Daily Archives: September 13, 2019

भ्रष्टाचाराला वाव

नव्या मोटर वाहन कायद्यातील जबर शुल्कवाढीमुळे देशभरात सध्या हलकल्लोळ माजला आहे. भाजपची राजवट असलेल्या राज्यांसह अनेक राज्यांनी या शुल्कात कपात करण्याचे ठरवले आहे, तर काही राज्यांनी या कायद्याची अंमलबजावणी करायलाच नकार दिलेला आहे. गोवा सरकार तर अद्याप द्विधा मनःस्थितीत दिसते आहे. नव्या कायद्याची अंमलबजावणी करावी तर जनतेचा तीव्र रोष ओढवून घ्यायचा आणि न करावी तर वाढत्या अपघातांप्रती जबाबदारीची जाणीव नाही ... Read More »

व्हिक्टोरिया फर्नांडिस ‘मामी’ ते ‘रणरागिणी’

शंभू भाऊ बांदेकर आपण शांततावादी समाजकार्यकर्त्या असलो, तरी प्रसंग येताच आपण रुद्रावतार धारण करून रणरागिणी बनू शकतो हे त्यांनी आंदोलकांना, पत्रकारांना आणि समाजकार्यकर्त्यांना दाखवून दिले. मग पुढे त्यांचा उल्लेख ‘रणरागिणी मामी’ असा होऊ लागला. ‘मामी’ बनून त्यांनी गोरगरीबांना न्याय मिळवून दिला. सांताक्रुझ मतदारसंघातून चार वेळा विधानसभेवर निवडून येऊन विक्रम करणार्‍या व्हिक्टोरिया फर्नांडिस या फक्त त्या मतदारसंघाच्याच नव्हे, तर संपूर्ण गोव्याच्या ... Read More »

गोव्यात वैद्यकीय पर्यटनासाठी कायद्यात दुरुस्ती करणार ः मुख्यमंत्री

राज्यात वैद्यकीय पर्यटनाला चालना देण्यासाठी कायद्यात लवकरच आवश्यक दुरुस्ती केली जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या स्वदेश दर्शन योजनेच्या पणजीत आयोजित कार्यक्रमात बोलताना काल केली. स्वदेश दर्शन योजनेअर्तंगत उत्तर गोव्यातील हणजूण, कांदोळी येथील समुद्र किनार्‍यावर उभारलेल्या पार्किंग व इतर साधन सुविधा, मोरजी खिंड प्रकल्पाचे उद्घाटन आणि आग्वाद कारागृहाच्या विकासाच्या पायाभरणी समारंभात मुख्यमंत्री डॉ. ... Read More »

म्हादईवर येडीयुरप्पांशी चर्चेचा कोणताही प्रस्ताव नाही

>> मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची स्पष्टोक्ती म्हादईच्या पाणी वाटप प्रश्‍नावर न्यायालयाबाहेर तोडग्याचा कोणताही प्रस्ताव नाही. तसेच म्हादई पाणी वाटप प्रश्‍नी कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पुन्हा एकदा स्पष्ट केले. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या गोवा दौर्‍याबाबत आपण अनभिज्ञ आहोत. त्यांच्या दौर्‍याबाबत आपणाला कुणीही माहिती दिलेली नाही. तसेच त्यांच्याशी म्हादई प्रश्‍नी चर्चेचा कोणताही प्रस्ताव ... Read More »

पीओकेबाबत सरकारने निर्णय घ्यावा; सैन्य सज्ज आहे ः रावत

पाकव्याप्त काश्मीरबाबत (पीओके) सरकारने निर्णय घ्यावा, आपले सैन्य प्रत्येक गोष्टीला तोंड देण्यासाठी सज्ज आहे अशी प्रतिक्रिया देशाचे लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी व्यक्त केली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी अलीकडेच ३७० कलम झाल्यानंतर आता सरकारचा पुढील कार्यक्रम हा पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे आणि त्याला भारताचा भाग बनविणे हा असल्याचे म्हटले होते. त्या अनुषंगाने रावत यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त ... Read More »

ढासळत्या अर्थव्यवस्थेचे सरकारला नाही अजिबात भान : मनमोहन सिंग

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाची अर्थव्यवस्था सातत्याने ढासळत असल्याचा दावा करीत मोदी सरकारवर पुन्हा शरसंधान केले आहे. देशाच्या अर्थ व्यवस्थेची स्थिती दिवसेंदिवस खालावत आहे. मात्र खेदाची गोष्ट म्हणजे सरकारला त्याविषयी जाणीव किंवा फिकिर वाटत नाही. सध्या आपण आर्थिक मंदिचा सामना करीत आहोत व या स्थितीकडे गांभीर्याने लक्ष द्या असा सल्ला डॉ. सिंग यांनी मोदी सरकारला दिला आहे. डॉ. ... Read More »

रस्त्यांवरील खड्‌ड्यांची छायाचित्रे वॉटस् ऍपवर पाठवावी ः पाऊसकर

>> राज्यातील खड्डे ८ दिवसांत बुजविणार राज्यातील रस्त्यांवरील खड्डे आठ दिवसांत बुजविण्यात येणार आहेत. नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग वगळून इतर रस्त्यांवरील खड्‌ड्याची छायाचित्रे वॉट्सऍप क्रमांक ७७९६६६७३७३ या क्रमांकावर पाठविण्याचे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल केले. रस्त्यांवरील खड्डे सिमेंट कॉंक्रीटच्या साहाय्याने बुजविण्यात येणार आहेत. राज्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्यास रस्त्यावरील खड्‌ड्यांची दुरुस्ती तातडीने होऊ शकते. रस्त्यांच्या कायम ... Read More »

शुभमनला संधी; राहुलला डच्चू

>> दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २ ऑक्टोबरपासून सुरु होणार्‍या कसोटी मालिकेसाठी रोहित शर्मा याची सलामीवीर म्हणून निवड करण्यात आली आहे. विंडीज दौर्‍यात अपयशी ठरलेल्या लोकेश राहुल याची जागा तो घेणार आहे. ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी एम. एस. के. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने काल गुरुवारी टीम इंडियाची घोषणा केली. टी-ट्वेंटीसाठी दुर्लक्ष करण्यात आल्यानंतर शुभमन गिल ... Read More »

प्रज्ञेश, सुमीत पुढील फेरीत दाखल

एटीपी चॅलेंजर टूर स्पर्धांमध्ये भारताच्या पुरुष एकेरीतील खेळाडूंसाठी काल गुरुवारचा दिवस संमिश्र ठरला. प्रज्ञेश गुणेश्‍वरन व सुमीत नागल यांनी विजय संपादन केले तर रामकुमार रामनाथन याला बाहेरचा रस्ता धरावा लागला. युएस ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेतील पदार्पणानंतर सलग दुसर्‍या चॅलेंजर दर्जाच्या स्पर्धेत खेळणार्‍या सहाव्या मानांकित सुमीत नागल याने बोस्निया येथील बेंजा लुका येथे सुरू असलेल्या स्पर्धेच्या तिसर्‍या फेरीत प्रवेश करताना मातिजा पेकोटिक ... Read More »