ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: November 8, 2019

गरज सजगतेची

इस्रायली स्पायवेअर पेगाससने व्हॉटस्‌ऍप या लोकप्रिय ऍपमधील संदेशवहनावर हेरगिरी केल्याच्या प्रकरणामध्ये खरा दोषी कोण हे अद्याप देशासमोर आलेले नाही. व्हॉटस्‌ऍप वापरकर्त्यांच्या फोनमध्ये शिरकाव करून त्यावरून होणार्‍या संदेशांची सायबर टेहळणी होत असल्याचे जेव्हा सदर कंपनीच्या निदर्शनास आले, तेव्हा व्हॉटस्‌ऍपने वापरकर्त्यांना त्या धोक्याविषयी सूचित केले. आता ज्या इस्रायली सॉफ्टवेअरने ही हेरगिरी केली त्यावर त्यांनी खटला गुदरला आहे, त्यातून हे ऑनलाइन हेरगिरीचे प्रकरण ... Read More »

पु.ल.ः विनोदाचे एक स्वतंत्र विश्व!

डॉ. श्रीकांत नरुले पुलंनी मराठी रसिकाला हसविले, पण त्यापेक्षा अधिक स्वत:संबंधी विचार करायलाही प्रवृत्त केले आहे. त्यांना अंतर्मुख व्हायला लावले. त्यांनी विनोदाचे एक स्वतंत्र विश्‍व निर्माण केले. लोकांना खळखळून हसविले आणि मोकळेपणाने जगाकडे पाहायलाही शिकविले… ‘हसून दु:ख सोसल्यास सुसह्य होते’, असे विनोदी लेखक पु. ल. देशपांडे यांचे तत्त्वज्ञान होते. विनोदाची खेळकर उत्स्फूर्त वृत्ती, मिस्कीलपणा हे सारे गुण त्यांच्याकडे जन्मजात होते. ... Read More »

नाफ्तावाहू जहाजाची जबाबदारी केंद्रीय मंत्रालयाकडे

दोनापावल येथे समुद्रात रुतलेल्या एनयू शी नलिनी या नाफ्तावाहू जहाजातील नाफ्ता बाहेर काढण्याची जबाबदारी भारत सरकारच्या डायरेक्टर जनरल शिपिंग या मंत्रालयाने स्वीकारली असून जहाजातील नाफ्ता बाहेर काढण्याबाबतचा निर्णय डीजी शिपिंग यांच्याकडून घेतला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. अरबी समुद्रातील क्यार या वादळामुळे मुरगाव बंदरातून नलिनी हे नाफ्तावाहू जहाज भरकटत दोनापावल येथे समुद्रात ... Read More »

सरकार स्थापनेसाठी शिवसेनेकडे पुरेसे संख्याबळ

>> भाजपचा सरकार स्थापनेस विलंब ः राऊत राज्यसभा खासदार तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी काल भाजप महाराष्ट्रात सरकार स्थापनेस वेळकाढूपणा करीत असून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्यास पोषक स्थिती निर्माण करीत असल्याचा आरोप केला. तसेच भाजपने आपण सरकार स्थापन करू शकत नाही, असे जाहीर करावे आणि त्यानंतर शिवसेना पुढील पावले उचलेल असे वक्तव्यही राऊत यांनी पत्रकार परिषदेत केले. ... Read More »

आमदार पालयेकरांकडून मुख्यमंत्र्यांच्या आरोपांचे खंडन

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हादई प्रश्‍नी केलेल्या आरोपांचे माजी जलस्रोत मंत्री तथा शिवोलीचे आमदार विनोद पालयेकर यांनी खंडन केले असून मुख्यमंत्र्यांचे लक्ष भलतीकडे असल्याने म्हादईचे पाणी वळविण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने कर्नाटकला पर्यावरण दाखला दिला आहे, असा दावा माजी जलस्रोत मंत्री पालयेकर यांनी काल केला. जलस्रोत खात्याचा कार्यभार सांभाळताना म्हादईच्या प्रश्‍नाकडे जास्त लक्ष केंद्रित होते. म्हादई येथे पाणी वळविण्याचा प्रयत्न ... Read More »

जमिनीचे झोन बदलण्यास अंतिम संमती दिलेली नाही

नगर नियोजन खात्याच्या जमिनीचे झोन बदलण्यासाठी नव्याने संमत करण्यात आलेल्या १६ बी कलमाखाली अर्जदारांना जमिनीचे झोन बदलण्याबाबत अंतिम मंजुरी दिलेली नाही. तसेच आगामी दोन महिन्यात तात्पुरती मान्यता दिली जाणार नाही. नवीन अर्जावर निर्णय घेण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी लागतो, अशी माहिती सरकारी वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला काल दिली. गोवा बचाव अभियान आणि फेडरेशन ऑफ रेनबो वॉरियर्स यांनी न्यायालयात याबाबत ... Read More »

अयोध्याप्रश्‍नी अनावश्यक वक्तव्ये केंद्रीय मंत्र्यांनी करू नयेत

>> निवाड्याच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधानांची सूचना अयोध्याप्रश्‍नी सर्वोच्च न्यायालय लवकरच निवाडा देणार असल्याच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय मंत्र्यांनी या संदर्भात कोणतीही अनावश्यक वक्तव्ये करू नयेत, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्र्यांना केली आहे. मोदी यांनी काल या विषयावर आपल्या मंत्रिमंडळातील सहकार्‍यांशी चर्चा केली. अयोध्याप्रश्‍नी सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याच्या पार्श्‍वभूमीवर देशात मित्रत्वाचे आणि जातीय सलोख्याचे वातावरण कायम ठेवणे आवश्यक असल्याचे मोदी यांनी आपल्या ... Read More »

आयटीच्या सर्वांगिण विकासासाठी साधनसुविधा पुरवण्याची तयारी

>> मीवो प्रकल्पाच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन सरकारची राज्यातील माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व प्रकारच्या साधन सुविधा पुरविण्याची तयारी आहे. स्टार्टअप्समध्ये नवनवीन संकल्पनांचा वापर करणार्‍या परराज्यातील कंपन्यांचा गोवा स्टार्टअप्स धोरणांमध्ये समावेश करण्याची तयारी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पाटो पणजी येथे काल केले. धेंपो उद्योग समूह आणि मीवो – पॉवर्ड बाय बिझ नेस्ट यांच्यातील संयुक्त धोरणात्मक ... Read More »

एफसी गोवाकडून मुंबई सिटीचा धुव्वा

इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) सहाव्या मोसमात एफसी गोवाने आघाडी घेतली. मुंबई फुटबॉल एरीनावर सहा गोलांचा पाऊस पडलेल्या लढतीत पूर्वार्धातील दोन गोलांच्या आघाडीनंतर बरोबरी होऊनही गोव्याने आणखी दोन गोल करीत पारडे फिरविले. गोव्याचा हा ४ सामन्यांतील दुसरा विजय आहे. दोन बरोबरींसह त्यांनी अपराजित कामगिरी राखली आहे. त्यांचे ८ गुण झाले. नॉर्थईस्ट युनायटेड एफसीचेही ८ गुण आहेत. यात गोव्याचा ५ (१०-५) असा ... Read More »

भारत ८ गड्यांनी विजयी

>> रोहित शर्माच्या ४३ चेंडूंत ८५ धावा रोहित शर्’ाच्या ४३ चेंडूंत तुफानी ८५ धावांच्या कप्तानी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने दुसर्‍या टी-ट्वेंटी सामन्यात बांगलादेशचा ८ गडी व २६ चेंडू राखून फडशा पाडत तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. बांगलादेशने विजयासाठी ठेवलेले १५४ धावांचे लक्ष्य भारताने १५.४ षटकांत केवळ २ गडी गमावून गाठले. पावसाच्या शक्यता लक्षात घेऊन भारताने गोलंदाजी स्वीकारली. लिटन ... Read More »