Daily Archives: November 20, 2019

लबाडी!

म्हादईसंदर्भात केंद्रीय वन व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी गोवा सरकारला पाठवलेले गुळमुळीत उत्तर ही नुसती धूळफेक नव्हे, तर निव्वळ लबाडी आहे. ‘कर्नाटकची म्हादईच्या पाण्याची मागणी ही केवळ पेयजलापुरती नसल्याचे आपल्या शिष्टमंडळाचे म्हणणे असल्याने त्या विषयाचा अधिक अभ्यास करण्याची गरज आहे आणि त्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल’ असे जावडेकरांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या उत्तरामध्ये म्हटले आहे. म्हणजे ही समिती गोव्याच्या शिष्टमंडळाने ... Read More »

सोशल मीडियाच्या सकारात्मकतेचे दर्शन

ऍड. प्रदीप उमप अयोध्या प्रकरणाच्या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर देशातील प्रत्येक समाजघटक भयभीत होता. सामाजिक वातावरण चिघळण्याची चिंता प्रत्येकाला होती. विशेषतः सोशल मीडियाकडे सर्वांचे अधिक लक्ष होते. मात्र, या सर्व प्रकरणात सोशल मीडिया युजर्सनी दाखवलेले वैचारिक प्रगल्भतेचे दर्शन निश्‍चितच कौतुकास्पद म्हणावे लागेल. सोशल मीडिया हे केवळ आपले वा इतरांचे विचार मांडण्याचे माध्यम राहिलेले नाही. या माध्यमाचे परिणाम समाजजीवनावरही होत असतात. मात्र, दुर्दैवाने ... Read More »

‘कळसा’ प्रकरणी जावडेकरांच्या उत्तरामुळे तीव्र संताप

>> प्रकल्पाच्या पुनरावलोकनासाठी समिती नेमणार ः मुख्यमंत्र्यांकडून स्वागत; विरोधकांचा हल्लाबोल गोवा सरकारने ४ नोव्हेंबर २०१९ रोजी कर्नाटकातील कळसा भांडुरा प्रकल्पासंबंधी सादर केलेल्या निवेदनाची दखल घेऊन या प्रकल्पाबाबत पुनरावलोकन करण्यासाठी एका समितीची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल एका पत्राद्वारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कळविले आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केंद्रीय मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत ... Read More »

पुनरावलोकन समिती म्हणजे वेळकाढूपणा ः सरदेसाई

कर्नाटकाला कळसा भांडुरा प्रकल्पाबाबत देण्यात आलेले पर्यावरणासंबंधीच्या पत्राचे पुनरावलोकन करण्यासाठी एका समितीची निवड करणे म्हणजे केवळ वेळकाढूपणाचा प्रयत्न आहे, अशी टीका गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी पत्रकार परिषदेत काल केली. केंद्रीय मंत्री जावडेकर यांच्याकडे सदर पत्र मागे घेण्याची मागणी करण्यात आली होती. तथापि, जावडेकर यांनी या मागणीची दखल घेतलेली नाही. कर्नाटकाचा कळसा भांडुरा येथील प्रकल्प हा पिण्याचा पाण्याचा ... Read More »

मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाने राजीनामा द्यावा ः खंवटे

म्हादईप्रश्‍नी दिलेले आश्‍वासन पूर्ण करण्यास मुख्यमंत्री प्रमोद सावंत व त्यांच्या मंत्रिमंडळाला अपयश आलेले असून त्यामुळे मुख्यमंत्र्यांबरोबरच त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा द्यावा, अशी मागणी काल अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी केली. म्हादईप्रश्‍नी कर्नाटकच्या कळसा भंडुरा प्रकल्पाला जे ‘ईसी’ देण्यात आलेले आहे त्याचा फेरआढावा घेण्यात येणार असल्याचे केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना लिहिलेल्या पत्रातून स्पष्ट केल्याच्या पार्श्‍वभूमीवर खंवटे ... Read More »

वास्कोत कोळसावाहू ट्रकखाली चिरडून तियात्र कलाकार ठार

कोळसावाहू ट्रकखाली चिरडून वास्कोतील नामवंत त्रियात्रिस्ट मार्सेलीन दि बेली रॉड्रीगीस (६४) यांचा दुर्दैवी अंत झाला. अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पलायन केले. एमपीटीमधून होणारी कोळसा वाहतूक तसेच अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याची लोकांनी जोरदार मागणी केली आहे. येथील भाजी मार्केटजवळ एफ. एल. गोम्स राष्ट्रीय मार्गावर काल संध्याकाळी सहाच्या दरम्यान एमपीटीमधून कोळसा वाहतूक करणार्‍या (जीए ०९ यू ३५६१) या ट्रकची याच मार्गाने जाणाच्या ... Read More »

उत्तर भारतात जाणवले भूकंपाचे धक्के

उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये काल संध्याकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. नेपाळमध्ये केंद्रबिंदू असलेल्या या भूकंपाचे धक्के दिल्ली, उत्तराखंड व उत्तर प्रदेश या ठिकाणी जाणवले. रिश्टर मापकावर या भूकंपाची क्षमता ५ अशी नोंद झाल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र यामुळे मालमत्तेची हानी किंवा जीवितहानीचे वृत्त नाही. Read More »

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलेले आरोप चुकीचे ः विजय

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या उत्पन्नाबाबत केलेला आरोप चुकीचा आहे. आपल्या उत्पन्नात आमदार नसताना वाढ झाली होती. तर, आमदार, मंत्रिपदी असताना उत्पन्नात घट झालेली आहे. आपले २०१७ मध्ये उत्पन्न १४.७५ कोटी होते. त्यात ७.३५ कोटीच्या कर्जाचा समावेश आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केलेल्या आपणावर केलेल्या आरोपांबाबत कायदेशीर सल्ला घेतला जात आहे, असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी ... Read More »

आज उघडणार इफ्फीचा पडदा

>> अमिताभ बच्चन, रजनीकांत विशेष अतिथी सुवर्ण महोत्सवी इफ्फीचे आज बुधवार दि. २० रोजी बांबोळी येथील शामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये उद्घाटन होणार आहे. काल इफ्फीसंबंधी माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, की हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अमिताभ बच्चन व दाक्षिणात्य अभिनेता रजनीकांत हे उद्घाटन सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून हजर राहणार आहेत. आपण महोत्सवासाठीच्या सगळ्या ... Read More »

‘३७० रद्दनंतर’ शस्त्रसंधी उल्लंघनाच्या ९५० घटना

केंद्रातील मोदी सरकारने घटनेतील कलम ३७० रद्द केल्यापासून आतापर्यंत जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेलगत पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघनाच्या ९५० घटना घडल्या असल्याची माहिती काल लोकसभेत देण्यात आली. केंद्रीय गृह राज्यमंत्री किशन रेड्डी यांनी याविषयी माहिती दिली. पाकिस्तानच्या नियंत्रणाखालील प्रदेशांमधून भारतीय हद्दीत केल्या जाणार्‍या दहशतवादी कारवाया हा अजूनही उभय देशांदरम्यानच्या द्विपक्षीय संबंधांबाबत चिंतेचा विषय राहिला आहे असे रेड्डी यावेळी म्हणाले. लोकसभेत देण्यात आलेल्या माहितीनुसार ... Read More »