Daily Archives: October 1, 2019

सुमीत नागलची १३५व्या स्थानी झेप

>> ब्युनोस आयर्स एटीपी चॅलेंज स्पर्धा जिंकली भारताचा टेनिस स्टार सुमीत नागल याने ब्युनोस आयर्स एटीपी चॅलेंजर स्पर्धेतील विजेतेपदाच्या बळावर काल सोमवारी जाहीर झालेल्या ताज्या एटीपी क्रमवारीत पुरुष एकेरीत वैयक्तिक सर्वोत्तम १३५वे स्थान मिळविले आहे. यासह त्याने २६ स्थानांची मोठी झेप घेत अव्वल शंभरात प्रवेश करण्याच्या दिशेने आगेकूच सुरूच ठेवली. नागलने रविवारी अंतिम पेरीत फाकुंदो बोगनिस याचा ६-४, ६-२ असा ... Read More »

कमलेश नागरकोटीचे पुनरागमन

दुखापतीमुळे १९ महिने स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर रहावे लागल्यानंतर भारताचा युवा जलदगती गोलंदाज कमलेश नागरकोटी याचे इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघात पुमरागमन झाले आहे. न्यूझीलंडमध्ये मागील वर्षी झालेल्या १९ वर्षांखालील विश्‍वचषक स्पर्धा जिंकलेल्या भारतीय संघाचा कमलेश अविभाज्य घटक होता. बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील तज्ज्ञ त्याच्या दुखापतीवर बारीक लक्ष ठेवून होते. त्याची पाठ, टाच व घोटा दुखावला होता. मागील वर्षी ... Read More »

श्रीलंकेचा पाककडून पराभव

श्रीलंकेला काल सोमवारी पाकिस्तानविरुद्ध ६७ धावांनी पराभव पत्करावा लागला. पहिला एकदिवसीय सामना पावसामुळे वाहून गेल्यानंतर तीन सामन्यांच्या मालिकेतील हा दुसरा सामना जिंकून यजमानांनी १-० अशी आघाडी घेतली आहे. बाबर आझम याचे ११वे एकदिवसीय शतक व उस्मान शिनवारी याने घेतलेले पाच बळी यामुळे पाकिस्तानला विजय मिळविणे शक्य झाले. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत ७ बाद ३०५ धावांपर्यंत मजल मारली. ... Read More »

चाफेकळी नाक की धारदार नाक?

 डॉ. मनाली म. पवार गणेशपुरी-म्हापसा आयुर्वेद शास्त्रामध्ये दिनचर्येमध्ये म्हणूनच नाकाचे आरोग्य टिकविण्यासाठी म्हणा किंवा नासारोग होऊ नयेत म्हणून नेहमी नाकांमध्ये दोन-दोन थेंब तीळ तेल किंवा अणू तेल किंवा तूप घालावे. डोक्याखाली उशी न घेणे किंवा अधिक उशी घेतल्याने नाकामध्ये स्राव साचून तो घट्ट होतो हा घनस्त्राव श्‍लेष्मल त्वचेतील कोषांकुरांच्या क्रियेमध्ये बाधा निर्माण करून नासारोग निर्माण करतो.   माणसाचे व्यक्तिमत्त्व बर्‍याच ... Read More »

पंचकर्म परिचय भाग – २

 वैदू भरत म. नाईक कोलगाव शारीरिक सौंदर्य विशेषतः त्वचा, केस, डोळे यांचे सौंदर्यवृद्धीसाठी, तारुण्य राखण्यासाठी व वजन मर्यादेत ठेवण्यासाठी जे पंचकर्म उपचार केले जातात त्यांना सौंदर्यवर्धक पंचकर्म उपचार म्हणतात. संपूर्ण आरोग्याशिवाय सौंदर्य हे व्यर्थ व अशक्य आहे. मागील अंकावरून…. बहुदोष अवस्थेमध्ये पंचकर्म चिकित्सेचे महत्त्व आहे. मध्यदोष अवस्था असेल तर व्यायाम, दीपन, पाचन ही चिकित्सा करावी. हीनदोष अवस्थेमध्ये केवळ लंघन चिकित्सेनेच ... Read More »

डरमॅटायटीस भाग २

डॉ. स्वाती हे. अणवेकर म्हापसा बरेचदा हा त्वचाविकार हळूहळू उत्पन्न होतो व वाढत जातो. पण काही अवस्थांमध्ये अर्थात एखाद्या वस्तूची तीव्र ऍलर्जी असेल तर हा अचानक उत्पन्न होऊन भरभर वाढतो. ह्याची लक्षणे स्वरूप हे प्रत्यक्ष पाहता वेगवेगळ्या रुग्णांमध्ये वेगवेगळ्या स्वरुपात आढळू शकते. आता ह्या भागात आपण डरमॅटायटीस ह्याविषयी थोडी आयुर्वेदातील माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत. पूर्वी सांगितल्याप्रमाणे आयुर्वेदामध्ये डरमॅटायटीस ह्या ... Read More »