Daily Archives: October 10, 2019

…हा हन्त हन्त!

गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा श्रीमान विजय सरदेसाई यांना आपण गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारला दिलेल्या पाठिंब्याचा आता पश्चात्ताप होऊ लागल्याचे त्यांच्या ताज्या वक्तव्यावरून दिसते. फातोर्ड्यात आपल्या कार्यकर्त्यांपुढे बोलताना नुकतीच त्यांनी ही आपल्या मनात दडलेली खंत व्यक्त केली. ‘पर्रीकर सरकारला पाठिंबा देण्यात आमची चूक झाली का?’, ‘पर्रीकरांच्या मृत्यूनंतर नव्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देण्यातही आमची चूक झाली का?’ असे आत्मचिंतनपर प्रश्न ... Read More »

शेख हसिनांच्या दौर्‍याचे महत्त्व

शैलेंद्र देवळणकर बांगलादेशच्या पंतप्रधान शेखर हसीना यांचा भारतदौरा नुकताच संपन्न झाला. या दौर्‍यामध्ये जवळपास सात करारांवर सह्या झालेल्या आहेत. त्यापैकी सर्वांत महत्त्वाचा करार म्हणजे भारत आता बांगला देशाकडून एलपीजी घेणार आहे. त्याचा उपयोग पूर्वोत्तर राज्यांसाठी होणार आहे. याखेरीज दोन्ही देशातील व्यापार वाढवताना व्यापारतूट कमी करण्यासंदर्भातील उपाययोजनांवरही या दौर्‍यादरम्यान विस्तृत चर्चा झाली. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा चार दिवसीय भारत दौरा ... Read More »

वाहनांवरील रस्ता करात ५० टक्के कपात

>> मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयास मान्यता >> येत्या ३१ डिसेंबरपर्यंतच कपात लागू राज्यात नव्याने खरेदी करण्यात येणार असलेल्या सर्व प्रकारच्या वाहनांवरील रस्ता कर ५० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ही कपात ३१ डिसेंबर २०१९ पर्यंतच लागू राहणार असल्याचे मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यानी सांगितले. यासंबंधीची अधिसूचना काढल्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर ह्या तीन महिन्यांच्या काळात खरेदी करण्यात येणार ... Read More »

वाहनांच्या रस्ता कर कपातीच्या निर्णयाचे विक्रेत्यांकडून स्वागत

नव्याने खरेदी केल्या जाणार्‍या सर्व प्रकारच्या वाहनांवरील रस्ता कर ५० टक्क्यांनी कमी करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे गोव्यातील वाहन विक्रेत्यांची संघटना स्वागत करीत असल्याचे काल संघटनेचे अध्यक्ष प्रशांत जोशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील वाहन विक्री उद्योगाला चालना मिळण्यास मदत होणार असल्याचे ते म्हणाले. ३१ डिसेंबरपर्यंतच तरी ही करकपात लागू राहणार असली तरी ह्या कपातीचा वाहन विक्री उद्योगाला ... Read More »

रस्ता शुल्क कपात निर्णयाबाबत गोवा फॉरवर्डकडून संशय व्यक्त

राज्य मंत्रिमंडळाच्या आगामी तीन महिन्यांसाठी रस्ता शुल्कात ५० टक्के सूट देण्याच्या निर्णयाबाबत गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी पत्रकार परिषदेत संशय व्यक्त केला. नवीन वाहन नोंदणीसाठी आगामी तीन महिन्यांसाठी रस्ता शुल्कात ५० टक्के सूट देण्याचा निर्णय कुणाच्या फायद्यासाठी घेतला याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्टीकरण करण्याची गरज आहे, असेही कामत यांनी सांगितले. राज्याची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने वित्त खात्याने ... Read More »

गोव्यासाठी टपाल खात्याचे स्वतंत्र सर्कल हवे ः मुख्यमंत्री

>> केंद्र सरकारकडे प्रयत्न करणार टपाल खात्याचे गोव्यासाठी स्वतंत्र सर्कल नसल्याने गोमंतकीयांना टपाल खात्यात नोकर्‍या मिळत नाहीत. सध्या राज्यातील टपाल खात्यात फक्त २ टक्के एवढेच गोमंतकीय आहेत व ही परिस्थिती बदलायला हवी, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सांगितले. तसेच टपाल खात्याचे गोव्यासाठी स्वतंत्र सर्कल स्थापन करण्यात यावे यासाठी केंद्र दरबारी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. जागतिक टपाल दिनानिमित्त ... Read More »

सुर्लातील भीषण अपघातात कारचालक महिला ठार

न्हावेली – सुर्ला मुख्य रस्त्यावरील घोडेश्वर जवळ काल सकाळी कार व प्रवासी बस यांच्यात टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातात सौ. नविता सुबोध आमोणकर (३७) या सुर्ला येथील महिलेचा मृत्यू झाला. डिचोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी सव्वा दहाच्या सुमारास हा अपघात झाला. नविता आमोणकर या जीए ०४ सी – ०८१५ या कार ने घराकडून साखळी येथे त्यांच्या दुकानावर जात असताना समोरून ... Read More »

पोलीस, अग्निशमन, आरोग्य सेवेसाठी एकच टोल फ्री ११२ क्रमांकाचा शुभारंभ

राज्यातील पोलीस, अग्निशमन, आरोग्य सेवेसाठी असलेल्या वेगवेगळ्या टोल फ्री क्रमांकांना पर्याय म्हणून सर्वांसाठी एकच ११२ हा आपत्कालीन क्रमांक गोव्यात लागू करण्यात आला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते या आपत्कालीन ११२ क्रमांकाचा शुभारंभ पोलीस मुख्यालयात काल करण्यात आला. एकाच आपत्कालीन क्रमांकामुळे गरजूंना वेळेवर मदत मिळण्यास मदत होणार आहे. नवीन ११२ या आपत्कालीन क्रमांकांच्या सेवेच्या दुसर्‍या टप्प्यात रुग्णवाहिका सेवेचा समावेश ... Read More »

भारत-दक्षिण आफ्रिका दुसरी कसोटी आजपासून

भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून गहुंजे स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे. पहिला सामना जिंकून तीन सामन्यांच्या या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली असून दुसर्‍या सामन्यासह मालिका खिशात घालण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. पहिल्या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजी करून धावांचा डोंगर उभारणे संघाला शक्य झाले होते. पहिल्या कसोटीप्रमाणेच दुसर्‍या कसोटीतही नाणेफेक ... Read More »

लंकेचा पाकला व्हाईटवॉश

पाहुण्या श्रीलंकेने पाकिस्तानला त्याच्याच भूमीवर लोळविण्याचा पराक्रम केला. काल संपलेल्या टी-ट्वेंटी मालिकेतील तिसरा व शेवटचा सामना १३ धावांनी जिंकून श्रीलंकेने पाकिस्तानसा ‘व्हाईटवॉश’ दिला. श्रीलंकेच्या दुसर्‍या फळीतील संघाकडून झालेल्या या मानहानीकारक पराभवामुळे टी-ट्वेंटीमध्ये प्रथम क्रमांकावर असलेल्या पाकिस्तानच्या संघावर आजी-माजी खेळाडूंनी टीकेची झोड उठवली आहे. काल तिसर्‍या टी-ट्वेंटी सामन्यात श्रीलंकेचा डाव ७ बाद १४७ धावांत रोखल्यानंतरही पाकिस्तानला केवळ ६ बाद १३४ धावांपर्यंतच ... Read More »