ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: November 2, 2019

हा घोळ निस्तरा

नव्या केंद्रीय मोटर वाहन कायद्यानुसार बंधनकारक करण्यात आलेल्या उच्च सुरक्षा क्रमांक पट्टीच्या अंमलबजावणीचा राज्यात अपेक्षेनुसार बोजवारा उडाला आहे. वाहनचोरी रोखण्यासाठी अशा प्रकारच्या उच्च सुरक्षा क्रमांकपट्‌ट्या बसवण्यामागील केंद्र सरकारचा हेतू जरी उदात्त असला, तरी त्यांच्या अंमलबजावणीचा जो काही पोरखेळ गोव्यात सध्या चाललेला आहे तो सरकारसाठी लज्जास्पद आहे. मुळात लक्षावधी वाहनसंख्या असलेल्या गोव्यामध्ये अशा प्रकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेची कार्यवाही करीत असताना जो कोणी ... Read More »

असा झाला बगदादीचा खात्मा

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) अमेरिकेच्या या कारवाईमुळे सध्या तरी आयसीसचे कंबरडे मोडले आहे यात शंकाच नाही. जिहादी दहशतवादाविरुद्ध लढणार्‍या अमेरिकेसाठी हा डावपेचात्मक आणि सामरिक विजय आहे. लादेन आणि बगदादीविरुद्धच्या मोहिमांमध्ये खूपच समानता आहे, पण यामुळे जिहादी दहशतवाद संपुष्टात आलेला नाही. आजही इस्लामिक स्टेट १८ देशांमध्ये कार्यरत आहे. २६/२७ ऑक्टोबर २०१९च्या रात्री सीरियाच्या इडलीब प्रांतातील बारिश गावामधल्या लोकांना हेलिकॉप्टर्सच्या रोटरी विंग्जच्या ... Read More »

म्हादई प्रश्‍नावरून पर्वरीत महामार्ग रोखला

>> नागरिकांसह विरोधी पक्ष नेत्यांचा सहभाग, उपमुख्यमंत्र्यांना निवेदन कळसा, भांडुरा प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने परस्पर पर्यावरण परवाना दिल्याबद्दल काल शुक्रवारी (दि. १) सर्व विरोधी पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी आणि संतप्त जनतेने येथील जल संसाधन खात्यावर मोर्चा आणला. यावेळी आमदार रोहन खंवटे, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई, महिला कॉंग्रेस अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो, मगोचे रत्नकांत म्हार्दोळकर, गोवा सुरक्षा मंचचे हृदयनाथ शिरोडकर, प्रोग्रेसिव्ह फ्रंट ... Read More »

म्हादई नदीचा भाजपकडून सौदा ः चोडणकर

>> पेडण्यात कॉंग्रेसतर्फे म्हादईप्रश्‍नी आंदोलन केंद्रातील आणि गोव्यातील भाजप सरकार गोव्याचे पर्यावरण नष्ट करु पाहत आहे. कर्नाटकातील निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्य व केंद्र सरकारने म्हादई नदीचा सौदा करू पहात आहे. याला कॉंग्रेस पक्षाचा तीव्र विरोध करेल असे प्रतिपादन गोवा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पेडणे येथे केले. कळसा भांडुरा प्रकल्पाला केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने पर्यावरण दाखला दिल्याप्रकरणी गोवा कॉंग्रेसतर्फे ... Read More »

जावडेकरांनी दिली सोमवारी वेळ : नेरी

कळसा भांडुरा प्रकल्पाला पर्यावरणासंबंधीचे दिलेले पत्र मागे घेण्याच्या मागणीसाठी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळ दि. ४ नोव्हेंबर रोजी दिल्लीला जाणार आहे. त्यांना पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सकाळी ११ वाजता भेटण्याची वेळ दिली असल्याचे जलस्रोतमंत्री फिलीप नेरी रॉड्रीगीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पर्वरी येथे रस्ता रोको आंदोलन करून लोकांना अडचणी आणल्याचे समजताच आपण त्यांनी आंदोलन मागे घ्यावे ... Read More »

…तर गोव्याची बाजू भक्कम झाली असती ः कामत

म्हादई प्रश्‍नावर गोवा विधानसभेचे खास अधिवेशन घेऊन ४० आमदारांच्या पाठिंब्याने म्हादईबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करणारा ठराव संमत करून त्या ठरावाची प्रत सर्वपक्षीय शिष्टमंडळाद्वारे केंद्रीय वन आणि पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांना सादर केली असती तर गोव्याची बाजू आणखीन मजबूत झाली असती, असे मत विरोधी पक्षनेते तथा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिगंबर कामत यांनी पत्रकारांशी बोलताना काल व्यक्त केले. म्हादईच्या प्रश्‍नावर गोव्याचे हित ... Read More »

बेकायदा खाण प्रकरणाच्या तपासासाठी खास समिती

मडगाव येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने राज्यातील बेकायदा खाणी प्रकरणी खटला तांत्रिक आधारावर फेटाळल्याच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने प्रलंबित बेकायदा खाण प्रकरणाची तपासणी करण्यासाठी खाण सचिवांच्या अध्यक्षतेखाली एका खास समितीची नियुक्ती केली आहे. न्यायमूर्ती शहा यांच्या बेकायदा खाणींबाबतच्या अहवालानंतर राज्यातील बेकायदा खाणींविरोधात कारवाईला सुरुवात करण्यात आली. राज्य सरकारने बेकायदा खाण प्रकरणाच्या तपासणीसाठी गुन्हा अन्वेषण विभागात खास तपासणी विभागाची स्थापना करून बेकायदा ... Read More »

‘क्यार’मुळे दोन कोटींचे नुकसान : कृषिमंत्री

काही दिवसांपूर्वी राज्यात आलेल्या ‘क्यार’ वादळामुळे भातशेती व सुपारी पिकाचे मिळून अंदाजे दीड ते दोन कोटींचे नुकसान झाल्याची माहिती कृषिमंत्री बाबू कवळेकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. वरील वादळामुळे ५०० हेक्टर जमिनीतील कृषी पिकाचे नुकसान झालेले असून त्याचा फटका १०११ शेतकर्‍यांना बसला आहे. या शेतकर्‍यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. तसेच गेल्या पावसाळ्यात आलेल्या पुरामुळे २ हजार हेक्टर ... Read More »

गोव्याची नॉर्थईस्टशी बरोबरी

>> एफसी गोवाच्या सैमीनलेन डुंगलला रेड कार्ड इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) शुक्रवारी एफसी गोवा आणि नॉर्थईस्ट युनायटेड एफसी यांच्यातील वादग्रस्त लढतीत २-२ अशी बरोबरी झाली. दोन्ही संघांनी अथक प्रयत्न करीत सामन्यात जोरदार चुरस निर्माण केली. भरपाई वेळेत सैमीनलेन डुंगल या गोव्याच्या बदली खेळाडूला रेड कार्ड दाखविण्यात आले, पण दुसरा बदली खेळाडू मनवीर सिंगने हेडिंगवर गोल करीत संघाचा पराभव टाळला. येथील ... Read More »

धेंपोचे कळंगुटवर चार गोल

धेंपो स्पोटर्‌‌स क्लबने आपली विजयी घोडदौड सुरूच ठेवताना काल शुक्रवारी कळंगुट असोसिएशनला ४-० असे तुडवले. गोवा प्रोफेशनल लीग स्पर्धेतील हा सामना म्हापसा धुळेर मैदानावर खेळविण्यात आला. अल्बर गोन्साल्विस याने दोन तर पेद्रू गोन्साल्विस व बीवन डिमेलो यांनी प्रत्येकी एक गोल केला. कळंगुटच्या सिद्धांत शिरोडकर व मारिओ मास्कारेन्हस यांनी मिळालेल्या संधी वाया घालवल्या. दुसरीकडे धेंपोचा पहिला प्रयत्नदेखील यशस्वी होऊ शकला नाही. ... Read More »