Daily Archives: September 25, 2019

ग्राहक गोत्यात

गोव्यातील सहा शाखांसह सहा राज्यांमध्ये एकूण १३७ शाखा असलेल्या पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक म्हणजेच पीएमसी बँकेवर रिझर्व्ह बँकेने काल पुढील सहा महिन्यांसाठी कडक निर्बंध लागू केले. या काळात बँकेला नव्या ठेवी स्वीकारता येणार नाहीत, कर्ज देता येणार नाही, गुंतवणूक करता येणार नाही हे तर खरेच, परंतु त्या बँकेतील ठेवीदारांना आपल्या खात्यातून एक हजार रुपयांपेक्षा एक पै देखील काढता येणार ... Read More »

ऑनलाइन गेमिंगचे आव्हान

ऍड. प्रदीप उमप एकीकडे मोबाईल आणि इंटरनेट या जीवनावश्यक गोष्टींच्या यादीत भर घालत असतानाच त्यामुळे समस्याही निर्माण होत आहेत; तर दुसरीकडे लोकांमध्ये वैज्ञानिक समज वाढते आहे आणि इंटरनेट सुलभही झाले आहे. त्या सुलभतेने इंटरनेटवरील ऑनलाईन गेम्सचे प्रस्थही मोठ्या प्रमाणात वाढते आहे. या गेम खेळण्याच्या सवयीचे हळूहळू व्यसन जडते आहे. अशा वेळी पालकांनी मुलांना या खेळांपासून दूरच ठेवले पाहिजे. आधुनिक मानसशास्त्राचा ... Read More »

पीएमसी बँकेवर आरबीआयचे निर्बंध:ग्राहकांकडून संताप

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी) रिझर्व्ह बँक ऑङ्ग इंडियाने सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादल्याने बॅँकेंच्या महाराष्ट्र, गोव्यासह अन्य राज्यांमधील ग्राहकांत खळबळ उडाली आहे. बँकेची सद्यस्थिती पाहून ग्राहकहितासाठी बँकेवर निर्बंध आणल्याचे आरबीआयने आपल्या आदेशात म्हटले आहे. आरबीआयने पीएमसी बँकेवर २३ सप्टेंबरपासून निर्बंध लागू केले आहेत. ग्राहकांच्या हितासाठी बँकेवर निर्बंध आणल्याचं रिझर्व्ह बँकेने आदेशात नमूद केले आहे. पीएमसी बँकेवर नवी कर्ज ... Read More »

शरद पवार, अजित पवार यांच्यावर ईडीकडून गुन्हे नोंद

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी अजित पवार यांच्यासह एकूण ७० जणांवर ईडीकडून गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर असल्याच्या पार्श्‍वभूमीवर अजित पवार व शरद पवार यांच्या अडचणी वाढल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे गेली दोन वर्षे या अनुषंगाने कोणत्याही घडामोडी घडल्या नसताना विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर लगेच ईडीने गुन्हा नोंदवला आहे. २००५ ते २०१० या कालावधीत मोठ्या प्रमाणात ... Read More »

दोनापावलच्या इफ्फी कन्वेंशन सेंटर बांधकामातून इडीसीची माघार

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (इफ्फी) दोनापावल येथील नियोजित कन्वेंशन सेंटरच्या बांधकामातून माघार घेण्याचा निर्णय आर्थिक विकास महामंडळाच्या (ईडीसी) संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी पत्रकार परिषदेत काल दिली. राज्य सरकारने दोनापावल येथे आयटी प्रकल्पासाठी ताब्यात घेतलेल्या सुमारे २ लाख चौरस मीटर जागेत इफ्फीसाठी कायम स्वरूपी साधन सुविधा उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच ईडीसीची ... Read More »

धोरण तयार होईपर्यंत कॅसिनोंना मुदतवाढ ः लोबो

मांडवी नदीतील तरंगते कॅसिनो आग्वाद येथील खाडीत हलवण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या असल्याचे बंदर कप्तान खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी सोमवारी सांगितले होते. मात्र, दुसर्‍याच दिवशी काल लोबो यांनी कॅसिनोंसाठीचे धोरण तयार होईपर्यंत या कॅसिनोंना मुदतवाढ देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. पर्रीकर यांच्या तत्कालीन सरकारने गेल्या मार्च महिन्यात या कॅसिनोंना मांडवी नदीत ठेवण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली होती. ती मुदतवाढ ३० ... Read More »

काश्मीर खोर्‍यातील परिस्थिती खूप वाईट

>> गुलाम नबी आझाद यांचा दावा काश्मीर खोर्‍यातील परिस्थिती खूप वाईट आहे असे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार गुलाम नबी आझाद यांनी पत्रकारांना सांगितले. घटनेतील ३७० कलम रद्दबातल झाल्यानंतर आझाद सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीने सहा दिवसांसाठी जम्मू-काश्मीरात आले आहेत. प्रसारमाध्यमांना सध्या मी काही सांगू इच्छित नाही. आपण काश्मीरात चार दिवस राहिलो आणि आता जम्मूत दोन दिवसांसाठी आलो आहे. सहा दिवसांचा दौरा संपल्यानंतर ... Read More »

कंपन्यांच्या करकपातीमुळे मिळणार अर्थव्यवस्थेला नवी उभारी ः मुख्यमंत्री

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गोव्यात झालेल्या जीएसटी मंडळाच्या बैठकीत देशातील उद्योगाला चालना देण्यासाठी देशांतर्गत कंपन्यांच्या करात कपात करून तो ३० टक्क्यांवरून २२ टक्के असा जो खाली आणला त्याने देशाच्या अर्थव्यवस्थेला एक नवी उभारी येण्यास मदत होणार असल्याचे काल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण व केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांचे वरील निर्णयासाठी आपण ... Read More »

भारताचा आफ्रिकेवर ११ धावांनी विजय

>> दीप्ती शर्माचा प्रभावी मारा, हरमनप्रीतची अष्टपैलू चमक येथील लालभाई कॉंट्रॅक्टर स्टेडियमवर काल मंगळवारी भारताच्या महिला संघाने दक्षिण आफ्रिकेचा ११ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने पाच टी-ट्वेंटी सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारताने विजयासाठी ठेवलेल्या १३१ धावांचा पाठलाग करताना पाहुण्यांचा डाव १९.५ षटकांत ११९ धावांत संपला. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. भारताने १५ ... Read More »

बुमराहच्या जागी उमेश

भारताचा प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला मुकणार आहे. त्याच्या जागी उमेश यादव याची निवड करण्यात आली आहे. पाठीला झालेल्या दुखापतीमुळे बुमराहचे नाव मागे घेण्यात आले आहे. उभय संघांतील मालिका २ ऑक्टोबरपासून विशाखापट्टणम येथे सुरू होणार आहे. दुसरा सामना पुणे येथे १० ऑक्टोबरपासून तर तिसरा सामना १९ ऑक्टोबरपासून रांची येथे खेळविला जाणार आहे. मागील ... Read More »