Daily Archives: September 10, 2019

नदाल चॅम्पियन

चार तास ५० मिनिटे रंगलेल्या सामन्यात रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा ७-५, ६-३, ५-७, ४-६, ६-४ असा पराभव करत स्पेनच्या राफेल नदालने युएस ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या पुरूष एकेरीचे विजेतेपद पटकावले. नदालचे हे १९ वे ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. नदालने २७व्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. यापूर्वी नदालने २०१०, २०१३ आणि २०१७ मध्ये युएस ओपन स्पर्धा जिंकली आहे तर पहिल्याच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या ... Read More »

‘त्रिफळा’ः बहुगुणी औषध

 डॉ. मनाली म. पवार गणेशपुरी-म्हापसा त्रिफळा म्हणजे हरीतकी, विभितकी व आमलकी बहुगुणी तर आहेच पण एकेरी द्रव्येसुद्धा तितकीच बहुगुणी व विविध रोगांमध्ये वापरता येतात. आवळा रसायन द्रव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. म्हणूनच च्यवनप्राश अवलेहामध्ये याचा प्रचूर मात्रेत उपयोग केला जातो. नित्य आवळा सेवन केल्याने म्हातारपणाचा प्रभाव मनुष्यावर पडत नाही. मनुष्य निरोगी आरोग्यसंपन्न राहतो. ‘त्रिफळा’ हे एका फळाचे नाव नसून त्रिफळा म्हणजे हरीतकी, ... Read More »

डायस्टोनिक सेरेब्रल पाल्सीसाठी यशस्वी उपचार

 डॉ. प्रदीप महाजन बाळ जन्माला आले तेव्हा रडले नाही किंवा त्याने हालचालही केली नाही बाळाला दोन महिन्यांने असताना आकडी येऊ लागली, त्याचे स्नायू ताठ व्हायचे आणि ते शांत झोपूही शकत नव्हते… युगांडात जन्मलेल्या आरोनच्या आईला दीर्घकाळ व कठीण प्रसूतीकळांमधून (१० तासांहून अधिक काळ) जावे लागले. बाळंतपणानंतर आरोन रडला नाही किंवा त्याने काही हालचालही केली नाही. त्याला नवजात अर्भकांसाठीच्या अतिदक्षता विभागात ... Read More »

केस गळणे

 डॉ. अनुपमा कुडचडकर ज्यांची झोप पूर्ण होत नाही त्यांनाही केस गळतीचा त्रास होऊ शकतो. पॉलिसिस्टिक ओव्हेरीयन सिंड्रोम (पीसीओएस), थायरॉइडचा आजार, मधुमेह यांसारख्या आजारांमुळेही केस गळतात. ज्यांना आपले केस चांगले राहावेत असे वाटत असेल त्यांनी आपल्या केसांची चांगली निगा राखली पाहिजे. झाडावरची पिकलेली पानं जशी गळून पडतात व नवीन पानं उगवतात त्याचप्रमाणे आपले केस गळून पडून नवीन केस त्याजागी येत असतात. ... Read More »