Monthly Archives: August 2019

उद्यापर्यंत खाण अवलंबितांना एक लाख द्या; अन्यथा आंदोलन

>> पिळये येथे खाण मंचच्या सभेत सरकारला इशारा राज्यातील खाणी बंद झाल्यामुळे खाण अवलंबितांची रोजीरोटी बंद झाली आहे. गणेश चतुर्थी कशी साजरी करायची हा प्रश्‍न निर्माण झाला असून सरकारने खाण अवलंबितांच्या बँक खात्यात प्रत्येकी एक लाख रुपये २९ ऑगस्टपूर्वी घालावेत, अन्यथा शुक्रवारी ३० रोजी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर खाण अवलंबित धरणे आंदोलन छेडतील असा इशारा गोवा खाण मंचच्या सभेत देण्यात आला. कामगार ... Read More »

आरबीआय : टीकेआधी कॉंग्रेसच्या वित्तमंत्र्यांना विचारायला हवे होते

>> राहूलच्या हल्ल्यावर सीतारमणांची प्रतिक्रिया भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) १ लाख ७६ हजार कोटी रुपयांची रक्कम भारत सरकारकडे हस्तांतरीत केल्याप्रकरणी कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण संतप्त झाल्या आहेत. राहूल गांधी यांनी सदर वक्तव्य करण्याआधी कॉंग्रेसच्या माजी वित्तमंत्र्यांशी चर्चा करायला हवी होती. त्यांच्या ‘त्या’ वक्तव्याला आपण महत्त्व देत नाही अशी टिप्पणी सीतारमण यांनी पत्रकार परिषदेत ... Read More »

पणजीतील वाहतूक कोंडीमुळे नाराजी

राजधानी पणजीतील दुचाकी, चार चाकी वाहनचालक गेल्या काही दिवसांपासून शहरात कोणत्याही वेळी होणार्‍या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त बनले आहेत. मात्र या कोंडीपासून वाहन चालकांना दिवसा देण्याबाबत वाहतूक पोलिसांकडे कोणतीही नियोजनबद्धता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गणेश चतुर्थी ऐन तोंडावर येत असताना पणजीतील वाहनचालकांची डोकेदुखी वाढणार आहे. यावर नियंत्रणासाठी वाहतूक पोलिसांनी गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अष्टमीची फेरी नुकतीच मांडवी ... Read More »

एलईडी पथदीप, रस्ते दुरुस्तीचे आश्‍वासन हवेत विरले ः कॉंग्रेस

गेल्या विधानसभा अधिवेशनात विरोधकांनी राज्यातील दुरवस्था झालेले रस्ते व एलईडी पथदीप पेटत नसल्याने सर्वत्र होणार्‍या अंधाराच्या प्रश्‍नावर आवाज उठवल्यानंतर सरकारने चतुर्थीपूर्वी राज्यभरातील खराब झालेल्या रस्त्यांची डागडुजी करण्याचे व सर्वत्र नवे पथदीप बसवण्याचे आश्‍वासन दिले होते. पण हे आश्वासन हवेतच विरुन गेल्याचा आरोप काल विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी काल पत्रकार परिषदेत केला. चतुर्थी आता दोन दिवसांवर येऊन ठेपलेली असताना ... Read More »

जोकोविच, मेदवेदेवची विजयी सलामी

>> सुमीत नागलने फेडररला झुंजवले युएस ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या पहिल्या दिवशी अव्वल मानांकित नोवाक जोकोविच याने स्पेनच्या रॉबर्टो कार्बेलास बाएना याचा ६-४, ६-१, ६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव करत दुसरी फेरी गाठली. भारताच्या सुमीत नागल याच्याविरुद्ध पहिला सेट गमवावा लागल्यानंतर तृतीय मानांकित रॉजर फेडरर याने स्वतःला सावरत सामना ४-६, ६-१, ६-२, ६-४ असा जिंकत आगेकूच केली. विजयानंतर फेडरर याने सुमीतचे ... Read More »

बुमराहची सातव्या स्थानी झेप

अँटिगा येथे पार पडलेल्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी सामन्यात अप्रतिम कामगिरी करत टीम इंडियाचा गोलंदाज जसप्रीत बुमराहने आयसीसी क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत प्रथमच अव्वल दहा खेळाडूंत स्थान मिळवले आहे. बुमराहने विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील दुसर्‍या डावात पाच बळी मिळवत १६व्या स्थानावरून थेट ७व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. बुमराहच्या खात्यात ७७४ गुण जमा झाले आहेत. वेस्ट इंडीजचा किमार रोच ( + ३, आठवे स्थान) ... Read More »

अनाठायी लुडबूड

संविधानाच्या कलम ३७० खालील विशेषाधिकार हटवले गेल्यापासून तणावाखाली असलेल्या काश्मीर खोर्‍याला भेट द्यायला खास विमानातून गेलेले कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी आणि इतर विरोधी पक्षनेत्यांना श्रीनगर विमानतळावरूनच परत पाठवले गेले. त्यामुळे त्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली व सरकार काश्मीरमधील सद्यस्थिती लपवू पाहात असल्याचा आरोप केला. इतकेच सांगून हे विरोधी नेते थांबले नाहीत तर काश्मीरमधील सध्याची परिस्थिती भयावह असल्याचा आरोप त्यांनी केला. ... Read More »

पराभव चिदंबरम यांचा आणि कॉंग्रेसचाही!

ल. त्र्यं. जोशी ज्या पध्दतीने तपासयंत्रणा विजय मल्ल्‌या, नीरव मोदी, चोकसी मामा आणि आता कार्ती आणि बाबा पी. चिदंबरम यांच्या मुसक्या आवळायला लागलेल्या आहेत, त्यावरुन ही मोहीम आता माध्यमांमधून बाहेर पडली आहे असे म्हणावे लागेल व तीच चिदंबरम प्रकरणाची महत्वाची उपलब्धी आहे. भारताचे संपुआ काळातील गृहमंत्री आणि अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या अटकेच्या निमित्ताने गेल्या आठवड्यात वेगाने घडलेल्या घटना पाहता पंतप्रधान ... Read More »

अरुण जेटली पंचत्वात विलीन

शनिवारी निधन झालेले भारताचे माजी वित्त व संरक्षणमंत्री अरूण जेटली यांच्यावर काल येथील निगमबोध घाट येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्री, विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते विविध राज्यांचे मुख्यमंत्री, जेटली यांचे हजारो चाहते तसेच विदेशी प्रतिनिधीही उपस्थित होते. ६६ वर्षीय जेटली यांचे एम्स ... Read More »

सिंधूचे ऐतिहासिक जगज्जेतेपद :

स्वित्झर्लंड : बीएमएफ विश्‍व बॅडमिंटन स्पर्धेची पहिली विजेती भारतीय खेळाडू ठरण्याची ऐतिहासिक कामगिरी पी. व्ही. सिंधू हिने साकारली आहे. अंतिम लढतीत जपानच्या नोझोमी ओकुहारा हिचा अवघ्या ३६ मिनिटात पराभव करण्याची किमया सिंधूने साधली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधूची कामगिरी देशासाठी अभिमानस्पद आहे अशा शब्दात तिचे अभिनंदन केले आहे. Read More »