Daily Archives: October 7, 2019

आरेचा लढा

मुंबईच्या सुप्रसिद्ध आरे कॉलनीमधील वृक्षतोडीविरुद्ध मुंबईमध्ये नुकतेच जोरदार आंदोलन झाले. उच्च न्यायालयाने पर्यावरणप्रेमींची याचिका फेटाळण्याचा अवकाश, मुंबई मेट्रोने एका रात्रीत दीड हजार झाडांची कत्तल केली. विरोध करणार्‍या २९ पर्यावरणप्रेमींना ताब्यातही घेतले. ज्या प्रकारे हा सगळा प्रकार धाकदपटशहाने करण्यात आला तो आश्चर्यकारक आहे. भले, राष्ट्रीय हरित लाद आणि उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दर्शवला असेल, परंतु अशा प्रकारे जोरजबरदस्तीने शेकडो झाडांची कत्तल ... Read More »

प्रश्न आहे निकोप राजकीय संस्कृतीचा

ल. त्र्यं. जोशी आजघडीला कोणता पक्ष कोणाला तिकिट देईल याचा भरवसाच राहिलेला नाही. पक्षनेतृत्व फक्त उमेदवाराचे ‘इलेक्टीव्ह मेरिट’ (निवडून येण्याची क्षमता) तेवढे पाहतात. त्याच्या कर्तृत्वाचा अजिबातच विचार होत नाही असे नाही. पण समान कर्तृत्व असलेल्या दोन इच्छुकांमध्ये ‘इलेक्टीव्ह मेरिट’लाच प्राधान्य दिले जाते, ही वस्तुस्थिती आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या याद्या उघड झाल्यानंतर वृत्तवाहिन्यांवरुन बंडखोरांचा बोलबाला होत असला तरी ते ... Read More »

दयानंद योजनेतील बनावट लाभार्थींना वसुली नोटिसा

गोवा सरकारच्या समाज कल्याण खात्याच्या दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेतील जे नकली लाभार्थी आहेत त्यांच्याकडून पैसे वसुल करण्यासाठी खात्याने त्यांना नोटीसा पाठवण्याचे काम सुरू केले आहे. खात्याने केलेल्या चौकशीत तब्बल ११ हजार लाभार्थी हे नकली असल्याचे आढळून आलेले आहे. ह्या ११ हजारांपैकी सुमारे ८ हजार लाभार्थींचा मृत्यू झालेला असून त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे कुटुंबीय त्यांच्या एटीएम कार्डचा वापर करून योजनेखाली त्यांच्या खात्यात ... Read More »

भारताच्या दौर्‍यावर असलेल्या बांगला देशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची कॉंग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी व माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी भेट घेतली त्यावेळी. Read More »

आरे आंदोलन : २९ जणांना सशर्त जामीन

आरे मेट्रो कार शेडसाठी वृक्ष तोडण्याविरोधात आंदोलन करणार्‍या पर्यावरणप्रेमी व ‘आरे वाचवा’ मोहिमेतील आंदोलन करणार्‍या २९ जणांना न्यायालयाने काल जामीन मंजूर केला. दरम्यान या वृक्षतोडी विरोधात बहुजन वंचित आघाडीने उडी घेतली आहे. आंदोलनास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा जाहीर करीत काल स्वत:ला अटक करून घेतली. शनिवारी पोलिसांनी आरे वाचवा मोहिमेखाली आंदोलन करणार्‍या ३८ जणांना अटक केली होती. त्या आंदोलकांना ... Read More »

भाजपात जाण्याचा विचार नाही

>> आमदार आलेक्स लॉरेन्स यांची स्पष्टोक्ती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह विविध मंत्री व सत्ताधारी आमदार माझे जे कौतुक व स्तुती करीत आहेत ती मी विरोधी आमदार म्हणून करीत असलेल्या कामामुळे. मी भाजपात प्रवेश करणार आहे असा गैरसमज कुणी करून घेऊ नये, असे कुडतरी मतदारसंघाचे कॉंग्रेस आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यानी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. भाजपमध्ये जाण्याचा आपला कोणताही विचार ... Read More »

हणजुणात कामगाराकडून महिलेचा खून: रस्त्यात पडून खुनीही मृत

वियेगश-वाडा, हणजूण येथील एका खाजगी गेस्टहाऊसच्या मालक शिरीन मोदी (६५) यांच्यावर कामगाराकडून रविवारी सकाळी प्राणघातक हल्ला झाला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या श्रीमती शिरीन यांना कुटुंबियांकडून इस्पितळात नेले जात असतांना त्यांचे वाटेतच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, शिरीन यांच्यावर हल्ला करून पळ काढणार्‍या प्रफुल्ला जना (ओडीसा) याचा घटनास्थळापासून शंभर मीटर अंतरावर कोसळला असता त्याचाही जागीच मृत्यू झाला. हणजूण पोलिस तसेच उत्तर ... Read More »

अब्दुल्ला पिता-पुत्रांची पक्षाच्या शिष्टमंडळाशी दोन महिन्यांनंतर भेट

केंद्रातील मोदी सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष राज्य दर्जा रद्दबातल ठरविल्यानंतर प्रथमच एका मोठ्या राजकीय घडामोडी काल नॅशनल कॉन्फरन्स पक्षाच्या १५ सदस्यीय शिष्टमंडळाला सुमारे दोन महिने स्थानबध्दतेत असलेल्या फारुख अब्दुल्ला व ओमर अब्दुला यांची येथे भेट घेऊ देण्यात आली. जम्मू-काश्मीर प्रशासनाने या शिष्टमंडळाला अब्दुल्ला यांची भेट घेण्यास अनुमती दिली होती. नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांना येथील त्यांच्या निवासस्थानीच गेल्या सुमारे ... Read More »

अमेरिकी उच्चस्तरीय शिष्टमंडळ पीओके भेटीवर

जम्मू-काश्मीरचा विशेष राज्य दर्जा भारत सरकारने रद्द केल्याच्या पार्श्‍वभूमीवर पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) स्थितीची पाहणी करण्यासाठी काल येथे अमेरिकी संसदेच्या एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने भेट दिली. या शिष्टमंडळात ख्रिस व्हॅन हॉलेन व मॅगी हासन हे अमेरिकी सांसद तसेच अमेरिकेचे चार्ज द अफेअर्स ऍम्बासिडर पॉल जोन्स यांचा समावेश आहे. त्यांनी पीओकेतील मुजफ्फराबाद येथे जाऊन तेथील लोकांशी संवाद साधला. पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाने एका निवेदनात ... Read More »

भारताचा दक्षिण आफ्रिकेवर २०३ धावांनी विजय

मोहम्मद शमी आणि रवींद्र जाडेजा यांनी केलेल्या भेदक मार्‍याच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव काल पाचया दिवशी १९१ धावांत गुंडाळत २०३ धावांंंंंंनी विजय साकारला. भारताने आफ्रिकेसमोर विजयासाठी ३९५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ द्विशतकी वेसदेखील ओलांडू शकला नाही. मोहम्मद शमीने दुसर्‍या डावात आफ्रिकेचा निम्मा संघ अवघ्या २१ धावा मोजून माघारी ... Read More »