Daily Archives: September 11, 2019

खाणी सुरू होणार?

गोवा भेटीवर आलेले केंद्रीय खाणमंत्री प्रल्हाद जोशी यांनी गोव्याचा खाण प्रश्न सोडवण्याची ग्वाही दिली खरी, परंतु तो प्रश्न अन्य राज्यांच्या खाण प्रश्नांशी जोडून केंद्र सरकार काय करू इच्छिते याचेच जणू संकेत दिले. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय मंत्रिगट हा प्रश्न सोडवील असे जरी ते म्हणाले असले, तरी राष्ट्रीय पातळीवरील खाण प्रश्नाची सोडवणूक करताना गोव्यापुरता वेगळा विचार होण्याची शक्यता कमी आहे. म्हणजे खाणींच्या ... Read More »

वाढत्या अग्नितांडवांचा इशारा

ऍड. प्रदीप उमप महाराष्ट्रात शिरपूर येथील रासायनिक प्रकल्पात व उरण येथील ओएनजीसीच्या प्रकल्पात भीषण अग्नितांडव घडले. दोन्ही घटनांमध्ये जीवित आणि वित्तहानी झाली. आगीच्या घटना देशभरात प्रचंड वेगाने वाढत असूनसुद्धा नियम आणि कायद्यांचे पालन करण्याचा शहाणपणा आलेला नाही. म्हणूनच प्रत्येक अग्नितांडवानंतर चौकशी, कारवाई, नुकसान भरपाई आणि चर्चा यापलीकडे काहीही होताना दिसत नाही. महाराष्ट्रातील शिरपूर येथे रासायनिक प्रकल्पात लागलेली भयंकर आग आणि ... Read More »

संयुक्त राष्ट्रांत भारताकडून पाकचे वाभाडे

>> पाक विदेश मंत्र्यांच्या आरोपांना सणसणीत उत्तर ः काश्मीरबाबत अन्य कोणाचा हस्तक्षेप नको पाकिस्तानचे विदेश मंत्री शाह महंमद कुरेशी यांनी काल येथील संयुक्त राष्ट्रांसमोर भारतावर केलेले आरोप म्हणजे जागतिक दहशतवादाचे केंद्र असलेल्या देशाकडून भारताविरोधात रचलेले कुभांड व बनावट कथानक आहे अशा शब्दात भारताने पाकची संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाच्या अधिवेशनासमोर खिल्ली उडवली. काश्मीरचा मुद्दा ही भारताची अंतर्गत बाब असून त्यात अन्य ... Read More »

गोवा-कर्नाटक मुख्यमंत्र्यांची म्हादईप्रश्‍नी लवकरच बैठक

म्हादई जलतंटा लवादाने आपला निवाडा यापूर्वीच दिलेला असताना आता कर्नाटकने गोव्याबरोबर न्यायालयाबाहेर तडजोड करण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून या पार्श्‍वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येड्डियुरप्पा व गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यात पुढील आठवड्यात या प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी एक बैठक होणार आहे. दोन दिवसांपूर्वी गोव्यात आलेले केंद्रीय खाणमंत्री प्रल्हाद जोशी यांनीही म्हादई तंटा प्रकरणी गोवा व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन चर्चा ... Read More »

पर्रीकरांच्या मिरामारवरील समाधी उभारणीची कोनशीला डिसेंबरमध्ये

>> १० कोटी रु. ची अर्थसंकल्पात तरतूद गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे आगळे-वेगळे असे समाधी स्थळ मिरामार येथे ज्या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले तेथे आकार घेणार असून त्याची कोनशीला पर्रीकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून येत्या १३ डिसेंबर रोजी बसवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली. सुमारे १० कोटी रु. खर्चून हे समाधी ... Read More »

उघड्यावर कचरा फेकणार्‍यांवर कारवाईच्या पुस्तिका उपलब्ध

कचरा व्यवस्थापन मंडळाने उघड्यावर कचरा फेकणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी राज्यातील सर्व पंचायतींना दंड (चलन) आकारणी पुस्तिका उपलब्ध केल्या आहेत. साळगाव कचरा प्रकल्प भागातील २३ पंचायत क्षेत्रात कचरा उघड्यावर टाकणार्‍यांवर कडक दंडात्मक कारवाई करण्याची सूचना करण्यात येणार आहे. कचरा विल्हेवाटीमध्ये शिस्त आणण्यासाठी दंडात्मक कारवाईची सूचना केली जात आहे, अशी माहिती कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. पंचायत ... Read More »

वीज खात्याच्या सामान खरेदीत गैरव्यवहाराचा आरोप

वीज खात्याच्या विद्युत सामान खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप रायझिंग गोवाचे अध्यक्ष शैलेंद्र वेलिंगकर यांनी पत्रकार परिषदेत काल केला. या विद्युत सामान खरेदी प्रकरणी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तीच्या मार्फत चौकशी करावी, अशी मागणी रायझिंग गोवाचे अध्यक्ष वेलिंगकर यांनी केली. हलक्या दर्जाचे विद्युत सामान असल्याने वरच्यावर निकामी होऊन वीज पुरवठ्यावर विपरीत परिमाण होत आहे. या वीज सामान खरेदी गैरव्यवहार प्रकरणी मुख्यमंत्री डॉ. ... Read More »

स्मिथ, कमिन्सचे प्रथमस्थान भक्कम

>> आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून कसोटी क्रमवारी जाहीर; विराट कोहली द्वितीय ऍशेस कसोटी मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात २११ व ८२ धावांची दमदार खेळी केलेल्या ऑस्ट्रेलियाच्या स्टीव स्मिथ याने आयसीसी कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीतील आपले पहिले स्थान अधिक भक्कम केले आहे. ९३७ रेटिंग गुणांसह स्मिथने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीवर ३४ गुणांची मोठी आघाडी मिळविली आहे. कांगारूंचा प्रमुख वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स ... Read More »

मिराझ, रुबेलला वगळले

अफगाणिस्तान व झिंबाब्वे यांचा समावेश असलेल्या टी-ट्वेंटी तिरंगी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी बांगलादेशने ऑफस्पिनर मेहदी हसन मिराझ व वेगवान गोलंदाज रुबेल हुसेन यांना वगळले आहे. अष्टपैलू आरिफूल हक, मध्यमगती गोलंदाज अबू हैदर, फिरकीपटू नझमूल इस्लाम व फलंदाज मोहम्मद मिथुन यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध मागील वर्षी खेळलेल्या संघाचा हे खेळाडू भाग होते. युवा जलदगती गोलंदाज यासिन अराफात ... Read More »

गोव्याच्या चारजणी उपांत्यपूर्व फेरीत

>> कनिष्ठ राष्ट्रीय मुलींची मुष्टियुद्ध स्पर्धा रोहतक, हरयाणा येथील नॅशनल बॉक्सिंग अकादमीत सुरू असलेल्या ३र्‍या बीएफआय कनिष्ठ मुलींच्या राष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत गोव्याच्या चार मुष्टियोद्ध्यांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली आहे. आज ११ रोजी या चौघीही उपांत्य फेरीतील आपले पदक निश्‍चित करण्यासाठी खेळतील. ६३ किलो वजनी गटात आंतरराष्ट्रीय पदकप्राप्त अश्रेया नाईक हिची लढत झारखंडच्या स्नेहा गुप्ता हिच्याशी होणार आहे. अश्रेयाने महाराष्ट्राच्या मुष्टियोद्धीला ... Read More »