Monthly Archives: October 2019

यांना हाकला!

कांदोळीत एका भाड्याच्या खोलीवरील छाप्यात तब्बल तीन कोटींचे अमली पदार्थ जप्त करण्यात आल्याची घटना लक्षवेधी असली तरी धक्कादायक म्हणता येणार नाही. गोव्याची किनारपट्टी म्हणजे अमली पदार्थांचा सुळसुळाट असे समीकरणच बनलेले आहे, त्यामुळे अधूनमधून पडणारे अशा प्रकारचे छापे आता गोमंतकीय जनतेच्या अंगवळणी पडले आहेत. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी दहा बारा किलोमीटर पाठलाग करून अमली पदार्थ घेऊन पळणार्‍या अशाच काही विदेशी नागरिकांना अटक ... Read More »

कर्तारपूर कॉरिडॉर आणि पाकचे षड्‌यंत्र

शैलेंद्र देवळणकर गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेले करतारपूर कॉरीडॉरचे हे ३१ ऑक्टोबर रोजी पूर्ण झाले. भारत आणि पाकिस्तानातील संबंध कितीही तणावपूर्ण बनलेले असले तरी आणि कलम ३७० आणि ३५ अ काढून टाकल्यानंतर पाकिस्तानने भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनामी करण्याचा प्रयत्न चालवला असला तरी आणि शस्रसंधी कराराच्या उल्लंघनानंतर भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले असले तरी करतारपूर कॉरीडॉर हे एक असे माध्यम असू शकते ... Read More »

‘गोव्यातली पाच वर्षे पाच मिनिटांसारखीच गेली…’ – मृदुला सिन्हा

गोव्याच्या मावळत्या राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा आता आपला राज्यपालपदाचा कार्यकाळ पूर्ण करून गोव्याचा निरोप घेत आहेत. त्यानिमित्ताने खास दैनिक नवप्रभासाठी श्री. रामनाथ पै रायकर यांनी घेतलेली त्यांची मुलाखत – गोव्यातल्या आपला गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळाकडे आपण मागे वळून कसे पाहाल? खरे सांगायचे तर मला वाटतेय की मी गोव्यात कालच आलेले आहे. गोव्यात मी घालवलेली पाच वर्षे हा खूपच छोटा काळ ... Read More »

मिलिंद नाईकना क्लिन चिट दिल्याने मुख्यमंत्र्यांवर संशय ः चोडणकर

मंत्रिमंडळतील आपले सहकारी मिलिंद नाईक यांना नाफ्ता जहाज प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी ‘क्लिन चिट’ दिल्याने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याविषयीही संशयाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल प्रसिद्धीस दिलेल्या आपल्या पत्रकात म्हटले आहे. नाफ्तावाहू जहाजाच्याबाबतीत सारवासारव करण्याचा प्रयत्न करणार्‍या मुख्यमंत्र्यांनी सदर जहाज दुरुस्तीची वा नाफ्ता जहाजातून काढून घेण्याची कोणतीही सुविधा मुरगांव बंदरात नसताना एमपीटीने ते जहाज आत येण्यास ... Read More »

हायड्रॉलिक पंप समुद्रात पडल्याने नाफ्ता खेचण्याचे काम लांबणीवर

>> मुख्यमंत्र्यांची माहिती दोनापावल येथे समुद्रात अडकून पडलेल्या ‘नुशी नलिनी’ या नाफ्तावाहू जहाजातील दोन हजार मेट्रिक टन नाफ्ता सुरक्षितपणे काढून दुसर्‍या जहाजात घालण्याचे जे काम आज गुरुवार दि. ३१ ऑक्टोबरपासून सुरू होणार होते. त्यासाठी मुंबईहून आणलेला हायड्रोलिक पंपही आणण्यात आला होता. मात्र तो पंप काल समुद्रात पडल्याने नाफ्ता बाहेर काढण्याचे काम आजपासून हाती घेता येणार नसल्याचे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद ... Read More »

कळसा भांडुरा प्रकल्पाच्या पर्यावरण दाखल्यास न्यायालयात आव्हान देणार : सरदेसाई

केंद्रीय वन, पर्यावरण व हवामान बदल मंत्रालयाने कर्नाटकच्या कळसा भांडुरा प्रकल्पाला जो पर्यावरण दाखल मंजूर केलेला आहे त्याला गोवा फॉरवर्ड पक्ष न्यायालयात आव्हान देणार असल्याचे काल गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते व गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पक्षाच्या कार्यकारिणीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत कार्यकारिणीने वरील प्रश्‍नी न्यायालयात याचिका दाखल करण्याचे आपणाला दिले असल्याचे सरदेसाई म्हणाले. वेळ न दवडता ... Read More »

पर्यटन खात्याकडून ३७८ शॅक्स उभारण्यास मान्यता

पर्यटन खात्याने काल बुधवारी सोडतींद्वारे राज्यभरातील समुद्र किनार्‍यांवर ३७८ शॅक्स उभारण्यास मान्यता दिली. त्यापैकी २७० शॅक्स हे उत्तरेतील किनार्‍यांवर तर १०८ शॅक्स हे दक्षिणेतील किनार्‍यांसाठी असल्याची माहिती पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी काल दै. नवप्रभाशी बोलताना दिली. ३७८ शॅक्सपैकी ९० टक्के शॅक्स हे ज्यांना शॅक्स व्यवसायाचा ३ वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे अशा व्यावसायिकांना देण्यात आले असल्याची माहिती मंत्री आजगावकर यांनी दिली. ... Read More »

उपमुख्यमंत्रिपद व १३ मंत्रिपदांचा भाजपकडून शिवसेनेला प्रस्ताव

महाराष्ट्रात भाजपने शिवसेनेसमोर सत्तावाटपाचे नवीन समीकरण ठेवले असून त्यात शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदासह इतर १३ मंत्रिपदांचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्रिपद आणि सत्तेत समान वाटा या मागणीवर शिवसेना आग्रही असतानाच, भाजपने हा नवा प्रस्ताव ठेवला आहे. यात मुख्यमंत्रिपद आणि अन्य २६ मंत्रिपदे ही भाजपकडेच राहतील असे म्हटले आहे. मात्र यावर शिवसेनेने अद्याप कोणतीच भूमिका जाहीर केलेली नाही. विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर ... Read More »

जम्मू-काश्मीर आणि लडाख आजपासून केंद्रशासित प्रदेश

केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आज गुरूवार दि. ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश अस्तित्त्वात येणार आहेत. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या दिवशी हे नवे केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात येत आहेत. ऑगस्ट महिन्यात संसदेमध्ये मंजूर झाल्यानुसार बुधवारी मध्यरात्रीनंतर जम्मू-काश्मीरचा वेगळ्या राज्याचा दर्जा जाणार आहे. या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ... Read More »

कोलकाताचा चेन्नईन एफसीवर निसटता विजय

इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) दोन वेळच्या माजी विजेत्या ऍटलेटिको दी कोलकाताने बुधवारी चेन्नईन एफसीवर एकमेव गोलने मात केली. ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड विल्यम्स याने दुसर्‍या सत्राच्या प्रारंभी केलेला गोल निर्णायक ठरला. नेहरू स्टेडियमवरील लढतीत चेन्नईनच्या रॅफेल क्रिव्हेलारो, लालीयनझुला छांगटे, आदींनी केलेले उत्तरार्धातील प्रयत्न फसले. एटीकेचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्य याने आपल्या संघाचे नेट सुरक्षित राखले. एटीकेने तीन सामन्यांत दुसरा विजय मिळविला आहे. त्यांनी ... Read More »