ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: September 17, 2019

सहयोग हवा

‘काश्मीरमधील परिस्थिती पाहण्यासाठी आपण स्वतः तेथे जाऊ’ या सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या कालच्या विधानाचा सोईस्कर विपर्यास काही राष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी चालवल्याचे दिसते आहे. जणू काही केंद्र सरकारला सरन्यायाधिशांनी फटकार लगावली आहे अशा थाटात या वक्तव्याला संदर्भ सोडून प्रस्तुत केले जाते आहे. वास्तविक सरन्यायाधिशांचे हे विधान एका याचिकेवेळी याचिकाकर्त्याच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादाच्या संदर्भात आहे. काश्मीर खोर्‍यातील बालकांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले गेले असल्याचे ... Read More »

मोदी सरकारचे १०० दिवस ः भारताच्या आकांक्षांचे प्रतिबिंब!

हरसिम्रत कौर बादल केंद्रीय मंत्री ‘मोदी २.० सरकार’ चे पहिले १०० दिवस एक अशा आकांक्षी भारताचे प्रतिबिंब आहे, जे दूरदर्शी आणि निडर पंतप्रधानांच्या नेतृत्वात आपली पूर्ण क्षमता मिळवण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात एक ‘निर्णायक सरकार’ चा मार्ग प्रशस्त करुन ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ सुनिश्चित करीत आहेत. मी ङ्गार अभिमानाने सरकारच्या पहिल्या १०० दिवसांच्या कार्याविषयी लिहित ... Read More »

राय-मडगावात बस अपघात

>> दोन गंभीर जखमी काल सोमवारी दुपारी मडगावहून फोंडा येथे निघालेल्या खासगी प्रवासी बसला राय येथे अपघात झाला. चालकाच्या स्टेअरिंगवरील ताबा गेल्याने बस राय येथे रस्त्यालगत असलेल्या शेतात पालथी होऊन पडली. या अपघातात बसमधील १५ प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या. त्यातील महेश भजंती (२०) व शिवाजी मेलकेर (२१) ह्यांना जास्त मार बसला. ही घटना काल सोमवारी दुपारी २.१५ वाजता झाली. जीए०२ ... Read More »

जीसीएच्या अध्यक्षपदी पुन्हा सूरज लोटलीकर

>> उपाध्यक्षपदी शांबा नाईक बिनविरोध गोवा क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी सूरज लोटलीकर यांची फेरनिवड झाली आहे. तसेच उपाध्यक्षपदी शांबा मोलू नाईक देसाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या असोसिएशनच्या चार जागांसाठी रविवार २२ सप्टेंबरला सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत निवडणूक घेण्यात येणार आहे. या चार जागांसाठी चुरशीची लढत अपेक्षित आहे. गोवा क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीसाठी अध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष लोटलीकर यांच्यासमवेत ... Read More »

चांद्रयानच्या संपर्कासाठी इस्त्रोकडे अजून ५ दिवस

भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम ‘चांद्रयान-२’च्या विक्रम लँडरशी संपर्क साधण्यासाठी ‘इस्रो’च्या हाती अजून ५ दिवस उरले आहेत. दि. ७ सप्टेंबरला चंद्रावर उतरत असताना विक्रम लँडरचा संपर्क तुटला होता. यानंतर इस्रो आणि अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने विक्रमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र यात यश मिळू शकलेले नाही. विक्रममध्ये चंद्रावर केवळ एकच दिवस (पृथ्वीवरील १४ दिवस) काम करण्याची क्षमता आहे. चंद्रावर २० किंवा ... Read More »

शॅक मालकांनी स्थगितीबाबत न्यायालयात जावे ः काब्राल

राष्ट्रीय हरित लवादाने गोवा सरकारच्या शॅक धोरणावर जी स्थगिती आणली आहे त्यासाठी शॅक मालकांनीच सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची गरज आहे, असे पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल यांनी काल सांगितले. किनारपट्टी आराखडा तयार केला नाही तर समस्या निर्माण होऊ शकते याची सरकारला जाणीव होती. आणि म्हणूनच आराखडा तयार करण्यासाठी आपण जनसुनावणी घेत होतो. पण लोकांनी विरोध करून जनसुनावणी घेऊ दिली नाही. आता आराखडा ... Read More »

जम्मू – काश्मीरबाबत दोन आठवड्यात अहवाल देण्याचा न्यायालयाचा आदेश

सर्वोच्च न्यायालयाने येत्या दोन आठवड्यात जम्मू-काश्मीरबाबतच्या परिस्थितीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले आहेत. ३७० कलम रद्द झाल्यापासून निर्माण झालेल्या जम्मू-काश्मीरच्या परिस्थितीबाबत सादर करण्यात आलेल्या वेगवेगळ्या याचिकांवर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने हा आदेश दिला. तसेच नॅशनल कॉन्ङ्गरन्सचे नेते ङ्गारुख अब्दुल्ला यांच्या नजरकैदेबाबतही अहवाल सादर करण्याचे केंद्राला निर्देश दिले. तामिळनाडूतील नेते आणि एमडीएमकेचे संस्थापक वायको यांनी ङ्गारुख ... Read More »

खासदार फारुख अब्दुल्लांवर पीएसए अंतर्गत कारवाई

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार ङ्गारुख अब्दुल्ला यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर पब्लिक सेफ्टी ऍक्ट (पीएसए) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ङ्गारुख अब्दुल्ला यांना ज्या ठिकाणी ठेवण्यात आले त्या ठिकाणाला तात्पुरते तुरुंग घोषित करण्यात आले आहे. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर ङ्गारुख अब्दुल्ला यांना स्थानबद्ध केले आहे. ङ्गारुख अब्दुल्ला सध्या श्रीनगरचे खासदार आहेत. पहिल्यांदा पीएसए कायद्याचा ... Read More »

गोवा सेंद्रिय राज्य म्हणून घोषित करणार

>> गोवा डेअरीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन गोवा हे सेंद्रिय खतांचा वापर करणारे राज्य म्हणून लवकरच घोषित केले जाणार आहे. शेती आणि दूध व्यवसायाची सांगड घालून गोव्याला दुधाच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविण्यासाठी युवा वर्गाने पुढाकार घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा डेअरीच्या कार्यक्रमात बोलताना फोंडा येथे काल केली. यावेळी सहकार मंत्री गोविंद गावडे व इतर मान्यवरांची उपस्थिती ... Read More »

‘स्वाईन फ्ल्यू’चे राज्यात अडीच वर्षात १९ बळी

गेल्या अडीच वर्षांत वराह ज्वरामुळे (स्वाईन फ्ल्यू) राज्यात १९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य खात्यातील साथींच्या रोग्यांचे प्रमुख डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांनी काल दिली. २०१७ साली राज्यात वराह ज्वराने कहरच केला होता. त्यावर्षी वराह ज्वरामुळे तब्बल १२ जणांचा मृत्यू झाला होता. यासाठी राज्यात वराह ज्वराची लागण झालेल्या रुग्णांचा आकडाही विक्रमी म्हणजेच २६० एवढा होता. एवढ्या मोठ्या प्रमाणात राज्यात वराह ज्वराचा ... Read More »