Daily Archives: September 23, 2019

रस्ते पूर्ववत करा

राज्यातील जवळजवळ सर्व छोट्या मोठ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. राज्यात यंदा पडलेल्या विक्रमी पावसावर खापर फोडून सरकार नामानिराळे होऊ पाहते आहे, परंतु खरोखरच या खड्‌ड्यांना केवळ पाऊस जबाबदार आहे का? गोव्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. इंचांची शंभरी तो दरवर्षी पार करीत असतो. यावेळी तो त्याहून खूप अधिक झाला हे जरी मान्य केले, तरीही केवळ मुसळधार पाऊस पडला ... Read More »

अघोषित आणीबाणीचा बुडबुडा

ल. त्र्यं. जोशी तुम्ही झोपी गेलेल्याला जागे करु शकता, पण झोपेचे सोंग घेणार्‍याला कसे जागे करु शकणार आहात, हा खरे तर मुळात प्रश्न आहे. त्याचे उत्तर अद्याप कुणालाही सापडलेले नाही. अघोषित आणीबाणीचा आरोप करण्याचे विरोधकातील वैङ्गल्य हेही एक ङ्गार मोठे कारण आहे. गेली पाच वर्षे मोदी सरकारविरुध्द असंतोष निर्माण करण्यात, एवढेच नव्हे तर मोदींविषयी जनमानसात तिरस्कार निर्माण करण्यात त्यांनी कोणतीही ... Read More »

दहशतवादविरोधी लढ्यात भारतासोबत ः ट्रम्प

>> ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमात ५० हजार भारतीयांचा सहभाग भारताने आजपर्यंत दहशतवादाचा सामना केलेला असून दहशतवादाशी लढत असलेल्या भारताच्या पाठिशी अमेरिका सदैव राहील. सीमा सुरक्षा दोन्ही देशांसाठी गरजेची असून भारतीय संरक्षण क्षेत्रात अमेरिका मदत करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश उत्तम प्रगती करत असून विकासाची एकेक पायरी गाठत आहे. त्यासाठीही अमेरिका भारताला मदत करण्यासाठी सदैव तयार आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली ... Read More »

इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी दोन महिन्यांत धोरण ः काब्राल

राज्य सरकार विजेवर (इलेक्ट्रिक) चालणारी वाहन खरेदीच्या प्रोत्साहनासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्यात येणार असून येत्या दोन महिन्यांत धोरण तयार करण्यासाठीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती वीज व अपारंपरिक ऊर्जामंत्री नीलेश काब्राल यांनी काल दिली. देशभरात वाढत्या वाहनांमुळे प्रदूषणाची समस्या निर्माण होत आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन सुरू करण्यात आले आहे. गोव्यातसुध्दा वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली ... Read More »

मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फ्रान्सिस दिब्रिटो

उस्मानाबाद येथे होणार्‍या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक ङ्गादर ङ्ग्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने निवड झाली आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष निवडीबाबत उस्मानाबाद येथे काल रविवारी भारतीय साहित्य महामंडळाची बैठक झाली. या बैठकीत ही निवड करण्यात आली. हे साहित्य संमेलन जानेवारी महिन्यात होणार आहे. या बैठकीला महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील उपस्थित होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक ... Read More »

रोजगार विनिमय केंद्रातून लाखभर उमेदवारांची नावे रद्द

>> गिरीश चोडणकर यांची पत्रपरिषदेत माहिती राज्यातील रोजगार विनिमय केंद्रात नावनोंदणी केलेल्या १ लाख २० हजार उमेदवारांची नावे सरकारने रद्द केलेली आहेत. त्यामुळे आता तेथे ऑनलाईन पद्धतीने नव्याने नोंदणी केलेल्या उमेदवारांची तेवढीच नावे शिल्लक राहिलेली आहेत. वरील १ लाख २० हजार उमेदवारांना सरकारी नोकरीसाठीचा दरवाजा कायमचा बंद झाला असल्याची माहिती प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार ... Read More »

कळंगुटमध्ये नायजेरियनकडून ५ लाखांचे कोकेन जप्त

गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने अमलीपदार्थ प्रकरणी कळंगुट येथे छापा घालून इबोनीनामक (४० वर्षे) एका नायजेरियन नागरिकाला अटक केली असून त्यांच्याकडून ८३ ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या अमलीपदार्थाची किंमत अंदाजे ५ लाख रुपये एवढी आहे. २१ सप्टेंबरला सकाळी ९ ते दुपारी २.३० यावेळेत गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी नायजेरीन नागरिक राहत असलेल्या ठिकाणावर छापा घालून त्याला ताब्यात घेतला. ... Read More »

राज्यात पेट्रोलच्या दरात वाढ सुरूच

राज्यात मागील आठ दिवसापासून पेट्रोलच्या दरात वाढ सुरू आहे. मागील आठ दिवसात पेट्रोलच्या दरात १ रुपया ७७ पैसे एवढी वाढ झालेली आहे. रविवारी पणजीत ६९.८१ रुपये दराने पेट्रोलची विक्री केली जात होती. गेल्या १२ सप्टेंबरला पेट्रोलचा दर ६७.८९ असा होता. त्यानंतर १३ सप्टेंबरला पेट्रोलच्या दरात १९ पैसे वाढ झाली. १४ सप्टेंबरला पेट्रोलच्या दरात १६ पैसे कपात झाली. त्यानंतर पेट्रोलच्या दरात ... Read More »

राजधानीत कांदा ६० रु. किलो

>> उत्पादन कमी झाल्याने दर वाढल्याची माहिती राजधानी पणजीतील मार्केटमध्ये कांद्याचा दर प्रति किलो ६० रुपयांवर पोहोचला आहे. मार्केटमध्ये कांद्याच्या दरात अचानक मोठी वाढ झाल्याने ग्राहक अचंबित झाले आहेत. पणजी येथील गोवा मार्केटिंग फेडरेशनच्या भाजी विभागात शनिवारी कांद्याचा दर प्रति किलो ४० रुपये असा होता. तर, रविवारी कांद्याचा दर प्रतिकिलो ६० रुपये झाला. पणजी महानगरपालिकेच्या मार्केटमध्ये प्रतिकिलो ६० रुपये दराने ... Read More »

‘जीसीए’त लोटलीकर पॅनलची बाजी

सूरज लोटलीकर यांच्या पॅनलने गोवा क्रिकेट संघटनेच्या (जीसीए) निवडणूकीत काल बाजी मारली. सचिवपदासाठीच्या लढतीत विनोद फडके यांचे पूत्र विपुल फडके (७८) यांनी हेमंत आंगले (२४) यांचा पराभव केला. गोवा जलतरण संघटनेचे माजी सचिव सय्यद अब्दुल माजिद यांनी सह सचिवपदासाठी ८१ मते मिळवता आपले निकटचे प्रतिस्पर्धी सुदेश प्रभुदेसाई (२२) यांना पराजित केले. परेश गोविंद फडते (८३) यांची खजिनदार म्हणून निवड झाली. ... Read More »