Daily Archives: November 18, 2019

एनडीएचे विघटन

महाराष्ट्रातील बेबनावानंतर शिवसेनेने केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधूनही बाहेर पडण्याच्या दिशेने पावले टाकायला सुरूवात केली आहे. केंद्रातील सेनेचे एकमेव मंत्री अरविंद सावंत यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर त्याची चाहुल लागलीच होती. संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी आणि शिवसेनेदरम्यान कोणी तरी दरी निर्माण करीत असल्याचा आरोप केल्यानंतर पुन्हा शिवसेना आणि भाजपचे केंद्रीय नेतृत्व यामध्ये थेट बोलणी आणि वाटाघाटीची दारे पुन्हा किलकिली होणार का याबाबत ... Read More »

महाजनादेशाचे धिंडवडे

ल. त्र्यं. जोशी उध्दव ठाकरे यांच्या संमतीशिवाय संजय राऊत एवढा धुडगूस घालू शकतात यावर कुणाचाही विश्वास बसू शकत नाही. उध्दव ठाकरे खुलेपणाने जे बोलू शकत नाहीत ते ते संजय राऊत यांच्या मुखातून बोलत असतात यावर सर्वांचाच विश्वास आहे. केवळ आज नाही, गेल्या पाच वर्षांतही तेच सुरु होते. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीतील मतमोजणी होऊन तेवीस दिवस उलटून गेल्यानंतरही अद्याप नवे सरकार केव्हा ... Read More »

संसदेत शिवसेनेची व्यवस्था विरोधी सदस्यांच्या बाजूने

संसदेच्या दोन्ही सभागृहांमधील शिवसेनेच्या खासदारांची आसन व्यवस्था आता विरोधी सदस्यांच्या बाजूने करण्यात आल्याची माहिती संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. मोदी मंत्रिमंडळात शिवसेनेचे अरविंद सावंत हे एकमेव मंत्री होते. त्यांनी पदाचा राजिनामा दिल्यानंतर शिवसेना एनडीएतून बाहेर पडणार असल्याचे स्पष्ट झाले होते. भाजपने यासंदर्भात काल अधिकृत जाहीर केले. महाराष्ट्रात शिवसेनेने कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसशी युती केल्याने तसेच शिवसेनेच्या मंत्र्याने केंद्रीय मंत्रिपदाचा राजिनामा ... Read More »

वीज दरवाढीची सूचना जारी

>> ऑक्टोबर-डिसेंबरसाठी ५०% दरवाढ होणार राज्यातील वीज ग्राहकांना ऑक्टोबर ते डिसेंबर २०१९ या तीन महिन्यांसाठी वीज दरवाढीला तोंड द्यावे लागणार आहे. मागील तीन महिन्यांच्या तुलनेत वीज दरात साधारण ५० टक्के वाढ होणार आहे. वीज खात्याच्या मुख्य वीज अभियंता रेश्मा मॅथ्यू यांनी वीज दरवाढीसंबंधीची सूचना जारी केली आहे. गोवा राज्यात विजेची निर्मिती होत नसल्याने परराज्यातून वीज खरेदी करावी लागत आहे. संयुक्त ... Read More »

अयोध्या निवाड्यासंदर्भात दोन संघटना फेरआढावा याचिका दाखल करणार

अयोध्येतील वादग्रस्त जमिनीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यासंदर्भात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (एआयएमपीएलबी) सर्वोच्च न्यायालयात फेरआढावा याचिका दाखल करणार आहे. याप्रश्‍नी दिलेल्या निवाड्यातून वादग्रस्त जमिनीसंदर्भात कोणताही न्याय झालेला नाही. म्हणूनच आम्ही सर्वोच्च न्यायालयात फेरआढावा याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान जमियत उल्मा-ए-हिंद या मुस्लिम संघटनेनेही या निवाड्यासंदर्भात फेर आढावा याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला असल्याचे जमियतचे प्रमुख अर्शद मदानी ... Read More »

मासळी महामंडळाच्या स्थापनेस मुख्यमंत्र्यांचा नकार : पालयेकर

राज्यात मच्छीमारी खात्या अंतर्गत एक महामंडळ स्थापन करून जनतेला स्वस्त दरात मासळी देण्याची योजना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नाकारली आहे, असा आरोप माजी मच्छीमारी मंत्री तथा शिवोलीचे आमदार विनोद पालयेकर यांनी गोवा फॉरवर्डच्या मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल केला. गोवा विधानसभेच्या २०१७ च्या निवडणुकीनंतर तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या आघाडी सरकारमध्ये गोवा फॉरवर्डचा समावेश होता. ... Read More »

राफेल : मोदींना ‘क्लीन चिट’ दिल्याचा दावा खोटा : कॉंग्रेस

राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला ‘क्लिन चिट’ दिली असल्याचा भाजपचे प्रदेश अध्यक्ष विनय तेंडुलकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर व सदानंद तानावडे यांनी केलेला दावा तो खोठा असल्याचे काल कॉंग्रेसचे प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने सदर प्रकरणात उपस्थित केलेल्या मुद्द्यांवरच निकाल दिला असून सीबीआय व इतर संस्थांस राफेलची चौकशी करण्यास बंधन नसल्याचे स्पष्ट केले आहे हे ... Read More »

सावईवेरेतील अपघातात दुचाकीचालक ठार

सावईवेरे येथे कारगाडी आणि स्कूटर यांच्यात काल झालेल्या अपघातात स्कूटर चालक संतोष वामन कडेकर यांचे काल निधन झाले. या अपघातात स्कूटरच्या मागे बसलेली संतोष यांची पत्नी अनिता कडेकर गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी फोंडा पोलिसांनी कार चालकाविरोधात निष्काळजीपणे वाहन चालविल्याचा ठपका ठेवला आहे. कार चालक लुमो पालकर याला अटक केली आहे. या प्रकरणी फोंडा पोलीस अधिक तपास करीत आहेत. Read More »

सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्ष खासदारांनी उठविला डॉ. अब्दुल्लांच्या स्थानबध्दतेवर आवाज

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आज सोमवारपासून प्रारंभ होत असून या पार्श्‍वभूमीवर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले. यावेळी मोदी यानी या अधिवेशनात सर्व महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा घडवून आणण्यास आपल्या सरकारची तयारी आहे अशी ग्वाही विरोधकांना दिली. दरम्यान याच बैठकीत विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जम्मू काश्मीरमधील लोकसभा खासदार डॉ. फारुख अब्दुल्ला यांच्या स्थानबध्दतेविरोधात जोरदार आवाज उठवला. अब्दुल्ला यांना लोकसभा ... Read More »

गृहआधार : नव्या अर्जदारांची पात्रता पडताळणी होणार

महिला व बालविकास खात्यातर्फे गृहआधार योजनेतील नवीन अर्जदारांचे पात्रता पडताळणी सर्वेक्षण येत्या १ डिसेंबर २०१९ पासून प्रारंभ करण्यात येणार आहे. सरकारकडून गृह आधार योजनेखाली गृहिणींना वाढत्या महागाईच्या पार्श्‍वभूमीवर साहाय्य करण्यासाठी प्रतिमहिना १५०० रुपये मानधन दिले जात आहे. वार्षिक उत्पन्न मर्यादा ३ लाखांपेक्षा कमी असलेल्या गटातील राज्यातील १ लाख ५२ हजार महिलांना या योजनेखाली आर्थिक साहाय्य केले जात आहे. या योजनेखाली ... Read More »