> इफ्फी उद्घाटन सोहळ्यात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांची घोषणा भारतात कुठेही चित्रिकरण करू इच्छिणार्‍या देश-विदेशांतील चित्रपट निर्मात्यांना त्यासाठीचा परवाना मिळवण्यास अडचणी येऊ नयेत म्हणून त्यांच्यासाठी ‘एक खिडकी योजना’ सुरू करण्यात येणार असल्याचे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल डॉ. शामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्यात सांगितले. गोव्यासह लेह, लडाख, अंदमान व निकोबार द्विपसमूहासह देशभरात कित्येक ... Read More »

संतप्त म्हादई समर्थकांची जावडेकरांविरुद्ध इफ्फीस्थळी निदर्शन

>> गिरीश चोडणकरांसह अनेकांना प्रतिबंधात्मक अटक केंद्रीय पर्यावरण व वन मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडून म्हादई प्रकरणी समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संतप्त बनलेल्या म्हादई समर्थकांनी काल ताळगाव येथे शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये आयोजित इफ्फीच्या उद्घाटन कार्यक्रमात केंद्रीय मंत्री जावडेकर यांचे भाषण सुरू असताना तसेच स्टेडियमच्या बाहेर आणि कांपाल पणजी येथे गोवा मनोरंजन संस्थेच्या बाहेर निदर्शने केली. पोलिसांनी निदर्शने करणार्‍या राजकीय आणि सेवाभावी ... Read More »

एनआरसी देशभरात लागू करणार

>> केंद्रीय गृहमंत्र्यांची राज्यसभेत घोषणा संपूर्ण देशात राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (एनआरसी) केली जाणार असल्याची घोषणा काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत केली. याप्रकरणी विरोधी सदस्यांच्या विविध आरोपांना शहा यांनी या सभागृहात उत्तर दिले. एनआरसीमध्ये धर्मावर आधारीत भेदभाव केला जात असल्याचा आरोप यावेळी शहा यांनी फेटाळला. एनआरसीच्या माध्यमातून नागरिकांची ओळख निश्‍चित केली जाईल व एनआरसी संपूर्ण भारतात लागू केली जाईल ... Read More »

म्हादई समर्थक शिष्टमंडळास जावडेकर यांचे १५ दिवसांत निर्णयाचे आश्‍वासन

केंद्रीय पर्यावरण, वन, हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हादई प्रश्‍नी येत्या १५ दिवसांत निर्णय घेण्याचे आश्‍वासन म्हादई समर्थक संस्थांच्या एका शिष्टमंडळाला दिले. जावडेकर यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी म्हादई समर्थकांनी गोंधळ, गडबड करू नये म्हणून म्हादई समर्थक आणि मरिना विरोधकांना भेटण्यासाठी वेळ उपलब्ध करून दिला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत म्हादई समर्थक संस्थांच्या एका शिष्टमंडळाने ... Read More »

न्यूझीलंड-इंग्लंड कसोटी आजपासून

यजमान न्यूझीलंड व इंग्लंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आजपासून प्रारंभ होत आहे. घरच्या वातावरणात खेळण्याचा फायदा न्यूझीलंडला होणार असून इंग्लंडला न्यूझीलंडमधील वातावरणाशी जुळवून घेतानाच कामगिरीवरदेखील अधिक भर द्यावा लागणार आहे. न्यूझीलंडची फलंदाजी तसेच गोलंदाजी फळी स्थिरावलेली आहे. दुसरीकडे इंग्लंडचा संघ स्थित्यंतरातून जात आहे. पहिल्या तीन क्रमांकांवर रॉरी बर्न्स (१२ कसोटी), डॉम सिबली (पदार्पण) व ज्यो डेन्ली (८ ... Read More »

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाकिस्तानची कसोटी

श्रीलंका व पाकिस्तानविरुद्ध दोन एकतर्फी टी-ट्वेंटी मालिका जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाची मायदेशातील पहिली कसोटी आजपासून पाकिस्तानविरुद्ध असेल. इंग्लंडविरुद्धची मालिका बरोबरीत सोडवून ऍशेस आपल्याकडे राखल्यानंतर आपला भन्नाट फॉर्म कायम राखण्याचा कांगारूंचा प्रयत्न असेल तर विश्‍व कसोटी अजिंक्यपद मालिकेतील पाकिस्तानची ही पहिलीच लढत असेल. १९९५ साली ऑस्ट्रेलियाला सिडनी कसोटीत नमविल्यानंतर पाकिस्तानने सलग बारा कसोटींत ऑस्ट्रेलियाकडून सपाटून मार खाल्ला आहे. त्यामुळे मालिका विजयाचे दिवास्वप्न पाहण्यापूर्वी ... Read More »