ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: September 16, 2019

शॅक्सना तडाखा

किनारी विभाग व्यवस्थापन आराखडा आखण्यास राष्ट्रीय हरित लवादाने राज्य सरकारला दोन महिन्यांची निर्वाणीची मुदत दिली आहे. सदर आराखडा सुपूर्द करीपर्यंत गोव्याच्या किनार्‍यांवर पर्यटन हंगामात उभे राहणारे शॅक्स उभे करण्यास सक्त मनाईही लवादाने केलेली आहे. याचा परिणाम अर्थातच येणार्‍या पर्यटक हंगामात होईल हे उघड आहे. गोव्यात येणार्‍या देशी विदेशी पर्यटकांसाठी गोव्याच्या लोकप्रिय किनार्‍यांवर उभ्या केल्या जाणार्‍या या हंगामी शॅक्समधील अनियमितता संपुष्टात ... Read More »

आघाडीत महागळती, युतीत महाभरती

ल. त्र्यं. जोशी सध्या होणारी पक्षांतरे निवडणुकीपूर्वी होत असल्यामुळे कुणी पक्षांतरबंदी कायद्याचा विचार करीत नाही. आमदारकीचा वा खासदारकीचा सरळ राजीनामा देऊन लोक मोकळे होतात. त्यात त्यांचे आर्थिक नुकसानही होत नाही. पदाचे वेतन मिळत नसले तरी पेन्शन कुणी अडवू शकत नाही. त्यामुळे या पक्षांतरांना शुध्द राजकीय आणि आर्थिक आधार आहे. येणार्‍या जाणार्‍यांनी फक्त व्यवहाराचा विचार केला आहे. सिध्दांतांशी त्यांचा कवडीचाही संबंध ... Read More »

जानेवारी ते ऑगस्टपर्यंत राज्यात डेंग्यूचे २०३ रुग्ण

>> ऑगस्ट महिन्यातच आढळले ६२ रुग्ण राज्यात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढतच चाललेली असून गेल्या ऑगस्ट महिन्यातच राज्यात डेंग्यूची लागण झालेले ६२ रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य खात्यातील सूत्रांनी काल दिली. चालू वर्षी १ जानेवारी ते ३१ जुलै ह्या दरम्यान राज्यात डेंग्यूची लागण झालेले १४१ रुग्ण सापडल्याची माहितीही सूत्रानी दिली. तर १ जानेवारी ते ३० ऑगस्ट हा काळ धरल्यास राज्यात डेंग्यूची लागण ... Read More »

चिरेखाणीत बुडालेल्या चारही विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले

तुये-पेडणे येथील डॉन बॉस्को विद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये राहणारे चार विद्यार्थी शनिवारी चिरेखणीत बुडाले होते. त्या चारही विद्यार्थ्यांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात अग्निशामक दलाला यश आले. रात्री उशीरा मिळालेला विद्यार्थ्याचा मृतदेह हा वारखंड-पेडणे येथील प्रिन्स झा (११) याचा असून हा मुलगा सहावीत शिकत होता. सध्या तो वारखंड येथे राहत होता. मात्र गेली दोन वर्षे तो तुये डॉन बॉस्कोच्या हॉस्टेलमध्ये राहत होता अशी ... Read More »

पडिक चिरेखाणी शोधण्याची मुख्यमंत्र्याची सूचना

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सरकारी अधिकार्‍यांना राज्यभरातील पडिक चिरे खाणी व इतर धोकादायक ठिकाणे हुडकून काढून तेथे दुर्घटना घडू नये म्हणून वेळीच उपाययोजना करण्याची सूचना काल केली आहे. तुये पेडणे येथे एका चिर्‍याच्या खाणीत डॉन बॉस्को विद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांच्या मृत्यूची घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सरकारी अधिकार्‍यांना वरील सूचना केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तुये पेडणे ... Read More »

गोदावरी नदीत बोट उलटून १२ बुडाले

आंध्र प्रदेश येथे गोदावरी नदीत बोट उलटून झालेल्या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला. मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला होता. त्यामुळे ही दुर्घटना घडली. त्या बोटीत एकूण ६० जण होते. बोट बुडाल्याची माहिती मिळताच एनडीआरएङ्ग पथकाने तातडीने बचावकार्य सुरू केले असून, २३ जणांना वाचवण्यात यश आले आहे. तसेच अनेकजण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. कच्चुलुरू येथे ही बोट बुडाल्याची माहिती ... Read More »

थकबाकी वसुलीसाठी वीजखाते खटले दाखल करणार ः काब्राल

वीज खात्याकडून आता कोट्यवधी रुपयांच्या थकबाकी वसुलीवर भर दिला जाणार आहे. वीज बिलाच्या थकबाकीदारांवर जमीन महसूल कायद्याखालील आरआरसीअंतर्गत थकबाकी वसुलीसाठी खटले दाखल केले जाणार आहेत. खटले हाताळण्यासाठी खास वकिलाची नियुक्ती केली जाणार आहे, अशी माहिती वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी काल दिली. वीज खात्याची सरकारी, खासगी वीज बिलांची मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. थकबाकी वसुली होत नसल्याने आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत ... Read More »

रस्त्यासाठी लागणारे डांबर विदेशातून आणण्याचा प्रस्ताव ः पाऊसकर

राज्यातील रस्त्याच्या बांधकामासाठी आवश्यक डांबर विदेशातून आयात करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. डांबर आयातीचा प्रस्ताव मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच राज्य मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आला आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांनी काल दिली. राज्यातील रस्त्यासाठी दरवर्षी साधारण ५० हजार मेट्रिक टन डांबराची आवश्यकता आहे. इराण किंवा इराक या देशातून डांबराची आयात शक्य आहे. एका ठेकेदाराने विदेशातून ... Read More »

राज्यात यंदा ३३ टक्के जास्त पावसाची नोंद

राज्यात मोसमी पाऊस इंचाचे दीड शतक गाठण्याच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला असून राज्यात आत्तापर्यंत १४८.७० इंच पावसाची नोंद झाली आहे. सत्तरी, सांगे, पेडणे, साखळी, ओल्ड गोवा, फोंडा या तालुक्यात पावसाने इंचाचे दीड शतक यापूर्वीच पूर्ण केले आहे. राज्यात यावर्षी मोसमी पावसाचे दोन आठवडे उशिराने आगमन झाले होते. त्यामुळे यावर्षी यंदाही तुटीचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. तथापि, यावर्षी पावसाने ... Read More »

सौरभ वर्मा चॅम्पियन

भारताच्या सौरभ वर्मा याने काल रविवारी आपले सलग दुसरे बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर सुपर १०० विजेतेपद पटकावताना व्हिएतनाम ओपनच्या अंतिम फेरीत चीनच्या सून फेई शियांग याचा पराभव केला. द्वितीय मानांकित सौरभने शियांगला २१-१२, १७-२१, २१-१४ असे पराजित करत यंदाच्या मोसमातील आपले तिसरे अजिंक्यपद पटकावले. हा सामना ७२ मिनिटे चालला. याच मोसमात सौरभने हैदराबाद ओपन व स्लोवेनिया आंतरराष्ट्रीय सीरिज या स्पर्धा आपल्या ... Read More »