Daily Archives: September 21, 2019

कॉर्पोरेट क्षेत्राला दिलासा

वस्तू व सेवा कर मंडळाच्या बैठकीसाठी गोव्यात आलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काल कॉर्पोरेट करामध्ये भरघोस कपातीची देशाच्या समस्त उद्योगजगताला दिलासा देणारी महत्त्वपूर्ण घोषणा केली. वास्तविक, गेल्या काही अर्थसंकल्पांच्या वेळेस अशा प्रकारे उद्योग जगताला दिलासा देण्यासाठी कॉर्पोरेट करात कपात केली जाणार का, असा सवाल विचारला जात असे, परंतु सरकारने ते पाऊल आजवर उचलले नव्हते. मात्र, देशाचे घसरलेले अर्थव्यवस्थेचे गाडे ... Read More »

पाकिस्तानची संभाव्य सामरिक खेळी

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) भारताने सैनिकी प्रतिकार सुरु करताच ही चकमक अणुयुद्धात बदलू शकते या शक्यतेने घाबरलेले पाश्चिमात्य देश व संयुक्त राष्ट्र सुरक्षा समिती युद्धबंदीसाठी प्रयत्न लागू करतील अशी आशा पाकला वाटते. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांच्या चीन दौर्‍यात त्यांनी याच मुद्यावर चिनी अधिकार्‍यांशी चर्चा केली असावी, असाही संरक्षणतज्ज्ञांचा होरा आहे. २६ फेब्रुवारी २०१९ रोजी भारताने बालाकोटवर हवाई हल्ला केला. २७ फेब्रुवारीला ... Read More »

कॉर्पोरेट करात मोठी कपात ः सीतारामन

>> अर्थव्यवस्थेला उभारी व मेक इन इंडियाला प्रोत्साहन देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी आणि मेक इन इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी कॉर्पोरेट करामध्ये चांगलीच कपात केली जात आहे. कॉर्पोरेट कराचे दर घरगुती कंपन्यांसाठी २२ टक्के व नवीन देशांतर्गत उत्पादक कंपन्यांसाठी १५ टक्के पर्यंत खाली आणण्यात येत आहेत, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ३७ व्या जीएसटी मंडळाच्या बैठकीपूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत काल येथे ... Read More »

हॉटेलच्या जीएसटी दरात कपात

>> केंद्रिय अर्थमंत्री सीतारामन यांची माहिती वस्तू आणि सेवा कर मंडळाच्या ३७ व्या बैठकीत पर्यटन उद्योगासाठी जीएसटी दरात कपात करण्याचा निर्णय घेऊन पर्यटन उद्योगाला दिलासा देण्यात आला आहे. तारांकित हॉटेलचा जीएसटी दर २८ टक्क्यांवरून १२ टक्के आणि १८ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. रु. १००१ ते ७५०० दरासाठी १२ टक्के आणि रु. ७५०१ दरावरील हॉटेलसाठी १८ टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. ... Read More »

भारतीय वायूदलाच्या ताफ्यात पहिले राफेल विमान दाखल

भारतीय वायूदलाच्या ताफ्यात फ्रान्सकडून मिळालेले पहिले राफेल विमान दाखल झाले आहे. राङ्गेल बनवणारी कंपनी दसॉ एविएशनकडून पहिले राङ्गेल स्वीकारण्यात आल्याची माहिती भारतीय वायूदलातील सूत्रांनी दिली. राङ्गेल करारात घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी मोदी सरकारवर केला होता. त्यामुळे राङ्गेलचा मुद्दा देशभर गाजला होता. डेप्युटी एअर ङ्गोर्सचे चीङ्ग मार्शल व्ही. आर. चौधरी यांच्या उपस्थितीत राङ्गेल विमान स्वीकारण्यात आले. श्री. चौधरी यांनी राङ्गेल विमान ... Read More »

लँडर विक्रमशी संपर्काच्या आशा जवळपास संपुष्टात

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रात्र होण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (इस्त्रो) पाठवण्यात आलेल्या चांद्रयान २चे लँडर विक्रम चंद्र भूमीवर आहे. चंद्रावर रात्र होण्यास काही तासांचा कालावधी शिल्लक आहे. चंद्रावर पुढील १४ दिवस रात्र सुरू होणार असून त्यामुळे विक्रमशी संपर्क करणे ही अशक्य गोष्ट आहे. या कालावधीत विक्रम लँडरचा फोटोदेखील काढता येणार नाही. चंद्राच्या ज्या भागावर विक्रम आहे तेथे ... Read More »

जीएसटी, नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेची घसरण

>> पॉंडेचरीच्या मुख्यमंत्र्यांचा आरोप देशाच्या अर्थव्यवस्थेची जीएसटी आणि नोटाबंदीमुळे घसरण सुरू आहे, असा आरोप पॉंडेचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांनी येथे काल केला. येथे आयोजित जीएसटी मंडळाच्या ३७ व्या बैठकीसाठी पॉंडीचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी आले आहेत. मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांनी कॉंग्रेस भवनाला भेट देऊन प्रदेश कॉंग्रेस समितीचे पदाधिकारी, गट अध्यक्ष आणि युवा कॉंग्रेसच्या पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन केले. यावेळी गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे ... Read More »

बार्ज मालकांच्या समस्या सोडवणार ः सीतारामन

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची गोवा बार्ज मालक संघटनेचे अतुल जाधव यांनी भेट घेऊन बार्ज उद्योजकांना भेडसावणार्‍या विविध समस्या त्यांच्यासमोर मांडल्या आहेत. जीएसटी मंडळाच्या ३७ व्या बैठकीच्या ठिकाणी अर्थमंत्री सीतारामन यांची बार्ज मालक संघटनेचे जाधव यांनी भेट घेतली. खाण व्यवसाय बंद पडल्याने बार्ज मालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे सांगितल्यावर या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू असे आश्‍वासन सीतारामन यांनी ... Read More »

टेबलटेनिसपटू साथियानने रचला इतिहास

भारताच्या जी. साथियान याने आयटीटीएफ-एटीटीयू आशियाई टेबल टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करत ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने जागतिक क्रमवारीत १५१व्या स्थानावर असलेल्या उत्तर कोरियाच्या एन जी सोंग याचा ११-७, ११-८, ११-६ असा पराभव केला. या प्रतिष्ठेच्या खंडीय स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारणारा साथियान हा केवळ दुसराच भारतीय खेळाडू ठरला. यापूर्वी १९७६ साली दिल्लीच्या सुधीर फडके यांनी ‘अंतिम ८’मध्ये प्रवेश केला ... Read More »

झिंबाब्वेचा अफगाणवर ऐतिहासिक विजय

कर्णधार हॅमिल्ट्‌न मासाकाद्झा याने आपल्या शेवटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात चोपलेल्या ७१ धावांच्या जोरावर झिंबाब्वेने काल शुक्रवारी अफगाणिस्तानचा ७ गडी व ३ चेंडू राखून पराभव केला. या कामगिरीसह झिंबाब्वेने अफगाणिस्तान संघाची टी-ट्‌ेंटीमधील सलग १२ विजयांची मालिका खंडित केली. झिंबाब्वेने क्रिकेटच्या या अतिझटपट प्रकारात अफगाण संघावर मिळविलेला हा पहिलाच विजय ठरला. अफगाणिस्तानने विजयासाठी ठेवलेले १५६ धावांचे माफक लक्ष्य झिंबाब्वेने १९.३ षटकांत ३ गडी ... Read More »