Daily Archives: November 4, 2019

आधी एक व्हा!

म्हादईचा विषय धसास लावायचा असेल आणि गोव्याचे न्याय्य आक्षेप केंद्र सरकारच्या कानी घालायचे असतील तर या घडीला राज्य सरकार आणि विरोधी पक्ष यांनी एकत्र येऊन आपली भक्कम एकजूट दाखवण्याची गरज आहे. म्हादई प्रश्‍नी संपूर्ण गोवा एकसंध आहे आणि एकमुखाने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या निर्णयाच्या विरोधात उभा आहे असा संदेश दिल्ली श्वरांना जायला हवा होता, परंतु येथे तर नेमके उलटे घडताना दिसते ... Read More »

खेळ समज आणि वास्तवाचा…

ल. त्र्यं. जोशी महायुतीजवळ सर्व काही होते. राष्ट्रवादीजवळ पवारास्र होते. कॉंग्रेसजवळ काहीच नव्हते. त्या पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांनी स्वबळावर मिळविलेल्या जागा त्या पक्षाच्या अंगभूत शक्तीचे प्रतीक आहे असे म्हणावे लागेल. आपल्या व्यक्तिगत आयुष्यात काय किंवा सामाजिक जीवनात काय, नेहमीच समज (परसेप्शन) आणि वास्तव यांचा खेळ सुरू असतो. मग महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक त्याला अपवाद कशी असू शकेल? एकवीस तारखेला मतदानोत्तर पाहण्यांचे निकाल ... Read More »

म्हादईप्रश्‍नी सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज जावडेकर यांना भेटणार

केंद्रीय वन, पर्यावरण व हवामान बदल खात्याने जी ‘ईसी’ (पर्यावरणीय मंजुरी) दिलेली आहे ती कळसा व भांडुरा प्रकल्पाला नसून ती अन्य कुठल्या तरी वेगळ्याच प्रकल्पासाठी असल्याचा खुलासा काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राजभवनवर पत्रकारांशी बोलताना केला. सोमवारी (आज) सर्वपक्षीय शिष्टमंडळ नवी दिल्लीला जाऊन या प्रकरणी केंद्रीय वन, पर्यावरण व हवामान बदल खात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेणार असून ... Read More »

समुद्री लाटांपासून वीजनिर्मिती प्रकल्पावर सरकारचा विचार

सरकार समुद्री लाटांपासून वीज निर्मिती करणार्‍या टायडल पॉवर वीज प्रकल्पावर विचार विनिमय करीत आहे. केंद्र सरकारकडून मान्यता मिळाल्यानंतर टायडल पॉवर प्रकल्पाच्या अभ्यास करण्यासाठी एक शिष्टमंडळ इस्त्रायलला भेट देणार आहे, अशी माहिती वीज मंत्री निलेश काब्राल यांनी काल दिली. गोवा राज्याला सध्या इतर राज्यांकडून वीज खरेदी करावी लागत आहे. गोव्याला विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविण्यासाठी विविध पर्यायावर विचार केला जात आहे. राज्यात ... Read More »

नाफ्ता दुसर्‍या जहाजात घालण्याचे काम आजपासून सुरू

अरबी समुद्रात भरकटल्यानंतर दोनापावल येथे समुद्रात अडकून पडलेल्या नू शी नलिनी या नाफ्तावाहू जहाजातील नाफ्ता काढून तो दुसर्‍या जहाजात घालण्याचे काम सोमवारी (आज) सुरू होणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल राजभवनवर पत्रकारांना सांगितले. हवामान जर चांगले राहिले तर आज सकाळपासून नाफ्ता जहाजातून काढून दुसर्‍या जहाजात घालण्याचे काम सुरू होणार असल्याचे सावंत म्हणाले. नाफ्ता काढण्याची सगळी तयारी झालेली आहे. ... Read More »

जमिनींच्या झोन बदलाबाबत नगरनियोजन खात्याकडून नोटीस

नगरनियोजन खात्याने (टीसीपी) राज्यातील सुमारे १३ लाख २९ हजार चौरस मीटर शेत, बागायती, लागवडीखालील जमिनीचे नगर नियोजन खात्याच्या नवीन १६ ब कलमाखाली सेंटलमेंट विभागात बदलण्याबाबत नोटीस जारी केली आहे. राज्यातील नगरनियोजन कायद्यात दुरुस्ती करून जमिनीचे झोन बदलण्यासाठी १६ ब कलमाखाली तरतूद करण्यात आली आहे. नगरनियोजन खात्याकडे जमीन मालकांकडून या कलमाखाली जमिनीचे झोन बदलण्यासाठी अर्ज केले जात आहेत. नगर नियोजन मंडळाच्या ... Read More »

शिवसेनेला १७० आमदारांचा पाठिंबा

>> संजय राऊत : भाजपशी चर्चा मुख्यमंत्रिपदाबाबतच महाराष्ट्रात सरकार स्थापनेचा तिढा कायम असतानाच काल शिवसेनेेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी शिवसेनेला १७० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करून त्या जोरावर शिवसेना सरकार स्थापन करण्यास सक्षम असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. या पार्श्‍वभूमीवर शिवसेना भाजपकडे केवळ मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरच चर्चा करेल असेही त्यांनी यावेळी सांगितले. ‘आम्हाला १७० हून अधिक आमदारांचा पाठिंबा आहे. ही ... Read More »

सत्यपाल मलीक यांनी घेतली राज्यपालपदाची शपथ

राजभवनवर काल झालेल्या एका सोहळ्यात सत्यपाल मलीक (७३) यांनी गोव्याचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रदीप नंद्रजोग यांनी त्यांना शपथ दिली. राज्यपालांनी इंग्रजीतून शपथ घेतली. शपथग्रहण सोहळ्याला मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे, घनकचरा व्यवस्थापन खात्याचे मंत्री मायकल लोबो, कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पावस्कर, सभापती राजेश पाटणेकर, ... Read More »

कांदा ७० रु., कोथंबीर ५० रु.

>> पणजी मार्केटमध्ये दर भडकले राजधानी पणजीतील मार्केटमध्ये कांद्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. रविवारी पणजी मार्केटमध्ये कांद्याची ७० रुपये प्रति किलो आणि सहकार भांडाराच्या भाजी विभागात ६० रुपये प्रति किलो दराने विक्री केली जात होती. ओल्या कोथंबिरच्या दरात मोठी वाढ झाली आहे. कर्नाटक, महाराष्ट्र राज्यात आलेल्या पुरानंतर गोव्यातील कांद्यांच्या दरात वाढ झाली होती. कांद्याचा दर ६० रुपये प्रति ... Read More »

बांगलादेशचा टीम इंडियाला धक्का

>> धवन-राहुलची संथगती फलंदाजी नडली >> खलील अहमदचा स्वैर मारा बांगलादेशने पहिल्या टी-ट्वेंटी सामन्यात टीम इंडियाचा ७ गडी व ३ चेंडू राखून पराभव केला. भारताचा डाव १४८ धावांपर्यंत मर्यादित ठेवल्यानंतर बांगलादेशने रहीमच्या समयोचित अर्धशतकावर आरुढ होत विजयाची चव चाखली. आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटीमध्ये बांगलादेशने नवव्या प्रयत्नात टीम इंडियावर मिळविलेला हा पहिलाच विजय ठरला. आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटीमधील हा १००० वा सामना होता. बांगलादेशचा कर्णधार ... Read More »