ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: September 14, 2019

सत्त्वपरीक्षा

राहुल गांधींच्या पक्षाध्यक्षपदाच्या राजीनाम्यातून पक्षामध्ये निर्माण झालेली अनिश्‍चितता दूर सारून कॉंग्रेस पक्षाला पुन्हा उभारी देण्याची जोरदार धडपड अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सध्या चालवलेली दिसते. महाराष्ट्रासह तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असल्याने कॉंग्रेसजनांना मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढची पुनरावृत्ती घडविण्याचा हुरूप आणण्यासाठी त्या धडपडत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत पक्ष धराशायी झालेला असला तरी त्या आधीच्या विधानसभा निवडणुकांमध्ये जे यश मिळाले ... Read More »

अपाची हेलिकॉप्टर ठरतील गेमचेंजर!

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) अलीकडेच भारतीय वायुसेनेत आठ अपाची हेलिकॉप्टरे दाखल झाली. सामरिक परिभाषेत ह्या हेलिकॉप्टरला शत्रूच्या तडाखेबंद मार्‍याला झेलत त्याच्यावर फार मोठा आघात करणारी फ्लाईंग मशीन म्हणतात. अपाची हे भारताचे पहिल प्युअर अटॅक हेलिकॉप्टर आहे. दहशतवाद्यांनी आपले बस्तान मांडले असेल तेथे अपाची अटॅक हेलिकॉप्टर्सचा प्रभावी वापर केला जाऊ शकतो. चिनुक आणि अपाची ही दोन्ही हेलिकॉप्टर्स भारतासाठी गेम चेंजरचे काम ... Read More »

शॅक धोरणाला राष्ट्रीय हरित लवादाची स्थगिती

गोवा सरकारने किनारी आराखडा तयार केला नसल्याने काल राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) गोवा सरकारच्या शॅक धोरणावर स्थगित आणली आहे. त्यामुळे राज्याच्या पर्यटन मोसमावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत शॅक धोरणावर आणलेली स्थगिती मागे घेण्याची विनंती राष्ट्रीय हरित लवादाला करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान राष्ट्रीय लवादाने किनारी ... Read More »

करिअर मार्गदर्शन शिक्षणावर पुढील वर्षापासून भर ः मुख्यमंत्री

राज्यात आगामी शैक्षणिक वर्षापासून शिक्षण क्षेत्रात सुधारणा घडवून आणली जाणार आहे. केंद्राच्या नवीन शैक्षणिक धोरणाबरोबरच करिअर मार्गदर्शन शिक्षणावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी आणखी वाढणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे काल केले. शिक्षण खात्याने आयोजित केलेल्या शिक्षक दिन कार्यक्रमात सावंत बोलत होते. यावेळी शिक्षण सचिव नीला मोहनन, शिक्षण संचालिका वंदना राव उपस्थित होते. शिक्षकांनी ... Read More »

रिलायन्सला थकबाकी ः सरकार उच्च न्यायालयात अर्ज करणार

राज्य सरकार रिलायन्स वीज बिल थकबाकी प्रश्‍नी उच्च न्यायालयात अर्ज सादर करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. न्यायाधिकरण लवादाने सरकारला रिलायन्स वीज खरेदी प्रश्‍नी रिलायन्स कंपनीला वीज बिलापोटी २९३ कोटी रुपये देण्याचा आदेश दिलेला आहे. राज्य सरकारने लवाद अधिकारिणीकडे या प्रकरणी सादर केलेला आव्हान अर्ज गुरूवारी फेटाळण्यात आला. त्यामुळे राज्य सरकारला रिलायन्स कंपनीला ... Read More »

पणजी महापालिका आयुक्तपदी संजीत रॉड्रिग्स यांची नियुक्ती

पणजी महानगरपालिकेचे आयुक्त शशांक त्रिपाठी (आयएएस) यांची बदली करण्यात आली असून त्यांची क्रीडा व युवा व्यवहार खात्याच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा अतिरिक्त ताबा संजीत रॉड्रीगीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. यासंबंधी सरकारी पातळीवर आदेश काल जारी करण्यात आला आहे. व्ही. एम. प्रभुदेसाई यांची गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महिला व बाल कल्याण खात्याचे ... Read More »

सुरक्षा वाढ, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची हॉटेल, रिसॉर्टना सक्ती

>> पर्यटन मोसमासाठी व्यावसायिकांना मार्गदर्शक तत्त्वे पोलीस यंत्रणेने आगामी पर्यटन मोसमाच्या पार्श्‍वभूमीवर उत्तर गोव्यातील हॉटेल, गेस्ट हाउस, रिसॉर्ट व्यावसायिकांना सुरक्षेसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यात सुरक्षा व्यवस्था वाढविणे आणि सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याची सक्ती करण्यात आली आहे. उत्तर गोव्यातील हॉटेल व्यावसायिकांची बैठक काल घेण्यात आली. या बैठकीत उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक उत्कृष्ट प्रसून यांनी हॉटेल व्यावसायिकांना सुरक्षा व्यवस्थेबाबत सविस्तर मार्गदर्शन ... Read More »

चिन्मयानंद स्वामींची ८ तास चौकशी

>> कायदा विद्यार्थीनीवरील बलात्कार प्रकरण कायदा शाखेच्या एका विद्यार्थिनीवर बलात्काराचा आरोप असलेले भाजप नेते तथा माजी केंद्रीय मंत्री स्वामी चिन्मयानंद यांची एसआयटीच्या पथकाने शहाजहांपूर पोलिस स्थानकावर काल रात्रीपासून सुमारे आठ तास कसून चौकशी केली. नंतर पहाटे चिन्मयानंद यांना कडेकोट बंदोबस्तात तक्रारदार विद्यार्थिनीसह शहाजहांपूर येथील त्यांच्या आश्रमात आणून चौकशी केली व तेथील त्यांच्या बेडरूमला सील ठोकण्यात आले. चिन्मयानंद यांच्या आश्रमाजवळच तक्रारदार ... Read More »

बांगलादेशची झिंबाब्वेवर मात

>> नवोदित अफिफ हुसेनची आक्रमक फलंदाजी मोसद्देक हुसेनची अष्टपैलू कामगिरी व अफिफ हुसेनच्या फटकेबाजीच्या जोरावर बांगलादेशने काल तिरंगी टी-ट्वेंटी मालिकेत विजयी सलामी देताना झिंबाब्वेचा ३ गडी व २ चेंडू राखून पराभव केला. पावसामुळे १८ षटकांच्या खेळविण्यात आलेल्या या सामन्यात झिंबाब्वेने ५ बाद १४४ धावा केल्या. बांगलादेशने विजयी लक्ष्य १७.४ षटकांत गाठले. ६० धावांत ६ गडी बाद झाल्यानंतर मोसद्देक व अफिफ ... Read More »

इंग्लंडला मौल्यवान आघाडी

स्टीव स्मिथ (८०) व मार्नस लाबुशेन (४८) यांच्या उपयुक्त योगदानानंतरही इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या ऍशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव केवळ २२५ धावांत आटोपला. त्यामुळे पहिल्या डावात २९४ धावांपर्यंत मजल मारलेल्या यजमान इंग्लंडला ६९ धावांची मौल्यवान आघाडी मिळाली. दुसर्‍या दिवसअखेर इंग्लंडने आपल्या दुसर्‍या डावात बिनबाद ९ धावा करत एकूण आघाडी ७८ धावांची केली आहे. पहिल्या दिवसाच्या ८ बाद २७१ धावांवरून पुढे खेळताना जोस ... Read More »