Daily Archives: September 10, 2019

बंडखोर

ज्याला खर्‍या अर्थाने ‘कायदेपंडित’ म्हणावे असे भारतातील एक सर्वोत्कृष्ट विधिज्ञ राम जेठमलानी यांचे निधन हा एका भारतीय न्यायव्यवस्थेतील एका प्रदीर्घ युगाचा अस्त आहे. जो कोणी आपल्यापाशी मदत मागायला आला, त्याची पार्श्वभूमी, त्याच्यावरील आरोपांचे गांभीर्य न पाहता वा त्याच्याविषयीच्या जनमताची फिकीर न बाळगता, आपली सर्व प्रतिष्ठा पणाला लावून त्याच्यासाठी सतत न्यायदेवतेच्या दरबाराची दारे ठोठावत आलेल्या जेठमलानींचे वर्णन एका शब्दात करायचे तर ... Read More »

वाढती लोकसंख्या देशाच्या विकासाला घातक

देवेश कु. कडकडे (डिचोली) वाढत्या लोकसंख्येमुळे जीवनावश्यक गरजांवर प्रचंड भार पडतो. एका मोठ्या वर्गाला अनेक गरजा भागविण्यासाठी हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. जगात ज्या राष्ट्राच्या लोकसंख्या वाढीचा दर कमी असतो तिथेच विकासाला गती देणे शक्य आहे. जिथे लोकसंख्या वाढीचा दर जास्त असतो तिथे विकासाची गती संथ होत असते. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या काळात देशाला स्वावलंबी आणि विकसनशील बनविण्यासाठी अनेक योजना कार्यान्वित झाल्या. ... Read More »

खाणप्रश्‍नी केंद्रीय मंत्रीगटाकडून अभ्यास सुरू

>> केंद्रीय खाणमंत्री प्रल्हाद जोशी यांची पत्रकार परिषदेत माहिती ः २०२० नंतर विविध राज्यांतील खाणी बंद होणार खाणींचा प्रश्‍न हा केवळ गोव्यापुरता मर्यादित नाही. तर कर्नाटक, ओरिसासह अन्य विविध राज्यांतही खाणीचा प्रश्‍न आहे. आणि म्हणूनच ह्या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी केंद्रातील काही ज्येष्ठ मंत्र्यांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. खाणप्रश्‍नी तोडगा काढण्यासाठी काय करता येईल याचा ही समिती अभ्यास करीत ... Read More »

दक्षिण भारतात दहशतवादी हल्ला शक्य

>> लेफ्ट. जनरल सैनी यांनी दिली माहिती दक्षिण भारतातील भागांवर दहशतवादाचे सावट असल्याची शक्यता लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी यांनी काल पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. सर क्रीक या गुजरात किनारपट्टी भागातून काही रिकाम्या सोडून देण्यात आलेल्या संशयास्पद स्थितीतील बोटी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सैनी यांनी दिली. दक्षिण भारतातील भागात दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याचे ते यावेळी म्हणाले. त्याचबरोबर अशा कारवाया उधळून ... Read More »

गोमेकॉतील नोकर भरतीचे अर्ज ऑनलाईन मिळणार ः आरोग्यमंत्री

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील नोकर भरतीसाठीचे अर्ज ऑन लाइन उपलब्ध करण्यात येणार आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांनी काल दिली. गोमेकॉत सुमारे २९०० विविध पदांची भरती केली जाणार आहे. या नोकर भरतीचे अर्ज गोमेकॉतील डीन कार्यालयात उपलब्ध करण्यात आले होते. नोकर भरती अर्ज मिळविण्यासाठी डीनच्या कार्यालयात इच्छुकांची गर्दी होत होती. या अर्जासाठी ५० रुपये शुल्क आकारले जात ... Read More »

व्हिक्टोरिया फर्नांडिस यांच्यावर अंत्यसंस्कार

माजी मंत्री व्हिक्टोरिया फर्नांडिस यांच्या पार्थिवावर काल शासकीय इतमामात सांताक्रुझ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री मायकल लोबो, खासदार विनय तेंडुलकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, खासदार फ्रान्सिस सार्दिन, आमदार चर्चिल आलेमाव, माजी आमदार तोमाझीन कार्दोज, माजी मंत्री जुझे डिसोझा, तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, उद्योग व इतर क्षेत्रातील मान्यवरांनी माजी मंत्री फर्नांडिस यांना श्रद्धांजली अर्पण केली. Read More »

खराब हवामानाचा मच्छिमारी व्यवसायाला मोठा फटका

>> अजूनही ९० टक्के ट्रॉलर जेटीवरच नांगरलेले राज्यातील वादळी वारा आणि जोरदार पावसाचा मच्छीमारी व्यवसायाला फटका बसला आहे. खराब हवामानामुळे मच्छीमारी व्यावसायिकांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे, अशी माहिती ट्रॉलर व्यावसायिक हर्षद धोंड यांनी काल दिली. राज्यातील मच्छीमारी बंदी ३१ जुलै २०१९ रोजी मागे घेण्यात आलेली असली तरी, अद्यापपर्यंत सुमारे ९० टक्के मच्छीमारी ट्रॉलर जेटीवर नांगरून ठेवलेल्या स्थितीत ... Read More »

साधनसुविधा निर्मितीनंतरच नव्या वाहन कायद्याची अंमलबजावणी करावी ः दिगंबर

राज्यात आवश्यक साधन सुविधा तयार केल्यानंतर नवीन मोटर वाहन दुरुस्ती कायद्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी कॉंग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटाच्या बैठकीत करण्यात आली आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी पत्रकार परिषदेत काल दिली. नवीन मोटर वाहन दुरुस्ती २०१९ कायद्यात वाहतूक नियमांच्या उल्लंघनासाठी दंडाच्या रक्कमेत मोठी वाढ केलेली आहे. त्याच बरोबर रस्त्यावरील आवश्यक साधन सुविधा निर्माणावर भर देण्यात आलेला आहे. ... Read More »

राज्य सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी उल्हास फळदेसाई

गोवा राज्य सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी उल्हास फळदेसाई यांची काल निवड करण्यात आली आहे. या बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या संचालकांची बैठक सोमवारी घेण्यात आली. या बैठकीत उपाध्यक्षपदी पांडुरंग कुर्टीकर यांची निवड करण्यात आली. या बँकेच्या निवडणुकीत आठ संचालक बिनविरोध निवडून आले होते. दोन जाग्यांसाठी २५ ऑगस्टला निवडणूक घेण्यात आली होती. राज्यातील सहकार क्षेत्रात शिखर बँक असलेली गोवा राज्य सहकारी ... Read More »

अफगाणिस्तानचा २२४ धावांनी विजय

राशिद खान याच्या सामन्यातील ११ बळींच्या जोरावर अफगाणिस्तानने काल सोमवारी यजमान बांगलादेशचा २२४ धावांनी पराभव करत आपल्या कसोटी कारकिर्दीतील दुसर्‍या विजयाची चव चाखली. शेवटच्या दिवशी विजयासाठी अफगाणिस्तानला केवळ ४ गड्यांच्या आवश्यकता होती. परंतु, पहिली दोन्ही सत्रे पावसामुळे वाहून गेली. शेवटच्या सत्रातील केवळ २१ षटकांचा खेळ होता. त्यामुळे सामना अनिर्णित राखण्याची सुवर्णसंधी बांगलादेशकडे होती. परंतु, केवळ ३.२ षटकांचा खेळ बाकी असताना ... Read More »