Daily Archives: September 27, 2019

पुण्यात पावसाच्या हाहाकारात १७ जणांचा मृत्यू; प्रचंड वित्तहानी

प्रलयंकारी पावसाने पुणे शहरात मंगळवारपासून हाहाकार माजवला असून त्यात १७ जण मरण पावले आहेत. तसेच अनेक जनावरेही दगावली आहेत. दरम्यान जळगावमध्ये वीज पडून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील विविध भागांतील एक हजारहून अधिक जनावरे दगावल्याचे वृत्त आहे. काल दुपारपर्यंत ठिकठिकाणच्या अडकलेल्या १६ हजार लोकांची सुखरुप सुटका करण्यात आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले आहे. पुणे ... Read More »

कॅसिनोंना पुन्हा अभय

राजधानी पणजीमध्ये मांडवी नदीचा प्रवाह गुदमरवून टाकलेल्या कॅसिनोंना आणखी एक अभयदान राज्यातील भाजप सरकारने दिले आहे. अर्थात, हे अपेक्षित होतेच, कारण सत्तेवर येताच या कॅसिनोंसंदर्भात बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हे कॅसिनो हा गोव्याच्या पर्यटनाचा एक भाग असून सरकार ते बंद करू शकत नाही अशी प्रांजळ स्पष्टोक्ती केलेली होती. त्यांचे पूर्वसुरी मनोहर पर्रीकर मात्र कॅसिनोंना भाजपचा विरोध असल्याचे सांगत ... Read More »

पं. नेहरू, गोवामुक्ती आणि काश्मीर प्रश्नपं. नेहरू, गोवामुक्ती आणि काश्मीर प्रश्न

शंभू भाऊ बांदेकर देश स्वतंत्र झाला, तरी त्यानंतर गोवा मुक्तीला तब्बल चौदा वर्षे का लागली, असा सवाल मध्यंतरी गोवा भेटीवर येऊन गेलेले मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी उपस्थित केला होता. नवी दिल्लीच्या पत्र सूचना कचेरीच्या पुराभिलेखातील १९४७ ते १९६१ या काळातील अधिकृत कागदपत्रांचा अभ्यास करून दैनिक ‘नवप्रभा’ने नुकताच या विषयावरील पं. नेहरूंच्या भूमिकेवर दोन भागांत प्रकाशझोत टाकला… स्वतंत्र ... Read More »

पीएमसी ः १० हजार रू. काढण्याची ग्राहकांस मुभा

>> आरबीआयचा आदेश; संचालक मंडळ बरखास्त पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बँकेतून आता खातेदारांना महिन्यातून दहा हजार रुपये काढण्याची मुभा भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) जाहीर केली आहे. यामुळे खातेदारांना आता थोडासा दिलासा मिळणार आहे. याआधी या बँकेवर निर्बंध घालताना आरबीआयने खातेदारांना महिन्यातून केवळ एक हजार रुपये काढण्याची मुभा दिली होती. दरम्यान या बँकेच्या अनेक खातेदारांनी काल पोलिसांत सामुहिक तक्रार करून ... Read More »

डेंग्यूसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी अधिकार्‍यांबरोबर घेतला आढावा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आरोग्य संचालनालयाच्या अधिकार्‍यांची खास बैठक घेऊन राज्यातील वाढत्या डेंग्यू तापाच्या प्रकरणाचा आढावा घेतला. डेंग्यूचा फैलाव रोखण्याच्या उपाय योजनांना गती देण्यासाठी नगरपालिका प्रशासन आणि पंचायत प्रशासनाशी समन्वय साधण्याची सूचना सावंत यांनी अधिकार्‍यांना केली. राज्यातील विविध भागात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांत डेंग्यूबाबत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य खात्याने राज्यात आत्तापर्यंत तिघांचा डेंग्यूने मृत्यू ... Read More »

आमदार मोन्सेरात यांच्यावर आरोप निश्‍चित

>> अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरण; १७ ऑक्टोबरपासून सुनावणी येथील प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयाने पणजीचे भाजप आमदार बाबूश मोन्सेरात यांच्याविरोधात अल्पवयीन मुलीवरील कथित बलात्कार प्रकरणी काल आरोप निश्‍चित केले आहेत. तसेच, या प्रकरणातील सहआरोपी रोझी फेर्रांव हिच्याविरोधातही आरोप निश्‍चित करण्यात आले आहेत. आमदार मोन्सेरात आणि रोझी या दोघांना येत्या १७ ऑक्टोबरपासून या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीला सामोरे जावे लागणार ... Read More »

बेकायदा मच्छीमारी विरोधात एका महिन्यात कायदा तयार करा

>> सर्व संबंधितांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचा आदेश राज्यातील किनारी भागातील समुद्रात १२ नाविक मैल अंतरात बेकायदा मच्छीमारी करणार्‍या मोठ्या मच्छीमारी यांत्रिक ट्रॉलरवर कारवाई करण्यासाठी मच्छीमारी खात्याने एका महिन्यात आवश्यक नियम व कायदा तयार करण्याचा आदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिला. बागा-कळंगुट येथील स्थानिक मच्छीमारांनी कर्नाटकातील दोन मच्छीमारी यांत्रिक ट्रॉलर बुधवारी पकडून ठेवले आहेत. बेकायदा मच्छीमारी प्रकरणी पकडण्यात आलेल्या ट्रॉलरवर ... Read More »

कुंकळ्ळीतील एनआयटी संकुलाचे बांधकाम जुलै २०२१ मध्ये पूर्णत्वास

एनआयटी गोवाच्या कुंकळ्ळी येथील नियोजित संकुलाचे बांधकाम जुलै २०२१ मध्ये पूर्ण होणार आहे. एनआयटीचे संकुलात अत्याधुनिक साधन सुविधा उपलब्ध करताना पर्यावरणाचे संवर्धनासाठी हरित प्रकल्पाची (गो ग्रीन) संकल्पना राबविली जाणार आहे. पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर, सौरऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे, अशी माहिती एनआयटी गोवाच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष आणि संचालक प्रा. डॉ. गोपाल मुगेराय यांनी पत्रकार परिषदेत काल दिली. एनआयटी गोवाच्या संकुलासाठी १२४ ... Read More »

पोलीस बंदोबस्तात लोबो यांची सोनसडा प्रकल्पाची पाहणी

>> तीन आमदारांसह समर्थकांची निदर्शने मडगाव, कुडतरी व फातोर्ड्याचे आमदार, राय सरपंच, पंच सदस्य, मडगावचे बहुसंख्य नगरसेवक व नागरिकांनी काल कचरा व्यवस्थापन खात्याचे मंत्री मायकल लोबो सोनसडा प्रकल्पाची पहाणी करण्यास आल्यावेळी निदर्शने केली. लोबो यांनी पोलीस संरक्षणात सोनसडा कचरा यार्डाची पहाणी केली व आपण राजकारण न करता ही समस्या सोडविण्यासाठी येथे आल्याचे सांगितले. सोनसड्यावरील कचरा प्रक्रिया यार्डात अजूनपर्यंत कचर्‍यावर प्रक्रिया ... Read More »

गोवा संघाचे नेतृत्व राहुल मेहताकडे

>> विनू मांकड १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा पुदुचेरी येथे १ ऑक्टोबरपासून खेळविल्या जाणार्‍या विनू मांकड १९ वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी काल गुरुवारी गोवा क्रिकेट संघटनेने गोव्याच्या संघाची घोषणा केली. मागील मोसमात या स्पर्धेत गोव्याकडून सर्वाधिक बळी घेतलेल्या राहुल मेहता याच्याकडे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे. गोव्याचा संघ पुढीलप्रमाणे ः राहुल मेहता, कौशल हट्टंगडी, शशांक वेरेकर, गौरीश कांबळी, मोहित रेडकर, आयुष वेर्लेकर, ... Read More »