ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: November 7, 2019

पोलीस हाही माणूसच!

दिल्लीमध्ये पोलीस आणि वकील यांच्यामधील संघर्षातून दोन्ही गटांकडून काल आणि परवा निदर्शनांचे सत्र चालले. कायदा आणि सुव्यवस्थेचे हे दोन प्रमुख घटकच अशा प्रकारे आमनेसामने येणे ही अतिशय गंभीर बाब आहे. त्याहून अधिक गंभीर बाब आहे ती म्हणजे पोलिसांनी आपल्या वरिष्ठांनाही न जुमानता केलेली निदर्शने. देशाच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासामध्ये तरी अशा प्रकारे सेवेत असलेल्या पोलिसांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपल्याच आयुक्तांच्या कार्यालयासमोर ठिय्या ... Read More »

पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची सुरूवात?

शैलेंद्र देवळणकर उरीवरील हल्ल्यानंतरचा सर्जिकल स्ट्राईक, बालाकोटमधील एअर स्ट्राईक आणि नुकतीच झालेली लष्करी कारवाई यातून भारताच्या बदललेल्या भूमिकेचे संकेत स्पष्टपणाने मिळत आहेत. भारताला आता पाकव्याप्त काश्मीर पुन्हा मिळवायचा आहे. केंद्र सरकारमधील वरीष्ठ मंत्र्यांंनी याबाबत स्पष्ट वक्तव्येही केली आहेत. हा भूभाग भारताचाच असून जम्मू काश्मीरचा अविभाज्य घटक आहे. आता त्या दिशेने पावलेही पडू लागली आहेत. ऑगस्ट महिन्यात जम्मू काश्मीरच्या पुनर्रचनेसंदर्भात महत्त्वाचा ... Read More »

‘त्या’ ६२ पोलिसांना सेवेत नियमित करणार

>> मंत्र्यांच्या ओएसडींसाठी १२ वीची पात्रता ः मंत्रिमंडळाने दिली मान्यता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांच्या कार्यालयात ओएसडी नियुक्तीसाठी असलेल्या शैक्षणिक पात्रतेमध्ये १२ वी उत्तीर्ण किंवा डिप्लोमा अशी सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पोलीस खात्यातील ६२ पोलीस शिपायांना सेवेत नियमित करण्यास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना दिली. मंत्र्यांच्या कार्यालयात ... Read More »

राष्ट्रवादी विरोधकाची भूमिका बजावणार

>> महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेने सरकार स्थापन करावे ः शरद पवार महाराष्ट्र विधानसभेत राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका बजावणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी काल पत्रकार परिषदेत जाहीर केले. तसेच सरकार स्थापनेचा जनादेश मिळालेल्या भाजप व शिवसेना यांनी लवकरात लवकर सरकार स्थापन करावे, अशी मागणीही पवार यांनी यावेळी केली. शिवसेन नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांची ... Read More »

गृह निर्माण क्षेत्रासाठी २५ हजार कोटींचा निधी

>> निर्मला सीतारमण यांची घोषणा केंद्र सरकारने गृह निर्माण क्षेत्राला आर्थिक उभारी देण्यासाठी २५ हजार कोटी रुपयांची पॅकेज जाहीर केली आहे. नाजूक आर्थिक स्थितीमुळे रखडलेल्या १६०० गृह निर्माण प्रकल्पांना चालना देण्याची केंद्र सरकारची योजना असल्याचे या संदर्भात घोषणा करताना केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमन यांनी सांगितले. यामुळे रोजगारात वाढ होण्यासह सिमेंट, लोखंड, पोलाद यांना मागणी वाढणार असल्याचे त्या म्हणाल्या. १६०० प्रकल्पांमधून ... Read More »

मुख्यमंत्री रोजगार योजनेखाली १३८ अर्जांना मिळाली मान्यता

>> २०० जणांना मिळणार रोजगार ः तानावडे १९ च्या बैठकीत मुख्यमंत्री रोजगार योजनेखाली १३८ अर्जांना मान्यता दिली असून या अर्जदारांना ८.९० कोटी रुपयांचे वितरण केले जाणार असून २०० जणांना रोजगार मिळणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. मंडळाच्या टास्क फोर्स समितीची मागील दोन महिन्यात बैठक झाली नव्हती. स्वयंरोजगार योजनेमध्ये मान्यता देण्यात आलेल्या १३८ ... Read More »

मानव विरहीत वीज उपकेंद्रे उभारण्याचा प्रस्ताव ः काब्राल

राज्यात मानव विरहीत वीज उपकेंद्रे उभारण्याचा प्रस्ताव असून तुये, वेर्णा आणि साळगाव येथील नियोजित २२० केव्हीए वीज उपकेंद्रे उभारण्यासाठी जारी केलेल्या निविदा रद्द करण्याची विनंती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे, अशी माहिती वीज, अपारंपरिक ऊर्जा मंत्री नीलेश काब्राल यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. ३ वीज केंद्रांवर २०० कोटी खर्चणार देशभरात नवीन अत्याधुनिक यंत्रणांच्या साहाय्याने मानव विरहीत वीज उपकेंद्रे ... Read More »

नाफ्तावाहू जहाजामुळे मोठी दुर्घटना शक्य : कॉंग्रेस

>> १४ दिवसांनंतरही तोडग्याबाबत मुख्यमंत्र्यांना अपयशाचा दावा ‘नुशी नलिनी’ या नाफ्तावाहू जहाजामुळे गोव्यात भोपाळसारखी प्रचंड मोठी दुर्घटना होऊ शकते, अशी भीती प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल पत्रकार परिषदेत व्यक्त केली व या प्रकरणी गेल्या १४ दिवसांत कोणतीही उपाययोजना करण्यास अथवा तोडगा काढण्यास मुख्यमंत्र्यांना अपयश आल्याचा दावा केला. गेल्या दि. २२ ऑक्टोबर रोजी नुसी नलिनी हे नाफ्तावाहू जहाज भरकटत ... Read More »

म्हादईप्रश्‍नी नव्याने न्यायासाठीच एनजीटीपुढे घेतली धाव ः सरदेसाई

म्हादईच्या प्रश्‍नावर आपणाला कोणतेही राजकारण करायचे नसून म्हादईप्रश्‍नी नव्याने न्याय मागण्याची वेळ आली आहे. म्हणूनच आपण राष्ट्रीय हरित लवादापुढे (एनजीटी) धाव घेतल्याचे गोवा फॉरवर्ड पक्षाचे सर्वेसवा व आमदार विजय सरदेसाई यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. केंद्राने कर्नाटक सरकारच्या कळसा-भंडुरा या प्रकल्पाला मंजुरी दिल्यानेच त्यावर स्थगिती आणण्यासाठी आपण एनजीटीत धाव घेतली आहे. आम्ही योग्य असेच पाऊल उचलले असल्याने मुख्यमंत्र्यांनी त्याचे स्वागत ... Read More »

आक्रमक गोव्यासमोर मुंबईच्या बचावाची कसोटी

इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) जोर्गे कोस्टा यांच्या मार्गदर्शनाखालील मुंबई सिटी एफसीची गुरुवारी मुंबई फुटबॉल एरीनावर एफसी गोवाविरुद्ध कसोटी होत आहे. त्यावेळी गोव्याच्या भक्कम आक्रमणाचे आव्हान मुंबईच्या कमकुवत बचाव फळीसमोर असेल. कोस्टा यांचा गत मोसमातील चुका टाळण्याचा प्रयत्न राहील. गेल्या मोसमात मुंबईची चार वेळा गोव्याशी गाठ पडली. यात उपांत्य लढतीचा समावेश होता. मुंबईला तीन वेळा पराभूत व्हावे लागले. यात त्यांना १२ ... Read More »