Daily Archives: October 9, 2019

ही तर बेफिकिरी!

राज्यामध्ये यंदा डेंग्यूने कहर मांडला आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांवर त्याचे खापर फोडून नामानिराळे झाले. ही अधिकृत आकडेवारी पाहा- गेल्या जानेवारीपासून सप्टेंबर अखेरपर्यंत राज्यात डेंग्यूचे तब्बल १४६८ संशयित रुग्ण आढळले. त्यातील २१७ रुग्ण डेंग्यूबाधित असल्याचे सिद्ध झाले. डेंग्यूची लागण झालेल्या सात रुग्णांचा आतापर्यंत बळी गेला. मात्र, हे मृत्यू केवळ डेंग्यूने झालेले नसून इतर आरोग्य समस्यांमुळे ओढवल्याचा ... Read More »

समाजमाध्यमांवर नियंत्रणाची गरज

ऍड. प्रदीप उमप पूर्वीच्या तुलनेत आज समाजमाध्यमांचे प्रस्थ वाढू लागले आहे. समाजमाध्यमे संख्येने वाढली आणि त्याचा चांगला उपयोग होतो आहे म्हणताना त्या माध्यमातून होणारे गैरप्रकार वाढीस लागले. इतके की त्यात आधी पोलिसांना नंतर न्यायालयाही हस्तक्षेप करावा लागत आहे. समाज माध्यमातून ट्रोल करणे, ट्रोल होणे हे काही नवीन नाही; पण समाज माध्यमांचा वापर करून आक्षेपार्ह मजकूर प्रसृत करण्याचे प्रमाण वाढले आहे. ... Read More »

पहिले राफेल विमान भारताच्या ताब्यात

फ्रान्सने काल एका विशेष सोहळ्यात बहुप्रतीक्षित पहिले राफेल जेट लढाऊ विमान भारताला सुपूर्द केले. हे विमान अधिकृतपणे स्वीकारण्यासाठी तेथे गेलेले भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हे विमान स्वीकारल्यानंतर या विमानाची पूजा केली. या सोहळ्यावेळी फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लोरेन्स पार्ली याही उपस्थित होत्या. भारताने ३६ राफेल विमाने खरीदण्यासाठी ५९ हजार कोटी रुपये व्यवहाराची ऑर्डर २०१६ साली दिली होती. ३६ पैकी चार विमाने ... Read More »

भाजप सरकार स्थिर ः सावंत

भाजप सरकारची लोकप्रियता वाढत असल्याने काही नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याने वैफल्यग्रस्त बनल्याने बिनबुडाची व दिशाभूल करणारी वक्तव्ये ते करीत आहेत. भाजपचे सरकार स्थिर असून वैफल्यग्रस्त नेत्यांच्या वक्तव्याकडे आपण गंभीरपणे पाहत नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना येथे काल सांगितले. दरम्यान, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांनी फातोर्डा येथे एका कार्यक्रमात भाजप सरकार टिका ... Read More »

इफ्फीत कोकणी चित्रपटाचा समावेश करावा ः कामत

इफ्फीच्या इंडियन पॅनोरमा विभागासाठी यंदा एकही कोकणी चित्रपटाची निवड झाली नसल्याबद्दल गोमंतकीय चित्रपट निर्माते व दिग्दर्शकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत असतानाच काल विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनीही याबाबत मत व्यक्त करताना ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे ट्विट केले आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पॅनोरमा विभागासाठी एकही कोकणी चित्रपटाची निवड न होणे ही अत्यंत दुर्दैवी अशी घटना असल्याचे कामत यांनी ट्विटमधून ... Read More »

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री सावंत प्रचार करणार

>> ५ दिवस सहभाग ः बहुतेक मंत्रीही जाणार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपचे बहुतेक मंत्री, आमदार आणि भाजपचे स्थानिक ज्येष्ठ नेते, माजी आमदार महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणूक प्रचारात सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्री डॉ. सावंत १० ते १५ ऑक्टोबर दरम्यान निवडणूक प्रचारात सहभागी होणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांनी काल दिली. भाजपच्या गोवा विभागाकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ... Read More »

डेन्मार्कमधील हवामान परिषदेसाठी केजरीवालांना परवानगी नाकारली

डेन्मार्क येथे होणार्‍या सी-४० हवामानबदल विषयक परिषदेस उपस्थित राहण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना राजकीय मान्यता केंद्रीय विदेश व्यवहार मंत्रालयाने नाकारली आहे. केजरीवाल यांच्याऐवजी प. बंगालचे मंत्री फिरहाद हकीम यांना मान्यता देण्यात आली आहे. दिल्ली सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल काल मंगळवारी दु. २ वा. वरील परिषदेस उपस्थित राहण्यासाठी रवाना होणार होते. परंतु त्यांना विदेश व्यवहार मंत्रालयाने राजकीय ... Read More »

कदंबने २४ तास सेवेसाठी पुढाकार घ्यावा ः मुख्यमंत्री

कदंब वाहतूक महामंडळाने चोवीस तास प्रवासी वाहतूक सेवा देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल कदंब महामंडळाच्या ३९ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात बोलताना केले. यावेळी वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो, महापौर उदय मडकईकर, मंडळाचे अध्यक्ष कार्लुस आल्मेदा व इतरांची उपस्थिती होती. कदंब महामंडळाला ५० इलेक्ट्रिक बसगाड्या लवकरच मिळणार आहेत. राज्यातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी हरीत बसगाड्यांची नितांत गरज आहे. ... Read More »

गोव्याचा अरुणाचलवर १४७ धावांनी विजय

>> विनू मांकड अंडर १९ क्रिकेट स्पर्धा विनू मांकड क्रिकेट स्पर्धेत काल मंगळवारी गोव्याने अरुणाचल प्रदेशचा १४७ धावांनी पराभव करत पूर्ण ४ गुणांची कमाई केली. पुदुचेरी येथे ही स्पर्धा सुरू आहे. गोव्याच्या २९२ धावांना उत्तर देताना अरुणाचलचा डाव १४५ धावांत संपला. अरुणाचलने नाणेफेक जिंकून गोव्याला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिल्यानंतर कर्णधार राहुल मेहता (६७) व कौशल हट्टंगडी (९३) यांनी दुसर्‍या गड्यासाठी ... Read More »

स्टोईनिसला बाहेरचा रस्ता

श्रीलंका व पाकिस्तानविरुद्धच्या टी-ट्वेंटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने काल आपला संघ जाहीर करताना अष्टपैलू मार्कुस स्टोईनिस याला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यंदाच्या कॅलेंडर वर्षांत स्टोईनिसने एकदिवसीय क्रिकेटमध्ये २३.५०च्या सरासरीने केवळ ३२९ धावा केल्या असून १५ बळी त्याच्या नावावर आहेत. आंतराष्ट्रीय टी-ट्वेंटीमधील दोन सामन्यांत ४च्या सरासरीने केवळ ८ धावा त्याच्या खात्यात जमा आहेत. या दोही लढतीत त्याला गोलंदाजीत एकही बळी मिळविता आलेला नाही. ... Read More »