Daily Archives: September 30, 2019

पवारांवर वार

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जी कारवाई राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार आणि त्यांचे पुतण्ये अजित पवार यांच्याविरुद्ध सुरू केली आहे, तिला उच्च न्यायालयाच्या निकालाचा आधार जरी घेतला जात असला, तरी या कारवाईची एकूण काळवेळ पाहता ती राजकीय उद्देशांनी प्रेरित असल्याचा संशय बळावतो. ज्या प्रकारे ईडीच्या कारवाया विरोधी पक्षांच्या राजकीय नेत्यांविरुद्ध सर्वत्र सुरू आहेत, ते पाहाता ईडी म्हणजे ... Read More »

विरोधी पक्ष प्रबळ बनविण्याची जबाबदारी कोणाची?

ल. त्र्यं. जोशी लोकच जेव्हा मोदींना डोक्यावर घेतात आणि विरोधी पक्षांना नाकारतात तेव्हा आपले कुठे चुकत आहे याचा विचार करण्याची जबाबदारी विरोधी पक्षांवरच येऊन पडते आणि ते जर ती प्रभावीपणे पार पाडू शकणार नसतील तर त्याचे खापर ते सत्तारुढ पक्षावर किंवा सरकारवर फोडू शकत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये ‘कॉंग्रेसमुक्त भारत’ ही संकल्पना समोर करुन राजकारण सुरू केल्याने ... Read More »

‘भारत की लक्ष्मी’ अभियान चालवा

>> पंतप्रधान मोदींचे मन की बातमध्ये आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बातमध्ये बोलताना देशवासीयांना भारत की लक्ष्मी अभियान चालवा असे आवाहन केले. ‘सेल्फी विथ डॉटर’च्या धर्तीवर हे अभियान चालवताना आपल्या कुटुंबात, समाजात असलेल्या अनेक मुली आपल्याकडील कौशल्याने देशाचे नाव उज्जवल करत असतात. अशा मुलींचा या दिवाळीत सन्मान करूया. ‘भारत की लक्ष्मी’ असा हॅशटॅग वापरून तुम्ही सोशल मीडियावर ... Read More »

माशेलमध्ये जलवाहिनी फुटली

>> कुंभारजुवे, बेतकी, खांडोळ्यात पाणी नाही माशेल, तिवरे येथे पेट्रोलपंपाजवळ एका बिल्डरचे कंन्ट्रक्शन काम चालू आहे. या बिल्डरकडून खोदकाम चालू असताना कुंभारजुवा, जुवे, बेतकी, माशेल, खांडोळा भागाला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी तुटली. त्यामुळे कुंभारजुवा, जुवे, बेतकी भागाला कालपासून पाणीपुरवठा बंद झाला आहे. गेल्या आठ दहा दिवसापूर्वी बाणस्तारी येथे जलवाहिनी फुटली होती पाठोपाठ ही दुसरी घटना आहे. प्राप्त माहितीनुसार सदर बिल्डर इमारतीच्या ... Read More »

प्लास्टिक बंदी व सफाई अभियानाची सायकल रॅलीद्वारे साखळीत जागृती करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत मामलेदार प्रवीणजय पंडित व इतर. Read More »

अर्थव्यवस्थेसाठी दीर्घकालीन उपाय हवेत ः प्रा. वल्लभ

भारताच्या कोसळलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी कंपनी कर कमी करण्यासह जी पावले उचललेली आहेत त्याला दीर्घकालीन उपाययोजना म्हणता येणार नाही. कोसळलेली अर्थव्यवस्था पुन्हा उभारी घेण्यासाठी त्याचा काहीही फायदा होणार नसल्याचा दावा काल अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रा. गौरव वल्लभ यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून बोलताना केला. या घडीला देशात एकच उद्योग चांगला चालू शकेल आणि ... Read More »

रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम त्वरित हाती न घेतल्यास रास्ता रोको ः चोडणकर

राज्यातील भाजप सरकार अत्यंत असंवेदनशील आहे असा आरोप काल गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला. राज्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन वाहनचालक मृत्युमुखी पडत असतानाही सरकार रस्त्यांची दुरुस्ती करीत नाही. यातून त्यांची असंवेदनशीलता दिसून येत असल्याचे चोडणकर म्हणाले. सरकारने रस्त्यांच्या डागडुजीचे काम लवकर हाती घेतले नाही तर कॉंग्रेस पक्ष सदर प्रश्‍नावरून रास्ता रोको करण्यासही मागे पुढे ... Read More »

गोव्याचा झारखंडवर ४२ धावांनी विजय

>> विजय हजारे करंडक क्रिकेट >> आदित्य कौशिकचे शतक, दर्शन मिसाळचे चार बळी आदित्य कौशिकच्या शतकानंतर दर्शन मिसाळने घेतलेल्या चार बळींच्या जोरावर काल विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतील लढतीत झारखंडचा ४२ धावांनी पराभव करत पूर्ण ४ गुणांची कमाई केली. या स्पर्धेतील सामने बंगळुरू येथे खेळविण्यात येत आहेत. गोव्याने विजयासाठी ठेवलेल्या २६७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झारखंडचा डाव २२४ धावांत संपला. ... Read More »

बांगलादेशला नमवून भारत चॅम्पियन

दहा खेळाडूंनिशी खेळून नऊ खेळाडूंसह खेळलेल्या बांगलादेशचा २-१ असा पराभव करत भारताने काल रविवारी साफ (दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ) अंडर १९ अजिंक्यपद स्पर्धा जिंकली. २०१५ व २०१७ साली उपविजेतेपदावर समाधान मानावे लागल्यानंतर भारताने प्रथमच अंतिम अडथळा पार करत या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. विक्रम प्रताप सिंग (दुसरे मिनिट) याने भारताला आघाडीवर नेले. गुरकिरतच्या हेडरवर थोयबा सिंग याने दिलेल्या क्रॉसवर विक्रमने ... Read More »

युगात्मा गांधीजी

 प्रा. रमेश सप्रे या महापुरुषाच्या, खरं तर युगपुरुषाच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त जगभर कार्यक्रम साजरे केले जातील. पण ते कंठाळी घोषणा, कंटाळवाण्या भाषणांपुरते मर्यादित राहू नयेत. एखाद्या टुथपेस्ट किंवा लिप्‌स्टिकसारखे दिखाऊ असू नयेत. या कार्यक्रमातून अर्थपूर्ण, कल्याणकारी उपक्रम निर्माण व्हावेत, हीच खरी महात्मा गांधीजींना श्रद्धांजली ठरेल! ‘आजपासूनच्या तिसर्‍या पिढीतील लोकांचा या पृथ्वितलावर महात्मा गांधींसारखी व्यक्ती प्रत्यक्ष जगून गेली यावर विश्‍वासदेखील बसणार नाही’- ... Read More »