Daily Archives: September 26, 2019

एकाकी इम्रान

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे अमेरिकेतील सध्याचे ‘मिशन काश्मीर’ पार फसल्याचे दिसते आहे. जेथे जातील तेथे ते काश्मीरबाबत गळा काढत आहेत आणि येत्या शुक्रवारी संयुक्त राष्ट्र आमसभेमध्येही काश्मीरचा राग पुन्हा आळवणार आहेत, परंतु जगातील कोणत्याही देशाकडून त्यांच्या त्या अकांडतांडवाला त्यांना अपेक्षित असलेले समर्थन मिळू शकलेले नाही. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची काश्मीरबाबत मध्यस्थीची भाषा केली असली तरी केवळ भारत आणि ... Read More »

‘अरामको’ वरील हल्ला, चिंता भारताला!

शैलेंद्र देवळणकर सौदी अरेबियातील अरामको या सर्वांत मोठ्या तेलशुद्धीकरण कंपनीवर झालेल्या ड्रोन हल्ल्यांमुळे भारतासह संपूर्ण जगावरच इंधनदरवाढीचे ढग दाटले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी हुती या येमेनमधील बंडखोर गटाने घेतली असली तरी अमेरिकेच्या मते या हल्ल्यामागे इराणचा हात आहे. त्यामुळे अमेरिका इराणविरोधात आक्रमक पावले उचलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी आखातातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. या सर्वांमुळे इंधनाचा प्रश्‍न बिकट बनण्याची ... Read More »

कॅसिनो आणखी ६ महिने मांडवीतच

>> सावंत मंत्रिमंडळाने घेतला निर्णय ः सहा महिन्यांनंतर कॅसिनो धोरण तयार करणार राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत मांडवी नदीतील तरंगत्या कॅसिनोंना आणखी सहा महिन्यांचा काळ वाढवून देण्यात निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सरकारच्या या निर्णयामुळे मांडवी नदीतील तरंगते कॅसिनो आणखी सहा महिने तेथे राहू शकतील. हा सहा महिन्यांचा काळ पूर्ण होईपर्यंत सरकार कॅसिनो धोरण ... Read More »

मडगावातील आस्थापन व्यवस्थापकाचे अपहरण ः १२ तासात आरोपींना अटक

मडगाव येथील एका आस्थापनाच्या व्यवस्थापकाचा ५ जणांनी केलेल्या अपहरणाचा प्रयत्न मायणा कुडतरी पोलिसांनी १२ तासांच्या आत उधळून लावीत सदर व्यवस्थापकाची सुखरूपपणे अपहरणकर्त्यांच्या तावडीतून कर्नाटकात जाऊन सुटका केली व अपहरण करणार्‍या ५ जणांना अटक केली. याबाबत वृत्त असे की, ए. एन. गॅस लाईन प्रोजेक्टचे व्यवस्थापक अंबरीश प्रताप सिंग यांनी चार जणांनी मंगळवारी सायंकाळी पैशासाठी अपहरण केले व त्याला कर्नाटकात घेवून गेले. ... Read More »

जगभरातील उद्योजकांनी भारतात गुंतवणूक करावी ः पंतप्रधान

येथे आयोजित ग्लोबल बिझनेस फोरमच्या व्यासपीठावरून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल भारत कशा पद्धतीने प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे याकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. डेमॉक्रॅसी, डेमॉग्रॅफी, डिमांड व डिसिजिव्हनेस अशा मुद्द्यांचा उल्लेख मोदी यांनी यावेळी केला. जगभरातल्या उद्योजकांनी भारतात गुंतवणूक करावी असे आवाहन यावेळी मोदी यांनी केले. भारतात आम्ही लोकशाही, लोकांच्या अपेक्षा, मागणी आणि सरकारची निर्णय क्षमता हे मुद्दे विचारात घेऊन ... Read More »

न्यूड पार्टी ः महिला कॉंग्रेसची मुख्यमंत्री सावंत यांच्यावर टीका

उत्तर गोव्यात न्यूड पार्टीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जाहिरात प्रसार माध्यमांवर वायरल होऊनही गोवा सरकारने संबंधित व्यक्तीवर कोणतीही कारवाई न केल्याबद्दल काल प्रदेश महिला कॉंग्रेस प्रतिमा कुतिन्हो यांनी पत्रकार परिषदेतून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर जोरदार टीका केली. कुतिन्हो म्हणाल्या की या न्यूड पार्टीच्या जाहिरातीमुळे राज्याचे नाव तर खराब झालेले आहेच. शिवाय राज्यातल्या महिलांचाही प्रतिमा खराब झाली आहे. जगभरातील लोकांनी ... Read More »

म्हापसा अर्बनप्रश्‍नी सरकार दोन बँकांशी बोलणी करणार

म्हापसा अर्बन बँकेच्या पीएमसी बँकेमध्ये विलीनीकरणासंबंधी सुरू असलेली बोलणी अंतिम टप्प्यात आलेली असताना भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) पीएमसी बँकेवर आर्थिक निर्बंध लागू केल्याने विलीनीकरणाच्या प्रक्रियेत अडचण निर्माण झाली आहे. म्हापसा अर्बनच्या ठेवीदार, भागधारक, खातेदारांनी घाबरून जाऊ नये. सरकारकडून म्हापसा अर्बनच्या विलीनीकरणाबाबत टीजेएसबी सहकारी बँक आणि डोंबिवली सहकारी या दोन बँकांशी बोलणी करणार आहे, अशी माहिती सहकार मंत्री गोविंद गावडे यांनी ... Read More »

गांधीजींच्या १५० व्या जयंतीनिमित्त पणजीत निसर्गोपचार शिबिर

केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा (स्वायत्त) संस्था, प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो, माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकार, महाराष्ट्र व गोवा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त येत्या ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०१९ दरम्यान पणजी येथे कला अकादमीच्या आवारात भव्य निसर्गोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स्वास्थ्य अवलंबन ते स्वावलंबन या शीर्षकाखालील शिबिरात महात्मा गांधी ... Read More »

गोव्याची मध्य प्रदेशवर सात गोलांची बरसात

>> संतोष करंडक पश्‍चिम विभागीय पात्रता स्पर्धा संतोष करंडक पश्‍चिम विभागीय पात्रता स्पर्धेत काल बुधवारी गोव्याने मध्य प्रदेशवर सात गोलांची बरसात करताना ७-१ असा धमाकेदार विजय मिळविला. गोवा फुटबॉल संघटनेच्या यजमानपदाखाली होत असेलेली ही स्पर्धा धुळेर स्टेडियमवर खेळविण्यात येत आहे. यजमान गोव्याकडून देवेंद्र मुरगावकर, सॅम्युअल कॉस्ता, ज्योकिम अब्रांचिस, लेस्ली रिबेलो, स्टेन्डली फर्नांडिस यांनी प्रत्येकी एक तर बदली खेळाडू ऍरन सिल्वाने ... Read More »

कश्यप दुसर्‍या फेरीत

पी.व्ही. सिंधू, सायना नेहवाल व बी. साई प्रणिथ यांना कोरिया ओपन वर्ल्ड टूर सुपर ५०० स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत बाहेरचा रस्ता धरावा लागला. पारुपल्ली कश्यपने तैवानच्या लू चिया हुंग याचा ४२ मिनिटांत २१-१६, २१-१६ असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. महिला एकेरीत सिंधूला अमेरिकेच्या बीवन झांग हिने ७-२१, २४-२२, १५-२१ असे नमविले. दुखापतीमुळे सायना नेहवाल व प्रणिथ यांनी सामना अर्ध्यावरच सोडला. ... Read More »