Daily Archives: October 1, 2019

प्लास्टिक बंदीकडे

संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुढाकाराने जगभरामध्ये ‘सिंगल यूज प्लास्टिक’ हद्दपार करण्याचे प्रयत्न चालले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील उद्याच्या गांधी जयंतीपासून ‘सिंगल यूज प्लास्टिक’ विरुद्ध जनजागृती मोहीम राबवण्याचा संकल्प गेल्या स्वातंत्र्यदिनी व्यक्त केला होता. त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून गोवा सरकारनेही आपल्या सरकारी कार्यालयांतून व कार्यक्रमांमधून सिंगल यूज प्लास्टिक हद्दपार करण्याचे पाऊल उचललेले आहे आणि त्याची कार्यवाहीही उद्यापासून अपेक्षित आहे. प्लास्टिक हे ... Read More »

महाराष्ट्राला विधानसभा निवडणुकांचे वेध

देवेश कु. कडकडे डिचोली इतर पक्षांच्या चिन्हांवर निवडून आलेल्या नेत्यांना आपल्या पक्षात घेऊन मतदारांच्या विश्‍वासाला तडा देण्यासाठी खतपाणी घालण्याचे काम सर्वप्रथम कॉंग्रेस आणि पवारांनी केले. आज त्यांच्याच पक्षातील दिग्गज नेते पक्ष सोडून सत्तेचे वारे ज्या दिशेने वाहते त्या दिशेने वाट धरत आहेत. भारत हा निवडणुकांचा देश आहे. वर्षभर इथे सण-उत्सवांसारखे सतत निवडणुकांचे वातावरण असते. लोकसभा निवडणुकांची गरम हवा थंड होत ... Read More »

रस्त्यांवरील खड्डे त्याच कंत्राटदारांनी बुझवावेत

>> अन्यथा गुन्हा नोंदवणार ः मंत्री पाऊसकर राज्यातील ज्या ज्या रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत ते खड्डे बुझवण्याचे व रस्त्यांची डागडुजी करण्याचे काम हाती घेण्याची सूचना त्या रस्त्यांच्या कंत्राटदारांना करण्यात आलेली आहे. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यापर्यंत हे काम करण्याची सूचना त्यांना करण्यात आलेली असून जे कंत्राटदार हे दुरुस्तीकाम हाती घेणार नाहीत त्यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात येतील, असे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पाऊसकर यांनी ... Read More »

शॅक्स वितरण प्रक्रिया सुरू करण्यास न्यायालयाची मान्यता

>> प्रत्यक्ष वितरण मात्र अंतिम निवाड्यानंतर नवा पर्यटक मोसम जवळ येऊन ठेपल्याच्या पार्श्‍वभूमीवर काल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गोवा सरकारला राज्यातील किनार्‍यांवर शॅक्सचे वितरण करण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली जावी, अशी सूचना केली. मात्र, शॅक्सचे प्रत्यक्ष वितरण करण्याचे काम मात्र अंतिम निवाड्यानंतरच हाती घेण्यात यावे, असे आपल्या अंतरिम आदेशातून काल स्पष्ट केले. यासंबंधीची पुढील सुनावणी आता दि. ७ ऑक्टोबर रोजी ... Read More »

ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे (७८) यांचे वृद्धापकाळाने दक्षिण मुंबईतील गावदेवी येथील राहत्या घरी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. तब्येत खालावल्याने त्यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल केले होते. विजू खोटे यांनी ३०० हून अधिक मराठी-हिंदी चित्रपट आणि मालिकांमधून अभिनय केला आहे. शोले चित्रपटातील त्यांची कालियाची भूमिका विशेष गाजली. चार दशकांचा काळ उलटून गेला असला तरी कालियाच्या भूमिकेचे आजही ... Read More »

न्यूड पार्टी पोस्टर प्रकरणी संशयितास पोलीस कोठडी

गोवा पोलिसांनी न्यूड पार्टी पोस्टर प्रकरणी अटक केलेल्या अरमान मेहता (३०, बिहार) याला ५ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने काल दिला. संशयित अरमान याचा न्यूड पार्टीच्या पोस्टरची जाहिरातबाजी करून सर्वत्र खळबळ निर्माण करून संभाव्य ग्राहकांची लुबाडणूक करण्याचा विचार होता, अशी माहिती गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक पंकजकुमार सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. गोवा पोलिसांनी या ... Read More »

महाराष्ट्रात अखेर महायुतीची घोषणा

>> जागा वाटपाचा फॉर्म्युला गुलदस्त्यात महाराष्ट्रात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी अखेर शिवसेना-भाजप आणि मित्रपक्षांच्या महायुतीची घोषणा करण्यात आली. मात्र जागा वाटपाचा फॉर्म्युला गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे महायुतीच्या जाहीर केलेल्या पत्रकावर केवळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्याच सह्या आहेत. मित्रपक्षातील इतर नेत्यांच्या या पत्रकावर सह्या नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रिपाई ... Read More »

येत्या सहा महिन्यांत साळ नदीचे ड्रेजिंग

>> मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदेत माहिती दक्षिण गोव्यातील प्रमुख साळ नदीतील ड्रेजिंगचे काम आगामी सहा महिने ते एका वर्षात हाती घेतले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. पर्वरी येथे मंत्रालयात साळ नदीतील ड्रेजिंगच्या कामाबाबत सादरीकरण काल करण्यात आले. या सादरीकरणानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी वरील माहिती दिली. या सादरीकरणाच्यावेळी बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो, ... Read More »

मोसमी पावसाने रचला इतिहास

>> सरासरीपेक्षा ३३ टक्के जास्त; १५५.२६ इंचाची नोंद राज्यात मागील चार वर्षे सलग तुटीचा मोसमी पाऊस पडल्यानंतर यावर्षी मोसमी पावसाची सरासरीपेक्षा ३३ टक्के जास्त नोंद झाला आहे. राज्यात यावर्षी पावसाने १५५.२६ इंच पावसाची नोंद करून नवीन इतिहास रचला आहे. यापूर्वी राज्यात वर्ष २०११ मध्ये १५०.८८ इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात मागील चार वर्षाच्या तुटीच्या मोसमी पावसाची परंपरा यंदा खंडित ... Read More »

पी. चिदंबरम् यांचा पुन्हा जामीन अर्ज फेटाळला

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा जामीन अर्ज पुन्हा एकदा दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायाधीश सुरैश कैत यांनी साक्षीदार आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न होऊ शकतो असे सांगत जामीन देण्यास नकार दिला. आयएनएक्स मीडियाच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी चिदंबरम सध्या तिहार कारागृहात आहे. आयएनएक्स मीडियाच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणात २१ ऑगस्ट रोजी सीबीआयने चिदंबरम यांना अटक केली होती. सीबीआयची अटक टाळण्यासाठी ... Read More »