Daily Archives: September 24, 2019

नवे मैत्रिपर्व

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतार्थ विदेशस्थ भारतीयांनी अमेरिकेत ह्यूस्टनमध्ये आयोजित केलेल्या ‘हाऊडी मोदी’ मधील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणांनी भारत आणि अमेरिका अतिशय जवळ आले असल्याचे अत्यंत आश्वासक चित्र निर्माण केलेले आहे. विशेषतः ‘इस्लामी दहशतवादा’ चा ट्रम्प यांनी केलेला स्पष्ट उल्लेख, उभय देशांनी आपापल्या सीमांचे रक्षण करण्याची व्यक्त केलेली आवश्यकता आणि ट्रम्प यांच्या उपस्थितीतच मोदींनी कलम ३७० ... Read More »

देशापुढे आर्थिक मंदीचे आव्हान!

देवेश कु. कडकडे (डिचोली) अर्थव्यवस्था सुरळीत राखणे हे केवळ एकट्या सरकारचेच कर्तव्य आहे असे आपण मानतो. मात्र त्याला जनतेने साथ देणे तितकेच आवश्यक आहे. आपण देशाची नैसर्गिक संपत्ती उधळतो. कर्ज काढून ते बुडवतो, बँकेत, पतसंस्थेत घोटाळा करून जनतेचे पैसे लाटतो. कर चुकवण्यासाठी नाना क्लृप्त्या करतो. काळा पैसा दडवून ठेवतो. आपली नोकरशाही तर राष्ट्राला दुय्यम लेखून व्यक्तिगत प्रगती कशी होईल यावर ... Read More »

काश्मीरात ५०० दहशतवादी घुसण्याच्या तयारीत

>> सुरक्षा दलांसाठी सर्वत्र हाय अलर्ट भारतीय हवाई दलाने काही काळापूर्वी उद्ध्वस्त केलेल्या पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवादी तळांवर प्रशिक्षण घेतलेले सुमारे ५०० दहशतवादी भारतीय हद्दीत घुसण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. या वृत्ताला लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी दुजोरा दिला असून संभाव्य दहशतवादी हल्ले उधळून लावण्यासाठी भारतीय सुरक्षा दले पूर्ण सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. भारतीय हवाई दलाने उद्ध्वस्त ... Read More »

बेरोजगारांच्या नेमक्या आकडेवारीसाठीच ऑनलाईन रोजगार नोंदणीचे काम

>> कॉंग्रेसच्या आरोपावर सरकारचा खुलासा राज्यात सध्या नक्की कितीजण बेरोजगार आहेत हे जाणून घेण्यासाठीच रोजगार विनिमय केंद्राने ऑनलाईन नोंदणी करण्याचे काम हाती घेतले होते, असा खुलासा काल सरकारने एका पत्रकाद्वारे केला आहे. राज्यातील रोजगार विनिमय केंद्रात नावनोंदणी असलेल्या १ लाख २० हजार उमेदवारांची नावे सरकारने रद्द केल्याविषयी रविवारी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केलेल्या आरोपासंबंधी सरकारने हा खुलासा केलेला ... Read More »

डॉ. गोम्स यांचे शासकीय स्मरण व्हावे ः कॉंग्रेस

डॉ. फ्रान्सिस लुईस गोम्स यांची ३० सप्टेंबर रोजी १५० वी पुण्यतिथी असून या महान नेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी सरकारी पातळीवर त्यांच्या स्मरणार्थ विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे, अशी मागणी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना लिहिलेल्या पत्रातून केली आहे. वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी देहावसान झालेल्या डॉ. गोम्स यांनी पोर्तुगालच्या संसदेत गोव्याचे प्रतिनिधीत्व करून भारताच्या स्वातंत्र्यासाठीची ... Read More »

कॅसिनो आग्वादला हलविण्यावर मुख्यमंत्र्यांशी आज/उद्या चर्चा

>> मंत्री मायकल लोबो यांची माहिती तरंगते कॅसिनो मांडवीतून आता आग्वाद खाडीत हलवण्यासाठीच्या हालचाली सरकारी पातळीवर सुरू झालेल्या असून मंत्री मायकल लोबो हे पणजीचे मदार बाबुश मोन्सेर्रात यांच्यासह आज मंगळवारी अथवा उद्या बुधवारी या प्रश्‍नावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करणार आहेत. काल यासंबंधी मंत्री मायकल लोबो हे माहिती देताना म्हणाले की मांडवी नदीत पणजीच्या दिशेने असलेल्या सहा कॅसिनोंपैकी ... Read More »

हवामान बदलाविरोधात कृती करण्याची वेळ ः मोदी

जागतिक हवामान बदलाविरोधात कृती करण्याची वेळ आली आहे असे प्रतिपादन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल येथे आयोजित संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेत बोलताना केले. चर्चा करण्याची वेळ निघून गेली आहे, आता वेळ आली आहे कृतीची असे मोदी म्हणाले. हवामान बदलाच्या विरोधात भारताकडून केल्या जाणार्‍या उपाययोजनांची माहिती मोदी यांनी आपल्या भाषणातून दिली. ते म्हणाले, ‘आम्ही लाखो कुटुंबांना स्वयंपाक गॅसच्या जोडण्या दिल्या ... Read More »

आल्तिनो-पणजीला लवकरच मिळणार नवे वीज उपकेंद्र

आल्तिनो – पणजी येथे अंदाजे १७ कोटी ९९ लाख ३६ हजार ९५९ रुपये खर्चून नवीन ३३/११ केव्ही गॅस इन्सुलेटेड उप वीज केंद्र उभारण्यात येणार आहे. वीज खात्याने या वीज उपकेंद्राची रचना, पुरवठा, स्थापना, चाचणी आणि चालू करण्यासाठी निविदा जारी केली आहे. केंद्र सरकारच्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेखाली हे वीज उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. इच्छुक ठेकेदारांसाठी निविदा ऑन लाइन पद्धतीने उपलब्ध ... Read More »

..तर शॅकमालक किनार्‍यांवर ब्ल्यू फ्लॅग निर्णयाला विरोध करणार

राज्यातील शॅक मालक कल्याण सोसायटीच्या काल झालेल्या बैठकीत राज्यातील १० किनार्‍यांना ‘ब्ल्यू प्लॅग’ प्रमाणपत्र देण्याच्या राज्य सरकारच्या योजनेविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच सरकारने शॅक मालकांसह अन्य घटकांना विश्‍वासात न घेता किनार्‍यांना ब्ल्यू प्लॅग प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतल्यास त्याला विरोध करण्याचे ठरवण्यात आले. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार गोवा सरकार राज्यातील १० किनार्‍यांचे ब्ल्यू प्लॅग प्रमाणपत्राने नामांकन करू पाहत आहे. मात्र, हे ... Read More »

अन्न फसवणुकीवर आयटी व्यासपीठ हवे ः टिओटिया

अन्नविषयक ङ्गसवणूक आणि इतर हितसंबंधांतील इतर बाबींविषयी माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी आयटी सक्षम माहिती व्यासपीठ तयार करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन एङ्गएसएसएआयच्या अध्यक्षा श्रीमती रीटा टीओटिया यांनी काल येथे केले. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने जागतिक आरोग्य संघटना, संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेच्या सहकार्याने ओल्ड गोवा येथे आयोजित एङ्गएओ / डब्ल्यूएचओ समन्वय समितीच्या २१ व्या सत्राच्या उद्घाटन समारंभात श्रीमती ... Read More »