Daily Archives: November 6, 2019

कोणाला फसवताय?

अखेर आपसातील सर्व मतभेद तात्पुरते विसरून राज्यातील विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी दिल्लीत जाऊन म्हादई प्रश्नावर केंद्रीय वन व पर्यावरण मंत्र्यांची भेट घेतली आणि केंद्राच्या त्या विषयाच्या हाताळणीबाबतचा गोव्याचा तीव्र रोष त्यांच्या कानी घातला हे स्वागतार्ह आहे. अशाच प्रकारची भक्कम एकजूट आम्हाला अपेक्षित होती आणि परवाच्या अग्रलेखातून आम्ही ती व्यक्तही केली होती. कर्नाटकमध्ये देखील म्हादईच्या विषयामध्ये तेथील सर्व राजकीय पक्ष आणि ... Read More »

व्हॉटस् ऍपवरील हेरगिरीचा धडा

ऍड. प्रदीप उमप व्हॉट्‌स ऍप असलेल्या मोबाईलमध्ये स्पायवेअर सोडून आपला खासगी डेटा सहज चोरता येऊ शकतो, एवढेच नव्हे तर आपल्यावर हेरगिरीही करता येते, ही माहिती अत्यंत धक्कादायक आहे. इस्राएलच्या एनएसओ ग्रुपने तयार केलेल्या या स्पायवेअरचा वापर केवळ सरकारे करतात असे खुद्द कंपनी सांगते. देशातील शेकडो ङ्गोन मे मध्ये हॅक केले गेल्याचे समोर आले असून, हे संशयाचे वातावरण दूर करणे ही ... Read More »

नाफ्ता हलविण्यासाठी सिंगापूरस्थित कंपनीची मदत

>> मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती : काम पूर्ण करण्यासाठी लागणार किमान १५ दिवस दोनापावल येथे समुद्रात अडकून पडलेल्या ‘नुशी नलिनी’ या जहाजातील नाफ्ता सुरक्षितपणे काढून दुसर्‍या जहाजात घालण्याचे काम हाती घेण्यास सिंगापुरस्थित एका कंपनीची मदत घेण्यात येणार असल्याचे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी सांगितले. हे काम पूर्ण करण्यास किमान १५ दिवस लागणार असल्याचे ते म्हणाले. सावंत यांनी याबाबत ... Read More »

खराब रस्ते, विकासकामांची माहिती आमदारांनी द्यावी

>> सर्व आमदारांना मुख्यमंत्र्यांची सूचना सर्व आमदारांनी त्यांच्या मतदारसंघातील खराब झालेले रस्ते व विकासकामे यासंबंधीची माहिती त्यांच्या संबंधित कार्यकारी अभियंत्यांकडून मिळवावी व ती आपणाकडे सुपूर्द करावी, असे आपण आमदारांना कळवले असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सांगितले. आमदारांकडून विकासकामांसंबंधीचा अहवाल आपणाला मिळावा. त्यानुसार आपणाला आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना देणे शक्य होणार असल्याचे आपण त्यांना कळवले असल्याचे ते म्हणाले. ... Read More »

रस्त्यांच्या हॉटमिक्स डांबरीकरणास चालू महिनाअखेरीस होणार सुरुवात

>> येत्या ८ दिवसात बुजविणार रस्त्यांवरील खड्डे राज्यातील विविध भागांतील रस्त्यांच्या हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरणाला नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरुवात केली जाणार असून रस्त्यांवरील खड्डे येत्या आठ दिवसात बुजविण्यात येणार आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. राज्यात गेल्या काही महिन्यात वरच्यावर पडलेल्या पावसामुळे रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामात अडचण निर्माण झाली. खड्डे बुजविण्याचे काम पुन्हा ... Read More »

दिल्ली पोलिसांचे अभूतपूर्व आंदोलन

येथील तीस हजारी न्यायालय संकुलाबाहेर गेल्या शनिवारी वकिलांकडून पोलिसांना झालेल्या मारहाणीविरुध्द कोणतीही कारवाई न केल्याप्रकरणी निषेध म्हणून काल दिल्ली पोलिसांनी हजारोंच्या संख्येने पोलीस मुख्यालयासमोर दिवसभर प्रचंड निदर्शने केली. या आंदोलनात पोलिसांसह पोलीस अधिकारी, त्यांचे कुटुंबिय व निवृत्त पोलीसही सहभागी झाले होते. या अभूतपूर्व घटनेमुळे संध्याकाळी दिल्लीचे पोलीस आयुक्त अमुल्य पटनाईक यानी घटनास्थळी जाऊन आंदोलनकर्त्या पोलिसांना कामावर रूजू होण्याचे आवाहन केले. ... Read More »

विविध ठिकाणी समुद्रात १२ जणांना वाचविले

राज्यात विविध किनार्‍यांवरील घटनांत खवळलेल्या समुद्रातील जोरदार लाटांमुळे पाण्यात ओढल्या गेलेल्या १२ जणांना काल वाचविण्यात आले. पर्यटकांनी समुद्रात जाऊ नये अशी सूचना करण्यात आली होती. तथापि, मंगळवारी राज्यातील विविध भागातील समुद्रात पर्यटक उतरले होते. यात देशी आणि विदेशी पर्यटकांचा समावेश होता. कोलवा, बेताळभाटी, बागा, पाळोळे, माजोर्डा, हरमल, कांदोळी या समुद्र किनार्‍यांवर १२ जणांना वाचविण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. ... Read More »

परप्रांतीय बोटींची बेकायदा मच्छिमारी; कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो यांनी मच्छिमारांसमवेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन कर्नाटक, महाराष्ट्र या परराज्यातील मच्छीमारी बोटींकडून राज्यात करण्यात येणार्‍या एलईडी, बुल ट्रॉलिंग पद्धतीच्या मच्छीमारीवर कारवाई करण्यासाठी अधिसूचना जारी करून कारवाई सुरू करण्याची मागणी केली. कांदोळी येथे स्थानिक मच्छीमारांनी कर्नाटकातील एक मच्छीमारी बोट पकडल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पर्वरी येथे एक खास बैठक घेतली होती. त्यावेळी बुल ... Read More »

गतविजेत्या बंगळुरूला प्रतीक्षा गोल करण्याच्या फॉर्मची

बंगळुरू एफसीने इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) गतमोसमात अतुलनीय फॉर्म प्रदर्शित करीत विजेतेपदाला गवसणी घातली. त्याच बंगळुरूचा बचाव यंदा सुरवातीलाच ढिसाळ होत आहे. सलग तिसर्‍या सामन्यात त्यांना बरोबरी पत्करावी लागली. रविवारी जमशेदपूर एफसीविरुद्ध जेआरडी टाटा क्रीडा संकुलात मोसमात तिसर्‍यांदा त्यांची बरोबरी झाली. गेल्या दोन मोसमांत मिळून याच बंगळुरूच्या केवळ पाच बरोबरी झाल्या होत्या. पहिल्या तिन्ही सामन्यांत गतविजेत्यांना गोल करण्याची संधी मिळाली ... Read More »

कांगारूंचा पाकला हिसका

>> दुसर्‍या टी-ट्वेंटीत ७ गड्यांनी विजय स्टीव स्मिथ याच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने काल मंगळवारी कॅनबेरावर पाकिस्तानचा ७ गडी राखून सहज पराभव केला. माजी कर्णधाराने ५१ चेंडूंत नाबाद ८० धावा कुटत संघाला तीन सामन्यांच्या मालिकेत १-० असे आघाडीवर नेले. सिडनीतील पहिला सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. डेव्हिड वॉर्नरला लवकर बाद करणे श्रीलंकेला जमले नव्हते. पाकिस्तानने हे करून दाखवले. परंतु, ... Read More »