Daily Archives: September 19, 2019

महाराष्ट्रात पडघम

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय जनता पक्षात मोठ्या प्रमाणावर आणि शिवसेनेमध्ये काही प्रमाणात सुरू असलेले नेत्यांचे ‘इनकमिंग’ लक्षात घेता येणार्‍या निवडणुकीमध्ये कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडीसाठी ही अस्तित्वाची लढाई असणार आहे. नेत्यांमागून नेते पक्ष सोडून चालले आहेत. एका रात्रीत निष्ठा बदलत आहेत. या परिस्थितीत पक्षाला लागलेली ही गळती थांबवायची कशी या चिंतेत दोन्ही पक्षांचे श्रेष्ठी ... Read More »

बांगलादेश भारताहून सरस कसा?

शैलेंद्र देवळणकर शेख हसिना यांनी शिक्षणावर भर दिला. तिथल्या तरुणांना पाश्‍चिमात्य देशात खास करून अमेरिकेतील विद्यापीठांमधून अर्थशास्त्राचा, व्यवस्थापनाचा, माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी पाठवले. त्यासाठी खूप मोठे प्रोत्साहन दिले, प्रेरणा दिली. तसेच प्रगत राष्ट्रांमधून शिकून परत आलेल्या तरुणांना त्यांनी व्यवस्थापनात सामील केले. सध्या भारतात विकास दरातील घसरणीची, आर्थिक मंदीची चर्चा सुरू आहे, पण त्याचवेळी भारताचा शेजारी असलेला आणि भारताच्या प्रयत्नांमुळेच उदयास ... Read More »

पेडण्यातील ३७ चिरे खाणींना नोटिसा

>> तलाठ्यांमार्फत अहवाल तयार करण्यास प्रारंभ तुये येथील डॉन बॉस्को विद्यालयातील हॉस्टेलमध्ये राहणार्‍या चार विद्यार्थ्यांचा तुये येथील चिरेखाणीत बुडून मृत्यू झाल्यानंतर पेडणे तालुक्यातील चिरेखाणींचा विषय ऐरणीवर आला आहे. पेडणे तालुक्यातील ३७ चिरेखाणींच्या मालकांना जिल्हाधिकार्‍यांनी नोटिसा पाठवल्या आहेत. तसेच पेडणे तालुक्याचे उपजिल्हाधिकारी व मामलेदार यांनी पंचायत पातळीवर तलाठ्यांना सर्व पंचायत क्षेत्रात ज्या चिरे खाणी आहेत, ती जागा, सर्वे क्रमांक, व्यापलेली जागा ... Read More »

जीएसटी मंडळाची उद्या गोव्यात बैठक

>> महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता जीएसटी मंडळाची ३७ वी सभा उद्या शुक्रवार दि. २० सप्टेंबर रोजी गोव्यात घेण्यात येणार आहे. या जीएसटी बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या बैठकीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर, विविध राज्यांचे अर्थमंत्री किंवा जीएसटी मंडळाचे सदस्य आणि सरकारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत जीएसटी नोंदणी आधार ... Read More »

दोन जलदगती न्यायालये सुरू करण्यास मान्यता द्या ः राणे

>> दिल्लीत मंत्री स्मृती इराणींकडे मागणी गोव्यात मुलांवरील लैंगिक अत्याचाराची प्रकरणे जलद गतीने निकालात काढण्यासाठी दोन जलदगती न्यायालये आणि १०० नवीन अंगणवाडी केंद्रे सुरू करण्यास मान्यता द्यावी, अशी मागणी महिला व बालकल्याण मंत्री विश्‍वजित राणे यांनी केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे नवी दिल्ली येथे काल केली. नवी दिल्ली दौर्‍यावर असलेल्या महिला व बालकल्याण मंत्री राणे यांनी केंद्रीय ... Read More »

किनारी व्यवस्थापन आराखडा लवकरच पंचायतींकडे ः काब्राल

एनसीएससीएमने तयार केलेला किनारी विभाग व्यवस्थापन आराखड्याचा मसुदा येत्या २ ते ३ दिवसांत संबंधित पंचायतींना पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल यांनी काल दिली. राज्य सरकारने किनारी विभाग व्यवस्थापन आराखड्याचा ५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करून किनारी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणाकडे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे, असेही मंत्री काब्राल यांनी सांगितले. केवळ ९ पंचायतींनी किनारी व्यवस्थापन आराखडे सादर केले आहेत. हे आराखडे ... Read More »

पंतप्रधानांच्या भेटीत पं. बंगालचे नाव बदलण्याची ममतांची मागणी

पं. बंगालचे नाव बांगला करण्याची मागणी तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काल केली. ममतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी ही मागणी केली. दरम्यान, यावेळी ममतांनी मोदींना नवरात्रीनंतर पश्चिम बंगाल भेटीचे आमंत्रण दिले आहे. त्याचप्रमाणे राज्याच्या विकासासाठी मोदींकडे ममतांनी १३,५०० कोटी रुपयांचा निधी देण्याचीही मागणी केली. भाजप आणि ममता यांच्यातील वाद शिगेला पोहोचला ... Read More »

देशातून २ ऑक्टोबरपासून प्लास्टिक हद्दपार करणार

>> केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू, राज्यांसाठी मार्गदर्शक सूचना आता २ ऑक्टोबरपासून देशातून प्लास्टिक हद्दपार होणार आहे. केंद्र सरकारने तसे प्रयत्न सुरू केले आहेत. प्लास्टिक बंदीसंबंधी राज्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. पर्यावरणाची हानी करणार्‍या प्लास्टिकचा वापर करू नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्याचा परिणाम बाजारात दिसू लागला आहे. ग्राहक आणि दुकानदारही काही प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी ... Read More »

अयोध्या प्रकरणी १८ ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पूर्ण व्हावी ः सरन्यायाधीश

अयोध्या प्रकरणी १८ ऑक्टोबरपर्यंत युक्तिवाद आणि सुनावणी पूर्ण व्हायला हवी, असं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सांगितले. या प्रकरणी मध्यस्थीच्या प्रयत्नांसाठी सुनावणी रोखता येणार नाही. सुनावणीसह मध्यस्थीचे प्रयत्न सुरू ठेवता येऊ शकतात, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. देशातील राजकीय आणि सामाजिक दृष्टीने संवेदनशील असलेल्या अयोध्या प्रकरणाचा निकाल नोव्हेंबरमध्ये लागू शकतो, असे मानले जात आहे. सरन्यायाधीश गोगोई १७ नोव्हेंबरला निवृत्त होणार ... Read More »

टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेवर मात

>> विराट कोहलीची विक्रमी नाबाद खेळी कर्णधार विराट कोहलीच्या विक्रमी खेळीच्या जोरावर भारताने दुसर्‍या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ७ गड्यांनी पराभव तीन लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. पहिली लढत पावसामुळे रद्द झाली होती. कर्णधार विराट कोहलीची सामनावीर पुरस्कारासाठी निवड झाली. दक्षिण आफ्रिका संघाकडून मिळालेले १५० धावांचे विजयी लक्ष्य भारताने ३ गड्यांच्या मोबदल्यात १९व्या षट्‌कांत गाठले. लक्ष्याचा पाठलाग करताना ... Read More »