Daily Archives: November 9, 2019

शांतता राखूया

गेली चार दशके देशाचे राजकारण आणि समाजकारण ढवळून काढणार्‍या अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निवाडा लवकरच येणार आहे. हा निकाल कसाही लागला तरी त्यातून देशात दंगली आणि हिंसाचाराचे लोण पसरू नये आणि धार्मिक तेढ वाढू नये यासाठी समाजामध्ये शांती आणि सौहार्दाचा संदेश देण्यासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने भाजप आणि संघपरिवाराच्या कार्यकर्त्यांना कामाला लावल्याचे दिसते आहे. या आंदोलनाची भावनिक धग ज्या ... Read More »

भारत व चीनमधील सैनिकी सौहार्द

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) सीमेवरील कुरबुरींकडे दुर्लक्ष करत, दोन्ही देशांमधल्या सर्व प्रकारच्या संबंधांमध्ये विचारपूर्वक वृद्धिंगत होणारे संरक्षण संबंध सिद्ध झालेले दिसून पडतात. चीन व भारताने आपल्या राजकीय मुत्सद्देगिरीने कोऑपरेशन अँड कॉम्पिटिशन अँड नॉट कन्फ्रन्टेशनमध्ये बदलण्याची नितांत आवश्यकता आहे आणि त्या दृष्टींने आता प्रयत्न सुरु झाले पाहिजेत. सीमाविवाद, संरक्षणदल-स्थलसेनांमधील सामरिक सौहार्दानं संपुष्टात आणणें हे दोन्ही देशांसाठी फायद्याचे असेल. मागील ५२ वर्षांमध्ये ... Read More »

अयोध्याप्रश्‍नी सर्वोच्च न्यायालय आज निवाडा जाहीर करणार

संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या तसेच राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील अशा रामजन्मभूमी-बाबरी मशीद तथा अयोध्याप्रश्‍नीचा निकाल सर्वोच्च न्यायालय आज जाहीर करणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय खंडपीठातर्फे आज सकाळी १०.३० वा. निवाडा दिला जाणार आहे. याप्रकरणी दैनंदिन पध्दतीने सर्वोच्च न्यायालयात ४० दिवस सुनावणी होऊन १६ ऑक्टोबर रोजी ही सुनावणी पूर्ण झाली. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी निवाडा राखून ठेवला ... Read More »

विधानसभांच्या कामकाजासाठी समान नियम प्रक्रियेला सुरुवात

>> ओम बिर्ला यांची माहिती देशातील विधानसभां, विधान परिषदांच्या सुनियोजित कामकाजासाठी एकसमान नियम तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली आहे. नवीन एकसमान नियमावली तयार करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांचा समावेश असलेल्या तीन समित्यांची नियुक्ती करण्यात आली असून नोव्हेंबर २०१९ अखेरपर्यत या समित्यांकडून अहवाल अपेक्षित आहे, अशी माहिती लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी पत्रकारांशी बोलताना पर्वरी येथे काल दिली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला ... Read More »

शिवसेनेचा मुख्यमंत्री आणण्यासाठी फडणवीस, शहांची गरज नाही

>> उध्दव ठाकरे यांची पत्रकार परिषदेत भाजपवर टीकेची झोड महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर शिवसेनेच्या आमदाराला बसविण्यासाठी देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहा यांची आपल्याला गरज नाही अस टोला शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी काल पत्रकार परिषदेत लगावीत भाजपावर घणाघाती टीकेची झोड उठवली. आपल्याला भाजपने खोटे ठरवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणीही त्यानी भाजप नेत्यांचा खरपूस समाचार घेतला. अमित शहा यांच्याबरोबर झालेल्या एका बैठकीत महाराष्ट्रात समसमान काळासाठी ... Read More »

सरकार स्थापनेच्या तिढ्याला शिवसेना जबाबदार : फडणवीस

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालानंतर सरकार स्थापनेबाबत निर्माण झालेल्या तिढ्याला शिवसेना जबाबदार असल्याचा आरोप मुख्यमंत्रिपदाचा राजिनामा दिल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी केला. समसमान मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय झाला होता हा शिवसेनेचा दावा फडणवीस यांनी फेटाळला. आपल्या उपस्थितीत असा निर्णय उभय पक्षांनी कधीच घेतला नाही असेही त्यांनी सांगितले. सरकार स्थापनेचा तिढा सोडविण्यासाठी आपण उध्दव ठाकरे यांना अनेकदा फोन केला. मात्र ठाकरे यांनी ... Read More »

नाफ्तावाहू जहाज आणण्यामागे मंत्री, आमदाराचा हात नाही

>> जहाज बंदरात आणण्यास मान्यता : मुख्यमंत्री ू शी नलिनी हे नाफ्तावाहू जहाज दुरुस्तीसाठी मुरगाव बंदरात आणण्यास एमपीटीने मान्यता दिली आहे. नाफ्तावाहू जहाज आणण्यात राज्य मंत्रिमंडळातील मंत्री किंवा आमदाराचा हात नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना पर्वरी येथे काल केले. विरोधकांकडे नाफ्ताशिवाय अन्य कोणताही मुद्दा नाही. त्यामुळे नाफ्ता प्रकरणामध्ये मंत्री, आमदार गुंतल्याचा आरोप करून सनसनाटी निर्माण ... Read More »

संपकरी जीवरक्षकांना पुन्हा कामावर येण्यास ८ दिवसांची मुदत : आजगावकर

राज्यातील समुद्र किनार्‍यांवर मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे लोक बुडण्याचे प्रकार घडत आहेत. दृष्टी कंपनीला अधिकाधिक कर्मचार्‍यांचा समावेश करण्याची सूचना करण्यात आली आहे. दृष्टी कंपनीने जादा जीवरक्षकांची नियुक्तीचे आश्‍वासन दिले आहे. या आश्‍वासनाचे पालन न केल्यास कंपनीचा करार रद्द केला जाऊ शकतो, असे पर्यटन मंत्री मनोहर आजगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल सांगितले. संपावरील जीवरक्षकांना पुन्हा कामावर रुजू होण्यासाठी ८ दिवसांची मुदत देण्यात आल्याची ... Read More »

मुख्यमंत्र्यांच्या दोडामार्गमधील प्रचंड जमीन खरेदीची चौकशी व्हावी : सरदेसाईंची मागणी

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दोडामार्ग येेथ तब्बल १ कोटी २० लाख चौ. मी. एवढी जमीन विकत घेतली असल्याचा आरोप काल गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते व आमदार विजय सरदेसाई यांनी पत्रकार परिषदेत केला. ३८ लाख रु.ना ही जमीन खरेदी करण्यात आली असल्याचे सांगतानाच दोडामार्गचा गोव्यात समावेश केला जावा अशी मागणी होऊ लागली आहे. त्यामागे हे रिएल इस्टेटचे राजकारण असल्याचे सरदेसाई ... Read More »

ब्लास्टर्स-ओडिशा यांच्यात नीरस गोलशून्य बरोबरी

इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) सहाव्या मोसमात केरला ब्लास्टर्स एफसी आणि ओडिशा एफसी यांच्यातील नीरस लढतीत गोलशून्य बरोबरी झाली. नेहरू स्टेडियमवरील निकाल ब्लास्टर्सकरीता जास्त निरशाजनक ठरला. ओडिशाची ४ सामन्यांतील ही पहिलीच बरोबरी असून एक विजय व दोन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे चार गुण झाले. ब्लास्टर्सची कामगिरी सुद्धा अशीच आहे. या दोन्ही संघांनी एक क्रमांक प्रगती करीत मुंबईला मागे टाकले. तिन्ही संघांचे ... Read More »