ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: September 9, 2019

प्रेरणादायी

वरवर पाहता ‘चंद्रयान २’ अंतिम टप्प्यात अपयशी ठरल्याचे जरी दिसत असले तरी त्याने चंद्रापासून २.१ किलोमीटर अंतरापर्यंत नियोजनाबरहुकूम अगदी अचूकपणे गाठलेली मजल प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी आहे. चंद्रयान २ चे लँडर ‘विक्रम’ चंद्रावर उतरू शकले नाही. चंद्रापासून फक्त २.१ किलोमीटर उंचीवर असताना त्याचा पृथ्वीशी एकाएकी संपर्क तुटला. त्यामुळे त्याचे आणि त्याच्यातील ‘प्रज्ञान’ चे पुढे नेमके काय झाले हे आपल्याला ... Read More »

जम्मू काश्मीरचा चक्रव्यूह

ल. त्र्यं. जोशी खोर्‍यात तरी सामान्य परिस्थिती निर्माण झाली असे म्हणता येणार नाही आणि त्यासाठीच अवधी लागणार आहे. तेथील सामान्य माणूस सुरक्षा दले आणि दहशतवादी यांच्या मध्ये सापडलेला आहे. आपण नवी व्यवस्था स्वीकारली तर दहशतवादी आपल्याला सुखाने जगू देतील याची त्यांना खात्री नाही. ती निर्माण करायला वेळ लागणारच आहे. चक्रव्यूह म्हटल्यानंतर थेट अभिमन्युपर्यंत पोचण्याची गरज नाही, पण जम्मू काश्मीरची समस्या ... Read More »

राम जेठमलानी यांचे निधन

नामवंत कायदे पंडीत तथा माजी केंद्रीय मंत्री राम जेठमलानी यांचे काल सकाळी ७.४५ वा. वयाच्या ९५व्या वर्षी निधन झाले. इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्या हत्याप्रकरणतील आरोपींच्यावतीने जेठमलानी यांनी न्यायालयात बाजू मांडली होती. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले असून त्यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. जेठमलानी यांच्यावर कालच अंत्यसंस्कार करण्यात आले. संरक्षणमंत्री राजनाथ ... Read More »

विक्रम लँडरचे ठिकाण सापडले : के. सिवन

चंद्राच्या पृष्ठभागापासून काही अंतरावर असतानाच चांद्रयान-२ मोहीमेतील विक्रम लँडरचा संपर्क तुटल्याने इस्रोच्या शास्त्रज्ञांसह सर्वांचा विरस झाला होता. मात्र काही तासांच्या जोरदार प्रयत्नांनंतर विक्रम लँडरचे ठिकाण शोधण्यात इस्रोच्या शास्त्रज्ञांना यश आले आहे. इस्रोचे प्रमुख के. सिवन यानी ही माहिती दिली आहे. ऑर्बिटरने लँडरची छायाचित्रे घेतली असून संपर्क झालेला नाही अशी माहिती सिवन यांनी दिली आहे. लँडरशी संपर्काचे आमचे प्रयत्न सुरुच असून ... Read More »

मुख्यमंत्री सावंत यांच्याकडून एकाही आश्‍वासनाची पूर्तता नाही : कॉंग्रेस

पावसाळी अधिवेशन संपून एक महिना उलटलेला असताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यानी विधानसभेत दिलेले एकही आश्‍वासन अजून पूर्ण केले नसल्याचा आरोप काल प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यानी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केला आहे. मुख्यमंत्री जनतेप्रती पूर्णपणे असंवेदनशील बनले असून त्यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने ऐन चतुर्थी काळात लोकांना हाल अपेष्टा सहन करण्यास भाग पाडल्याचा आरोप चोडणकर यानी केला आहे. अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या ... Read More »

३७१ व्या कलमाला हात लावणार नाही : अमित शहा

ईशान्य भारतातील राज्यांना विशेष राज्य दर्जा देणार्‍या घटनेतील ३७१ व्या कलमाला हात लावला जाणार नाही अशी ग्वाही काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. आसामात अलीकडेच एनआरसीची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर अमित शहा यांनी प्रथमच काल आसामचा दौरा केला. तेथील नॉर्थ ईस्ट कौन्सिलच्या बैठकीस ते उपस्थित राहिले. ३७१व्या कलमाला भारतीय घटनेत विशेष स्थान आहे. व भाजप सरकार त्याचा आदर करते ... Read More »

नवीन वाहतूक नियमांबाबत निर्णय डिसेंबर अखेरीस

राज्यात नवीन वाहतूक नियमांची अंमलबजावणी आत्ताच्या घडीला शक्य नाही. राज्यातील रस्त्यावरील खड्‌ड्यांची दुरुस्ती व नवीन वाहतूक नियमाबाबत जनजागृतीला प्राधान्य दिले जाणार आहे. डिसेंबरच्या अखेरीस फेरआढावा बैठक घेऊन वाहतूक नियम अंमलबजावणीबाबत निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली. राज्यात नवीन वाहतूक नियमाची अंमलबजावणीबाबत वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला आहे. आता, मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या वक्तव्यानंतर नवीन ... Read More »

अन्न सुरक्षा आयोग स्थापनेचा मार्ग मोकळा

राज्यात अन्न सुरक्षा आयोग स्थापनेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. नागरी पुरवठा खात्याने गोवा अन्न सुरक्षा (आयोग) नियम सरकारी पत्रकातून ५ सप्टेंबरला अधिसूचित केले आहेत. नागरी पुरवठा संचालनालयाने हा आयोग स्थापनेबाबत तयार केलेला नियमांचा मसुदा ३० मे २०१९ रोजी जाहीर केला होता. या नियमाच्या मसुद्याबाबत सूचना व हरकतीसाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली होती. या मसुद्याबाबत निर्धारित काळात कोणतीही सूचना ... Read More »

बांगलादेशच्या पराभवाची औपचारिकता बाकी

पाहुण्या अफगाणिस्तानविरुद्ध यजमान बांगलादेशचा संघ पराभवाच्या उंबरठ्यावर आहे. विजयासाठी ३९८ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशची चौथ्या दिवसअखेर ६ बाद १३६ अशी दयनीय स्थिती झाली आहे. विजयासाठी त्यांना अजून २६२ धावांची आवश्यकता असून त्यांचे केवळ ४ गडी शिल्लक आहे. तिसर्‍या दिवसाच्या ८ बाद २३७ धावांवरून काल पुढे खेळताना अफगाणिस्तानने २६० धावांपर्यंत मजल मारली. यष्टिरक्षक फलंदाज झाझाय सलग दुसर्‍या डावात अर्धशतकापासून वंचित राहिला. ... Read More »

कॅनडाची बियांका अँड्रिस्कू चॅम्पियन

>> अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सचे २४वे ग्रँडस्लॅम जेतेपद हुकले कॅनडाच्या बियांका अँड्रिस्कू हिने अमेरिकेच्या सेरेना विल्यम्स हिचा ६-३, ७-५ असा पराभव करत युएस ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या पराभवामुळे कारकिर्दीतील २४वे ग्रँडस्लॅम जेतेपदाचे सेरेनाचे स्वप्न भंग पावले. सामना सुरू झाल्यापासून बियांकाने सेरेनाच्या अनुभवाची तमा न बाळगता आपला नैसर्गिक आक्रमक खेळ केला. सेरेनाचे प्रत्येक फटके तितक्याच दिमाखाने परतावून लावत बियांकाने सामन्यात ... Read More »