Daily Archives: September 12, 2019

मागे हटू नका!

राज्यातील सरकारी नोकरभरतीसंदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘क’ वर्गातील सर्व नोकरभरती राज्य कर्मचारी भरती आयोगामार्फतच होईल व नोकरभरतीसाठी दिलेल्या जाहिराती मागे घ्या, अशी सुस्पष्ट सूचना सर्व सरकारी खात्यांना पाठविल्यापासून काही मंत्र्यांच्या पायांखालची वाळू सरकलेली दिसते आहे. विशेषतः आपल्या खात्यातील नोकरभरती ही केवळ आपल्याच मतदारसंघातील बेरोजगारांना सामावून घेऊन स्वतःची मतपेढी भक्कम करण्यासाठी असते असा समज करून घेतलेल्या मंत्र्यांचे पिढीजात मोकासे ... Read More »

भरमसाठ दंडामुळे नव्या वाहतूक कायद्याला विरोध

>> गुजरात सरकारकडून दंड रकमेत कपात; महाराष्ट्रात अंमलबजावणी तूर्त स्थगित वाहतुकीचे नियम मोडणार्‍या वाहन चालकांना भरमसाठ दंडाची तरतूद केंद्र सरकारने नुकत्याच तयार केलेल्या नव्या वाहतूक नियम कायद्यात केल्याने या कायद्याला विविध राज्यांमधून लोकांचा जोरदार विरोध होत असल्याचे दिसून आले आहे. अशाच दबावातून गुजरात सरकारने या नव्या कायद्यातील दंडाच्या रक्कमेत आपले सरकार कपात करत असल्याचे जाहीर केले आहे. तर महाराष्ट्रांच्या वाहतूक ... Read More »

काही बाबतीत नियमभंग दंड रक्कम कमी करणे शक्य

>> वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो नव्या मोटार वाहन कायद्यात दंडाच्या रक्कमेत मोठी वाढ करण्यात आलेली आहे ही बाब खरी असून काही वाहतूक नियम भंगाच्या बाबतीत दंडाची रक्कम कमी करण्याबाबत विचार करणे शक्य आहे, असे काल वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी स्पष्ट केले. मात्र, त्याचबरोबर दारु पिऊन वाहन चालवणे व वाहन चालवण्याचा परवाना नसताना वाहन चालवणे हे गंभीर स्वरुपाचे गुन्हे असून ... Read More »

दहशतवादाची पाळेमुळे पाकिस्तानात ः पंतप्रधान

दहशतवादाची पाळेमुळे पाकिस्तानात आहेत असा टोला हाणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर हल्लाबोल केला. अमेरिकेतील ९/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या स्मृतीसंदर्भात मोदी भाष्य करीत होते. दहशतवाद एक विचारधारा बनली असून कोणत्याही एका देशापुरता तो सिमित नाही. या समस्येपासून संपूर्ण जगाला धोका आहे. आपल्या शेजारच्या देशात दहशतवाद फोफावतो आहे, असे मोदी म्हणाले. भूतकाळात भारताने दहशतवादाविरुद्ध भूमिका घेतली आणि भविष्यातही ती भूमिका कायम ... Read More »

कला व संस्कृती खात्यातर्फे आयोजित गणेशचतुर्थीनिमित्तच्या माटोळी सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक पटाकावलेली माटोळी. गावठण-प्रियोळ येथील दत्ता शंभू यांनी ही माटोळी सजवली आहे. प्रथम क्रमांक पटकावल्याने त्यांना १५ हजार रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. दुसरे बक्षीस श्रीकांत सतरकर कोपरवाडा कुर्टी यांना प्राप्त झाले. Read More »

शिवकुमारांच्या अटकेच्या निषेधार्थ बंगळुरुत प्रचंड मोर्चा

ज्येष्ठ कॉंग्रेस नेते तथा माजी मंत्री डी. शिवकुमार यांना अटक केल्याच्या निषेधार्थ काल शहरात शिवकुमार यांच्या वोक्कलिगा समाजाच्या हजारो लोकांनी मोर्चा काढून निदर्शने केली. यामुळे आता शिवकुमार यांच्यावरील कारवाईला जातीय रंग आला आहे. कर्नाटकाच्या विविध भागांतून आलेल्या वोक्कलिगा समाजातील लोकांनी या मोर्चात सहभाग घेऊन शिवकुमार यांना पाठिंबा दर्शविला. या समाजाच्या विविध संघटनांनी त्यासाठी हाक दिली होती. म्हैसूर येथून मोठ्या संख्येने ... Read More »

‘क’ वर्ग सरकारी नोकर भरतीविषयी इच्छुकांत संभ्रम

सरकारने राज्यातील ‘क’ वर्गीय सरकारी नोकर भरतीची प्रक्रिया तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला असतानाच काल त्या पदांसाठीचे अर्ज ऑनलाईन उपलब्ध करुन दिल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झालेले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सर्व सरकारी खात्यांतील पदांची भरती यापुढे राज्य कर्मचारी निवड आयोगामार्फतच होणार असल्याचे स्पष्ट करीत तूर्त नोकर भरतीची प्रक्रिया स्थगित केली होती. ‘क’ वर्गीय नोकर भरतीच्या जाहिराती देणे सर्व खात्यांनी ... Read More »

इंग्लंड-ऑस्ट्रेलिया पाचवी कसोटी आजपासून

इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्यातील ‘ऍशेस’ मालिकेतील पाचवा व शेवटचा कसोटी सामना आजपासून ‘दी ओव्हल’वर खेळविला जाणार आहे. इंग्लंडने या सामन्यासाठी आपल्या संघात दोन बदल केले असून क्रेग ओव्हर्टन व जेसन रॉय यांच्या जागी सॅम करन व ख्रिस वोक्स या अष्टपैलूंचा समावेश करण्यात आला आहे. दुसरीकडे कांगारूंनी आपल्या १२ सदस्यीय संघातून ट्रेव्हिस हेड याला बाहेरचा रस्ता दाखवून अष्टपैलू मिचेल मार्शला संधी ... Read More »

‘टॉप्स’ योजनेत मेरी कोमचा समावेश

सहावेळची बॉक्सिंग विश्‍वविजेती मेरी कोम, उदयोन्मुख नेमबाज यशस्विनी सिंग देसवाल व बॅडमिंटनपटू साई प्रणिथ याच्यासह एकूण १२ खेळाडूंचा टार्गेट ऑलिंपिक पोडियम स्कीम (टॉप) योजनेत समावेश करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मेरीकोम व्यतिरिक्त अमित उंगल (५२ किलो पुरुष), सोनिया चहल (५७ किलो महिला), निखत झरीन (५१ किलो महिला), कविंदर सिंग बिश्त (५७ किलो पुरुष), लवलिना बोर्गोहैन (६९ किलो महिला), विकास ... Read More »