Daily Archives: November 1, 2019

काश्मीरचे नवे पर्व

आजपासून जम्मू आणि काश्मीरच्या जनतेच्या जीवनातील एका नव्या पर्वाचा आरंभ होत आहे. घटक राज्याचा दर्जा संपुष्टात येऊन दोन संघप्रदेशांमध्ये झालेली विभागणी, विशेष राज्याचा संपुष्टात आलेला दर्जा किंवा त्यामुळे देशाच्या इतर भागांतील नागरिकांना त्या प्रदेशांमध्ये मालमत्ता खरेदीचा मिळालेला अधिकार आदी गोष्टींचे ओरखडे जरी काश्मिरी जनतेच्या मनावर ओढले गेले असले, तरी या बदलांतून ज्या अनेक चांगल्या गोष्टी त्यांच्या वाट्याला यापुढे येणार आहेत, ... Read More »

सावरकरांचे दलित चळवळीतील योगदान

शंभू भाऊ बांदेकर सावरकरांनी अस्पृश्यतेची दरी कमी करण्यासाठी आणि सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी मंदिर प्रवेश आणि सहभोजनाचे कार्यक्रम ही दोन माध्यमे प्राधान्यक्रमाने निवडली. सन १९२५ च्या विठ्ठल मंदिरातील वार्षिक गणेशोत्सवात पारावर व्याख्यान देऊन त्यांनी या गोष्टीचा मोठा उहापोह केला व त्यानंतर ते दलित चळवळीचे अग्रणी ठरले. त्यांच्या या कार्याच्या निमित्ताने त्यांना शतशः अभिवादन! स्वातंत्र्यवीर बॅ. विनायक दामोदर सावरकर यांच्या कार्याचे ... Read More »

म्हादईप्रश्‍नी सर्वपक्षीय शिष्टमंडळ सोमवारी दिल्लीस जाणार

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळ म्हादई प्रश्‍नी केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री प्रकाश जावडेकर यांची सोमवार ४ नोव्हेंबरला नवी दिल्ली येथे भेट घेणार आहे. यावेळी कर्नाटकला कळसा – भांडुरा पाणी प्रकल्पाला दिलेले पर्यावरणासंबंधीचे पत्र मागे घेण्याची तसेच कर्नाटकाच्या पाणी प्रकल्पाची संयुक्त पाहणी करण्याची मागणी केली जाणार आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने कर्नाटकला कळसा भांडुरा पाणी प्रकल्पाला पर्यावरणासंबंधीचे एक पत्र ... Read More »

पर्यावरण दाखल्याचा अभ्यास सुरू ः कामत

कॉंग्रेस पक्षाचा कायदा विभाग केंद्रीय पर्यावरण व वन मंत्र्यालयाने म्हादई प्रकरणी कर्नाटकाला दिलेल्या पत्राचा अभ्यास करीत आहे. कायदा विभागाच्या शिफारशीनुसार पुढील कृती केली जाणार आहे, असे विरोधी पक्षनेते तथा कॉंग्रेसचे नेते दिगंबर कामत यांनी पत्रकारांशी बोलताना काल सांगितले. गोवा फॉरवर्डने म्हादई प्रश्‍नी न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्‍वभूमीवर विचारलेल्या प्रश्‍नाच्या उत्तरात विरोधी पक्षनेते कामत यांनी वरील माहिती दिली. कॉंग्रेस ... Read More »

म्हादई जनजागृती अभियानात कॉंग्रेसची आजपासून निदर्शने

गोवा प्रदेश कॉंग्रेस पक्षातर्फे म्हादई जनजागृती अभियानाच्या पहिल्या टप्प्यात उत्तर गोव्यात तालुका पातळीवर निदर्शने केली जाणार आहेत. आज शुक्रवार दि. १ नोव्हेंबर २०१९ पासून पेडणे तालुक्यातून म्हादई जनजागृतीसाठी निदर्शने केली जाणार आहेत, अशी माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी कॉंग्रेस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल दिली. म्हादई जनजागृती अभियानाच्या पहिल्या टप्प्यात उत्तर गोव्यात तालुका पातळीवर निदर्शने करून संबंधित उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन ... Read More »

मडगावात नंबर प्लेटचे काम थांबवण्याचा आदेश

ठेकेदाराकडून नियमबाह्य नंबर प्लेट; जिल्हाधिकार्‍यांकडून आढावा उच्च सुरक्षा नंबर प्लेट चुकीच्या बनविण्यात येत असल्याच्या तक्रारी आल्यावरून दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी काल वाहतूक खात्याच्या अधिकार्‍यांची तातडीने बैठक घेत या प्लेट बसवण्याचे काम बंद ठेवण्याचा आदेश दिला. ठेकेदाराकडून नंबर प्लेटबाबत गाडीच्या क्रमांकाची जाडी, अक्षराची जुळणी चुकीच्या पद्धतीने करण्यात येत आहे. तसेच ह्या प्लेट स्क्रूने बसविल्या जातात. त्या वाहतूक नियमात बसत ... Read More »

कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस

वाहतूक खात्याने राज्यातील वाहनांवरील उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट्स (एचएसआरपी) बसविण्याबाबत गोंधळाच्या तक्रारीमुळे कंत्राटदार मेसर्स रियल मॅझोन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. राज्यात वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट्‌स बसविण्याचे गेली कित्येक वर्षे रखडलेले काम अखेर ऑक्टोबर महिन्यात सुरू करण्यात आले. नवीन वाहन नोंदणी प्लेट्‌स बसविण्याचे काम रियल मॅझोन इंडिया कंपनीला देण्यात आले आहे. कंत्राटदाराच्या नवीन प्लेट्‌स बसविण्याच्या कामाबाबत ... Read More »

ऑक्टोबरमध्ये पणजीत यंदा सर्वाधिक पाऊस

राजधानी पणजी शहरात यावर्षी ऑक्टोबर महिन्यात आत्तापर्यतच्या सर्वाधिक विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये पणजीत २०.०४ इंच एवढ्या विक्रमी पावसाची नोंद झाली असून १३ वर्षांपूर्वीचा म्हणजे ऑक्टोबर २००६ मध्ये पडलेल्या १५.४१ इंच पावसाच्या रिकोर्डला मागे टाकले आहे. दरम्यान, राज्यभरात ऑक्टोबर महिन्यात २१.२९ इंच पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी जून महिन्यातसुद्धा एवढ्या पावसाची नोंद झालेली नाही. तेरा वर्षापूर्वी म्हणजेच ... Read More »

इस्त्राईल तंत्रज्ञानाद्वारे व्हॉट्‌सऍपची हेरगिरी

केंद्राने मागितले स्पष्टीकरण, एनएसओ ग्रुपविरोधात गुन्हा इस्रायलच्या स्पायवेअर पिगाससच्या माध्यमातून भारतीय पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांची हेरगिरी केल्याप्रकरणी केंद्र सरकारने व्हॉट्सऍपला ४ नोव्हेंबरपर्यंत उत्तर देण्यास बजावले आहे. भारतीय पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांची या धोकादायक स्पायवेअरच्या माध्यमातून हेरगिरी करण्यात आल्याचे व्हॉट्सऍपने कबूल केल्यानंतर त्यांचा त्यावर खुलासा मागण्यात आला आहे. किती भारतीयांची हेरगिरी करण्यात आली, हे व्हॉट्सऍपने सांगितलेले नाही. याबाबत व्हॉट्सऍपने म्हटले आहे ... Read More »

गुवाहाटीतील कामगिरी उंचावण्याचा गोव्याचा निर्धार

नॉर्थईस्ट युनायटेडशी आज होणार सामना इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) शुक्रवारी एफसी गोवा आणि नॉर्थईस्ट युनायटेड एफसी यांच्यात लढत होत आहे. हे दोन्ही संघ अद्याप अपराजित आहेत. येथील इंदिरा गांधी ऍथलेटिक स्टेडियमवर एफसी गोवाला मागील मोसमांत समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे हे अपयश धुवून काढण्याचा गोव्याचा निर्धार आहे. रॉबर्ट जार्नी यांच्या मार्गदर्शनाखाली नॉर्थईस्टने दोन सामन्यांतून चार गुण मिळवित प्रभावी प्रारंभ ... Read More »