Daily Archives: October 4, 2019

आदित्य मैदानात

प्रबोधनकार ठाकरे यांचे पणतू, बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि उद्धव ठाकरे यांचे ज्येष्ठ पुत्र असलेल्या आदित्य ठाकरे यांनी काल महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील वरळी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. आजवर कधीही निवडणुकीच्या रिंगणात न उतरणार्‍या, परंतु तरीही महाराष्ट्राच्या राजकारणावर आपला प्रभाव ठेवणार्‍या ठाकरे घराण्यातील ही पहिलीच व्यक्ती आदित्य यांच्या रूपाने येत्या विधानसभा निवडणुकीत मतदारांचा कौल आजमावणार आहे. त्यामुळे या घटनेला विशेष ... Read More »

आजचे पाकिस्तान आणि भारताची सावळी!

शुजा नवाझ पाकिस्तानचे संविधान जरी लष्करी सत्तेवर नागरी सत्ता वरचढ असल्याचे सांगत असले, तरी पाकिस्तानच्या निर्णयक्षमतेवर सैन्यदलांचा, विशेषतः लष्कराचा प्रभाव मोठाच राहिला आहे. सातत्यपूर्ण लष्करी सत्तांचा देश चालवण्याचा अनुभव आणि नागरी राजवटींचे लष्करावर संवैधानिक अधिकार गाजवण्यासाठी आवश्यक असलेली राजकीय दूरदृष्टी व इच्छाशक्ती दाखवण्यातील अपयश हे याला काही प्रमाणात कारणीभूत आहे. पाकिस्तान अजूनही कमकुवत आणि अकार्यक्षम देश राहिला आहे, जो अजूनही ... Read More »

दिल्लीत दहशतवादी घुसल्याच्या शक्यतेने सर्वत्र अतिदक्षता

पाकिस्तानमधील जैश ए महंमद या दहशतवादी संघटनेचे चार दहशतवादी दिल्लीत प्रवेशल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली असून येत्या उत्सवी काळामध्ये एखादा दहशतवादी हल्ला चढवण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो. त्यामुळे केंद्र सरकारने सर्व सुरक्षा यंत्रणांना दक्षतेचे आदेश दिले आहेत. उत्तर भारतातील विमानतळांनाही अतिदक्षतेचा आदेश दिला गेला असून खास सुरक्षा उपाय योजण्यास सांगण्यात आलेले आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेला केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने दिल्लीत ... Read More »

राज्यातील ४६ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

पोलीस खात्यातील ४६ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचा आदेश काल जारी करण्यात आला आहे. पोलीस मुख्यालयातील पोलीस अधीक्षक एस. एम, प्रभुदेसाई यांनी पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचा आदेश जारी केला आहे. पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांची काणकोण पोलीस स्टेशन, गुरूदास कदम यांची मायणा कुडतरी पोलीस स्टेशन, उदय गावडे यांची एसबी पणजी, नवलेश देसाई यांची तळपण किनारी पोलीस स्टेशन, शिवराम वायंगणकर यांची वाळपई पोलीस स्टेशन, ... Read More »

अंगणवाडी सेविकांचे निवृत्ती वय ६५ करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेणार : विश्‍वजित राणे

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या निवृत्ती वय ६० वर्षावरून ६५ वर्षे करण्याच्या प्रश्‍नावर चर्चा करणार असून अंगणवाडी सेविकांचे वय वाढविण्याच्या प्रश्‍नावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासन महिला व बालकल्याण मंत्री विश्‍वजित राणे यांनी येथे काल दिले. महिला व बालकल्याण खात्याने आयोजित केलेल्या पोषण आहार कार्यक्रमात महिला व बालकल्याण मंत्री राणे बोलत होते. या कार्यक्रमाला राज्यपाल डॉ. ... Read More »

कॅसिनोंच्या आग्वाद स्थलांतरास विरोध

मांडवी नदीतील तरंगते कॅसिनो आग्वाद येथे स्थलांतरित करण्यासाठी विरोध वाढत आहे. कळंगुट मतदारसंघ मंच, कांदोळी नागरिक कृती समिती आणि पिळर्ण नागरिक मंचाच्या पदाधिकार्‍यांनी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत कॅसिनोच्या आग्वाद बे येथे स्थलांतराला गुरूवारी विरोध दर्शविला आहे. सरकारी यंत्रणेकडून मांडवी नदीतील काही कॅसिनो आग्वाद बे येथे स्थलांतरित करण्यासाठी चाचपणी केली जात आहे. कॉंग्रेस पक्षाने कॅसिनोच्या आग्वाद बे येथे स्थलांतराला पहिल्यांदा विरोध ... Read More »

मध्यप्रदेशात गोव्याची कोळसा खाण

गोव्याला मध्यप्रदेश राज्यात एक कोळसा खाण मंजूर झाली आहे. या कोळसा खाणीबाबत केंद्र सरकार आणि आयडीसी यांच्यात सामंजस्य करार येत्या १० ऑक्टोबरला केला जाणार आहे, अशी माहिती गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ग्लेन टिकलो यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. या कोळसा खाणीबाबत सामंजस्य करार केल्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. कोळसा खाणीतून वीज निर्मिती व इतर बाबतीत सल्लागाराची ... Read More »

खड्डे बुजविण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूण

>> मंत्री दीपक पाऊसकर : कामत यांचे आरोप बिनबुडाचे राज्यातील रस्त्यांवरील खड्डे मशीनद्वारे बुजविण्याचे काम हाती घेताना आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. राज्य सरकार डांबराची आयात करणार नाही. तर, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल या सरकारी एजन्सी किंवा कंत्राटदारांकडून विदेशातून डांबराची आयात केली जाणार आहे, असे स्पष्टीकरण सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांनी काल केले. गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत ... Read More »

भारताने उभारला ५०२ धावांचा डोंगर

>> मयंक अगरवालने ठोकले द्विशतक >> द. आफ्रिका ३ बाद ३९ रोहित शर्मा व मयंक अगरवाल यांनी दिलेल्या त्रिशतकी सलामीनंतर फिरकीपटूंच्या शानदार सुुरुवातीच्या बळावर भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीवर मजबूत पकड मिळविली आहे. भारताच्या ७ बाद ५०२ धावांना उत्तर देताना दुसर्‍या दिवसअखेर पाहुण्यांची ३ बाद ३९ अशी दयनीय अवस्था झाली आहे. पाहुण्यांचा संघ अजून ४६३ धावांनी पिछाडीवर असून त्यांचे केवळ ... Read More »

भक्ती तृतीय, अनुराग ४२वा

जागतिक बुद्धिबळ महासंघाने (फिडे) जाहीर केलेल्या ऑक्टोबर क्रमवारीत गोव्याची महिला ग्रँडमास्टर भक्ती कुलकर्णी महिलांच्या गटात २४१८ गुणांसह देशात तिसर्‍या स्थानी आहे. हंपी व हरिका अनुक्रमे पहिल्या व दुसर्‍या स्थानी आहेत. जागतिक स्तरावर भक्तीचा ४६वा क्रमांक लागतो. गोव्याचा ग्रँडमास्टर अनुराग म्हामल याने अत्यंत चुरशीच्या खुल्या गटात भारतीय खेळाडूंमध्ये ४२वे स्थान मिळवत प्रभाव पाडला आहे. त्याच्या खात्यात २४९० गुण जमा आहेत. २३८२ ... Read More »