Daily Archives: September 28, 2019

प्रेरणास्त्रोत

इस्त्रोच्या चंद्रयान – २ च्या विक्रम लँडरशी संपर्क साधण्याच्या उरल्यासुरल्या सगळ्या आशा त्याच्या ७ सप्टेंबरच्या प्रक्षेपणानंतर चौदा दिवसांत म्हणजे गेल्या आठवड्यात २१ सप्टेंबरला संपुष्टात आल्या होत्या. ‘विक्रम’ जेथे उतरणार होते, त्या ठिकाणाच्या वरून जाणार्‍या स्वतःच्या लुनर ऑर्बिटरने टिपलेली काही छायाचित्रे ‘नासा’ ने काल जारी केली आहेत, त्यामध्येही ‘विक्रम’ चा थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे ‘विक्रम’ ने चंद्रावर हलकेच उतरण्याऐवजी ते भरवेगाने ... Read More »

लष्करी सज्जतेचे आधुनिक अस्त्र

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) आतापर्यंत भारत सुखोई-३० या लढाऊ विमानात रशियन बनावटीच्या हवेतून हवेत मारा करू शकणार्‍या क्षेपणास्त्राचा वापर करत होता. भारतीय बनावटीच्या या ‘अस्त्र’चे वैशिष्ट्य असे की प्रक्षेपणानंतर ते वेगाने लक्ष्यभेद करते, त्यामुळेच अस्त्रचे वर्णन बियॉंड विज्युअल रेंज मिसाईल असे केले जाते. गेल्या २०-२५ वर्षांपासून भारतीय सैन्याच्या आधुनिकीकरणाची चर्चा सुरू आहे. युपीए सरकारच्या काळात भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे लष्करी साधनसामग्रीच्या व्यवहारांची ... Read More »

दहशतवादाविरुद्ध जगाने एकत्र येणे अपरिहार्य

>> संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत नरेंद्र मोदी आज दहशतवादाचे आव्हान कोणा एकाच देशाला नसून जगातील सर्वच देशांना आणि पर्यायाने संपूर्ण मानवजातीला आव्हान आहे. म्हणूनच मानवतेसाठी संपूर्ण जगाने एकत्र येणे आता अपरिहार्य बनले आहे असे प्रतिपादन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतील आपल्या भाषणात केले. दहशतवादाच्या विरोधात युनोतील सदस्य देशांमध्ये एकमत दिसत नाही याकडे मोदी यांनी लक्ष्य वेधले. संयुक्त ... Read More »

कला अकादमीत तात्पुरती दुरुस्ती करून इफ्फीचे चित्रपट दाखवणार

कला अकादमी मुख्य सभागृहामध्ये तात्पुरती दुरुस्ती करून आगामी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) चित्रपटाचे प्रदर्शन केले जाणार आहे. कला अकादमीच्या इमारतीबाबत ़इफ्फीनंतर निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. कला अकादमीच्या इमारतीच्या सद्यःस्थितीबाबतच्या दोन्ही अहवालांवर सखोल अभ्यास करून इमारतीबाबत निर्णय घेतला जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. कला अकादमीचे दोन्ही अहवाल ... Read More »

गोवा राज्य सहकारी बँकेची आर्थिक स्थिती प्रगतीच्या दिशेने

>> अध्यक्ष उल्हास फळदेसाईंची पत्रपरिषदेत माहिती गोवा राज्य सहकारी बँकेची आर्थिक स्थिती प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असून ३१ मार्च २०२१ अखेर बँक नफ्यात येणार आहे. वर्ष २०१९-२०२० या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात बँकेला २४ कोटी रुपयांचा नफा उपेक्षित आहे. बँकेचा नेट एनपीए ५.५७ टक्यावर आलेला आहे. त्यामुळे ग्राहक, ठेवीदारांनी बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत घाबरून जाऊ नये, असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष ... Read More »

पावाची दरवाढ मागे

गोवा बेकरी मालक संघटनेने पावाच्या दरात केलेली १ रुपया वाढ मागे घेतली असून सरकारने बेकरी मालकांसाठी मदत करण्यासाठी योजना कार्यान्वित करावी, अशी मागणी काल केली आहे. बेकरी मालक संघटनेने येत्या १० ऑक्टोबरपासून पावाच्या दरात १ रुपया वाढ करण्याची घोषणा केली होती. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी बेकरी मालकांनी पावाच्या दरात केलेली वाढ मागे घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. बेकरी मालकांना ... Read More »

ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय पवारांनी केला रद्द

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळाप्रकरणात ईडीने चौकशीसाठी ७० जणांना बोलावणार असल्याचे जाहीर केल्यानंतर आपण स्वतःहून ईडी कार्यालयात काल दि. २७ रोजी जाणार असल्याची घोषणा केलेल्या शरद पवार यांनी तो निर्णय रद्द केला. हजारोंच्या संख्येने मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते जमणार असल्याने कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी पवार यांना ईडीच्या कार्यालयात न जाण्याची विनंती केल्याने पवार यांनी ... Read More »

कॅसिनोंच्या आग्वाद स्थलांतरास कॉंग्रेसचा सक्त विरोध

कॉंग्रेस पक्षाचा आग्वाद नजीक कॅसिनोंचे स्थलांतर करण्यास सक्त विरोध आहे. सरकारने कॅसिनो स्थलांतर करण्यासाठी सुरू केलेल्या हालचालींचा कॉंग्रेस निषेध करीत आहे, असे कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीस तथा कळंगुटचे माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी पत्रकार परिषदेत काल सांगितले. बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो यांनी कॅसिनो आग्वाद नजीक स्थलांतर करण्यासाठी प्रयत्न चालविला आहे. कॅसिनोमुळे कळंगुट मतदारसंघात वेश्या व्यवसाय आणि अंमली पदार्थांच्या व्यवसायात वाढ ... Read More »

मोठ्या विजयासह गोव्याला ‘ब’ गटाचे जेतेपद

>> संतोष चषक पश्‍चिम विभाग पात्रता स्पर्धा; दादरा व नगर हवेलीवर लादले १४ गोल डेन्सन फर्नांडिस आणि ऑलविन कार्दोजो यांनी हॅट्‌ट्रिकसह नोंदविलेल्या प्रत्येकी ४ गोलांच्या जोरावर गोव्याने धुळेर स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या संतोष चषक पश्‍चिम विभाग पात्रता स्पर्धेतील सामन्यात काल दादरा व नगर हवेलीचा १४-० असा धुव्वा उडवित ‘ब’ गटाचे जेतेपद प्राप्त केले. डेन्सन आणि ऑल्विन यांच्याव्यतिरिक्त ऍरेन सिल्वानेही शानदार हॅट्‌ट्रिक ... Read More »

एफसी गोवाचा सिग्नल्सवर आकर्षक विजय

भारतीय स्ट्रायकर मनवीर सिंगच्या दोन गोलांच्या जोरावर एफसी गोवा संघाने बांबोळी ऍथलेटिक स्टेडियमवर झालेल्या आयएसएस मोसमपूर्व मित्रत्वाच्या सामन्यात कोअर ऑफ सिग्नल्सवर ५-१ असा आकर्षक विजय मिळविला. मनवीरच्या दोन गोल व्यतिरिक्त ह्युगो बौमास, ब्रँडन फर्नांडिस आणि एदु बेदिया यांनी प्रत्येकी १ गोल नोंदविला. सामन्याच्या ६व्याच मिनिटाला मनवीर सिंगने उजव्या पायाच्या जोरकस फटक्यानिशी एफसी गोवाचे खाते खोलले. २४व्या मिनिटाला मनवीरने आणखी एक ... Read More »