Daily Archives: November 19, 2019

वादळी अधिवेशन

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला अपेक्षेप्रमाणेच काल वादळी सुरूवात झाली. गेल्या काही दिवसांतील एकूण जोरदार घडामोडी लक्षात घेता संसदेमध्ये त्यांचे पडसाद उमटतील अशी अटकळ होतीच. त्याप्रमाणे काल काश्मीरच्या मुद्द्यावरून कॉंग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि द्रमुकने संसदेत गोंधळ घातल्याने कामकाज स्थगित करण्याची पाळी ओढवली. येणार्‍या दिवसांतही अशाच प्रकारे सरकारला घेरण्याचा आणि कामकाज रोखून धरण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करतील असे दिसते आहे. संसदेच्या गेल्या ऑगस्टमधील ... Read More »

अयोध्या ः संवेदनशील मुद्द्याला पूर्णविराम!

देवेश कु. कडकडे देशातील विविध धार्मिक नेत्यांनी एक व्यासपीठ उभारून धार्मिक सलोखा टिकवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. राजकीय नेते कधीही यासाठी पुढाकार घेणार नाहीत, कारण या मुद्यावर त्यांच्या राजकारणाला रंग चढत असतो. प्रत्येक भारतीयाने आपली धार्मिक आस्था अबाधित राखूनही आपण एक भारतीय आहोत या नात्याने आस्थेच्या पलीकडे जाऊन प्रथम राष्ट्रधर्माला महत्त्व द्यायला हवे. गेल्या ९ नोव्हेंबरला अयोध्या प्रकरणावर दिलेल्या ऐतिहासिक ... Read More »

खोटे आरोप करणार्‍यांवर कारवाई करणार

>> मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा जमीन खरेदी आरोपांप्रकरणी संबंधितांना इशारा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई, कॉंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, शिवसेनेचे बाबूराव धुरी, कॉंग्रेसचे नेते दिग्विजय सिंग, पवन खेरा व इतरांनी दोडामार्ग तालुक्यातील जमीन खरेदीबाबत केलेले आरोप दिशाभूल करणारे आहेत. आपण कायदेशीररीत्या ३३ हजार चौरस मीटर जमीन खरेदी केली आहे. आपल्या जमीन व्यवहारात पारदर्शकता आहे. यापुढे जमीन खरेदीबाबत खोटे, बिनबुडाचे ... Read More »

फारूख अब्दुल्ला यांच्या स्थानबद्धतेवरून विरोधकांचा लोकसभेत प्रचंड गदारोळ

नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे खासदार डॉ. फारूख अब्दुला यांना सरकारने स्थानबद्धतेत ठेवल्यावरून काल लोकसभेत विरोधकांनी प्रचंड गदारोळ माजविला. अब्दुल्ला यांना स्थानबद्ध करण्याची कृती बेकायदा असल्याचा दावा विरोधकांनी केला व त्यांना या लोकसभा अधिवेशनात भाग घेण्यास द्यावे अशी मागणी केली. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेतील कलम रद्द केल्यानंतर तेथे खासदारांना जाण्यास मज्जाव करण्याचा विषयही विरोधकांनी लोकसभेत उपस्थित केला. या उलट युरोपमधील संसदपटूंना ... Read More »

सरकार स्थापनेवर सोनियांशी चर्चा झाली नाही ः पवार

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी काल नवी दिल्ली येथे कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्रातील विद्यमान राजकीय स्थितीची सविस्तर माहिती दिली. मात्र महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यावर यावेळी सोनिया गांधींशी चर्चा झाली नाही. अशी माहिती पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही बैठक सुमारे ४५ मिनिटे चालली. शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही, सरकार स्थापन करायचे की नाही याबाबत ... Read More »

कर्ज काढून सरकारी कारभार ः गोवा फॉरवर्ड

राज्य सरकारची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने कर्ज काढून सरकारी कारभार चालविला जात आहे. मंगळवार १९ नोव्हेंबर रोजी २०० कोटींचे कर्ज घेतले. मागील ९ महिन्यात कर्जाचा आकडा १९५० कोटीवर पोहोचला आहे, अशी टीका गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी पत्रकार परिषदेत काल केली. राज्य सरकारच्या महसुलात घट होत असल्याने आर्थिक व्यवहार करण्यासाठी कर्ज घ्यावे लागत आहे. सरकारकडून रोख्यांची विक्री करून घेण्यात ... Read More »

आमदार नितेश राणेंची मुख्यमंत्री सावंतांशी चर्चा

कणकवलीचे भाजपा आमदार नितेश राणे यांनी काल गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांची पर्वरीतील विधानसभा संकुलात भेट घेतली. गोव्यात राबविली जाणारी कचरा व्यवस्थापन पद्धती उत्कृष्ट असून आपल्या मतदारसंघात या पद्धतीची कार्यवाही करण्याची इच्छा राणे यांनी यावेळी व्यक्त केली. नितेश राणे म्हणाले की, गोव्यातील कचरा व्यवस्थापन पद्धतीची देशभरात प्रशंसा होत आहे. सिंधुदुर्गमध्ये अशी व्यवस्था राबविण्यासाठी ... Read More »

जेएनयूच्या विद्यार्थ्यांचा संसदेवर मोर्चा; १०० जणांना अटक

वसतिगृहाच्या वाढीव शुल्काविरोधात गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करणार्‍या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीच्या (जेएनयू) शेकडो विद्यार्थ्यांनी काल संसदेवर मोर्चा नेला. या मोर्चाला रोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाईला विद्यार्थ्यांनी दाद न दिल्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. यावेळी काही विद्यार्थी जखमी झाले. तर सुमारे १०० विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या आंदोलनामुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. वाढविण्यात आलेले वसतिगृहाचे शुल्क सरकारकडून मागे घेण्यात यावे ... Read More »

मासळी महामंडळाचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी नाकारलेला नाही

मच्छीमारी खात्याच्या प्रस्तावित मासळी महामंडळ स्थापन करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नाकारलेला नाही. मच्छीमारी खात्याकडून मासळीच्या दरावर नियंत्रण आणून नागरिकांना स्वस्त दरात मासळी उपलब्ध करून महामंडळ स्थापन करण्यामागील उद्देशाची पूर्तता केली जाऊ शकते, असा दावा मच्छीमारी मंत्री फिलीप नेरी रॉड्रीगीस यांनी पत्रकारांशी बोलताना काल केला. माजी मच्छीमारी मंत्री तथा शिवोलीचे आमदार विनोद पालयेकर यांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी ... Read More »

राफेल नदालच अव्वल!

एटीपीने यंदाच्या कॅलेंडर वर्षातील आपली अखेरची क्रमवारी काल सोमवारी जाहीर करताना स्पेनचा दिग्गज राफेल नदालच्या अव्वलस्थानावर शिक्कामोर्तब केले. नदालला लंडनमध्ये झालेल्या एटीपी फायनल्सच्या पात्रता फेरीचा अडथळा देखील ओलांडता आला नाही. परंतु, सर्बियाच्या नोवाक जोकोविचला उपांत्य फेरीपर्यंत मजल मारणे शक्य न झाल्याने नदालने ९९८५ गुण घेत जोकोविचला ८४० गुणांनी मागे टाकले. वर्षाची अखेर अव्वलस्थानावर करण्याची नदालची ही पाचवी वेळ आहे. फेडरर ... Read More »