Daily Archives: October 5, 2019

नुसती लुटालूट

नुकत्याच उजेडात आलेल्या पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बँकेच्या घोटाळ्याची आणि संबंधित गैरकारभाराची व्याप्ती एकूणच सहकार क्षेत्रातील बँकांच्या कार्यपद्धतीवर मोठी गंभीर प्रश्नचिन्हे उपस्थित करणारी आहे. रिझर्व्ह बँकेने सध्या त्या बँकेवर आपला अंमल बसवला आहे. रिझर्व्ह बँकेला अशा प्रकारे लक्ष घालावे लागलेली ही काही एकमेव बँक नाही. तब्बल दोन डझनांहून अधिक, अगदी नेमकेपणाने सांगायचे तर सध्या २६ बँकांवर रिझर्व्ह बँकेने अशा ... Read More »

आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि संरक्षणक्षेत्र

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) भविष्यात आर्टिफिशियल मिलिटरी इंटलिजन्सच्या वापरामुळे पारंपरिक सैनिकी कार्यक्षमतेऐवजी तांत्रिक युद्धक्षमता वृद्धिंगत करण्याकडे राष्ट्रांचा कल वाढत आहे. परिणामी, भारतालाही आता संरक्षण क्षेत्रातील आर्टिफिशियल इंटलिजन्स रेसमध्येे सामील होण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मात्र यामधील आव्हानांचा विचार करता ती पेलणे महद्कठीण आहे. संरक्षणदलांचे अत्याधुनिकीकरण करणे हेच भारताचे भावी धोरण असले पाहिजे. चौथी औद्योगिक क्रांती म्हणून नावारूपाला येत असलेली, कृत्रिम बुद्धिमत्ता ... Read More »

खाणी डिसेंबरपर्यंत सुरू करण्यासाठी प्रयत्न

>> मुख्यमंत्र्यांची माहिती, केंद्रिय गृहमंत्री, खाणमंत्र्यांची दिल्लीत भेट गोव्यातील बंद पडलेला खाण उद्योग येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत सुरू व्हावा यासाठी केंद्र सरकार प्रयत्नरत असून डिसेंबरपर्यंत राज्यातील खाणी सुरू होण्याची दाट शक्यता असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सांगितले. केंद्र सरकार गोव्यातील बंद पडलेला खाणीचा प्रश्‍न न्यायालयीन मार्गाने अथवा राजकीय तोडगा काढून सोडवू शकते असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी काल या ... Read More »

पणजी मार्केटचा वीजपुरवठा आजपासून सुरळीत होणार

>> १ कोटींचा पहिला हप्ता देण्याची हमी पणजी महानगरपालिकेने मार्केटच्या ५ कोटी रुपयांच्या थकीत वीज बिलाच्या रकमेपैकी पहिल्या टप्प्यात १ कोटी रुपयांच्या रकमेचा पहिला हप्ता १५ ऑक्टोबरपर्यंत भरण्याची हमी दिल्यानंतर शनिवारी मार्केटची वीज जोडणी पूर्ववत केली जाणार आहे, अशी माहिती महापौर उदय मडकईकर यांनी काल दिली. वीज खात्याने महानगरपालिकेच्या मार्केटच्या वीज बिलाच्या थकबाकीच्या रकमेचा भरणा न केल्याने १ ऑक्टोबरला मार्केटची ... Read More »

वीज बिलाच्या थकबाकीची रक्कम वाढू शकते ः काब्राल

>> ३५० कोटीपर्यंत जाण्याची शक्यता वीज खात्याच्या वीज बिलाच्या थकबाकीची रक्कम ३५० कोटी रुपयांपर्यंत वाढू शकते, अशी माहिती वीज मंत्री नीलेश काब्राल यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. वीज खात्याच्या आत्तापर्यंत वीज बिलांची सुमारे ३२३ कोटी रुपयांची थकबाकी प्रलंबित आहे. तर, पणजी आणि कुडचडे या विभागांची वीज बिलाच्या थकबाकीची अंतिम यादी तयार करण्याचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे वीज बिलांची थकबाकीची ... Read More »

गोव्याला केरोसिन कोटा वाढवून देण्याची केंद्राकडे मागणी ः गावडे

गोव्याला आणखी ३७ किलो लिटर एवढे केरोसिन वाढवून देण्याची सोय करण्यात यावी, अशी मागणी नागरी पुरवठा खात्याने केंद्र सरकारकडे केली आहे, अशी माहिती नागरी पुरवठा खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी काल दिली. केंद्राने यापूर्वीच राज्याला ३७ किलो लिटर एवढा कॅरोसिन कोटा वाढवून दिलेला आहे. त्यामुळे राज्याला मिळणारा केरोसिन कोटा ९६ किलो लिटरवर पोचला आहे. मात्र, तो राज्याला अपुरा पडत असलने ... Read More »

वीज पडल्याने कांदोळीत देशी पर्यटकाचा मृत्यू

उत्तर गोव्यातील कांदोळी येथील समुद्र किनार्‍यावर वीज कोसळल्याने एका देशी पर्यटकाचा मृत्यू झाला. तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चैतन्य नागपाल (३५ वर्षे, नवी दिल्ली) असे मृत देशी पर्यटकाचे नाव आहे. चैतन्य हा पत्नीसमवेत सुट्टीवर गोव्यात आला होता. कांदोळी येथील समुद्र किनार्‍यावर असताना दिल्लीच्या नागपाल दाम्पत्यावर वीज कोसळली. चैतन्य नागपाल ... Read More »

बालाकोट एअर स्ट्राईकचा व्हिडिओ भारतीय हवाई दलाकडून प्रसिद्ध

भारतीय हवाई दलाने बालाकोट एअर स्ट्राइकचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओमध्ये हवाई हल्ल्याची तयारी आणि दहशतवादी तळ नष्ट केल्याची छायाचित्रे दाखवण्यात आली आहेत. हवाई दल दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत हवाई दलप्रमुख राकेश कुमारसिंग भदौरिया यांनी या व्हिडिओबाबत माहिती दिली. भविष्यात पाकच्या बाजूने कोणतीही दहशतवादी कारवाई घडल्यास सरकारच्या योजनेनुसार पाकला योग्य तो प्रतिकार केला जाईल, असेही हवाई दलप्रमुख म्हणाले. ... Read More »

महाराष्ट्रात महायुतीला महाजनादेश मिळेल

>> उद्धव ठाकरेंसोबत मुख्यमंत्री फडणवीसांची पत्रपरिषद महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला महाजनादेश मिळेल. महायुती प्रचंड मताधिक्क्याने निवडून येईल असा विश्‍वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी त्यांनी अधिकृतरित्या भाजप-शिवसेना महायुतीची घोषणा केली. भाजप आणि शिवसेनेला जोडणारा हिंदुत्व हा धागा आहे. त्यामुळे महायुती व्हावी अशी जनतेची असलेली अपेक्षा आम्ही पूर्ण ... Read More »

गोव्याचा मेघालयवर १८४ धावांनी विजय

येथील स्लिम्स क्रिकेट मैदानावर काल शुक्रवारी झालेल्या विनू मांकड एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील लढतीत गोव्याने विजयी सलामी देताना दुबळ्या मेघालय संघाचा १८४ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना २४६ धावा फलकावर लगावल्यानंतर गोव्याने मेघालयचा डाव २०.३ षटकांत ६२ धावांत संपवला. गोव्याकडून गौरेश कांबळी याने अर्धशतक झळकावताना ५६ धावांचे योगदान दिले. १० चौकारांसह त्याने आपली खेळी सजवली. कर्णदार राहुल मेहता व उदित ... Read More »