Monthly Archives: August 2019

सीताराम येच्युरी यांना काश्मीरात जाण्यास परवानगी

सर्वोच्च न्यायालयाने काल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येच्युरी यांना जम्मू-काश्मीरातील त्यांचे सहकारी तथा माजी आमदार महंमद युसूफ तारिगामी यांना भेटण्यासाठी काश्मीरात जाण्याची परवानगी दिली. येच्युरी यांना काश्मीरात जाऊ दिल्यास तेथील स्थितीवर परिणाम होण्याची केंद्र सरकारने व्यक्त केल्यानंतरही न्यायालयाने येच्युरी यांना काश्मीरात जाण्यास परवानगी दिली. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी विचारले की जर एक नागरिक आपल्या ... Read More »

फर्मागुढीत क्रेन खाली कोसळून एक ठार

काशीमठ येथील फर्मागुढी-ढवळी चौपदरी रस्त्यावरून क्रेन उंचावरून खाली कोसळल्याने एकजण जागीच ठार झाला. या अपघातात आणखी एक गंभीर जखमी झाला आहे. काल सकाळी दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. क्रेन सुमारे आठ मीटर उंचावरून खाली जोडरस्त्यावर कोसळल्याने डोक्याल गंभीर इजा झाल्याने क्रेनचालक पप्पूकुमार रामेश्‍वर यादव (वय २३) हा ठार झाला. क्रेनवरील दुसरा कामगार अर्जुन बिंदेश्‍वर यादव हा गंभीर जखमी झाला असून, ... Read More »

कदंबला ५० विद्युत बसेस मंजूर

केंद्र सरकारच्या ‘फेम’ योजनेखाली कदंब महामंडळाला ५० इलेक्ट्रिक बसेस मंजूर झाल्या असल्याची माहिती महामंडळाचे चेअरमन कार्लुस आल्मेदा यानी काल पत्रकार परिषदेत दिली. वरील योजनेखाली कदंब महामंडळाला येत्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत या बसेससाठी निविदा काढावी लागणार आहे. या बसेसची किंमत (प्रत्येकी) २.३० कोटी रुपये एवढी असेल व त्या भारतीय बनावटीच्या असाव्या लागतील. सरकार लवकरच इलेक्ट्रिक वाहने धोरण तयार करणार असून त्यानंतर ह्या ... Read More »

भाजपनेच देशाची माफी मागण्याची वेळ ः सूरजेवाला

राहुल गांधींच्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करून व टीका करून भाजप राजकारण करीत असल्याचा आरोप काल कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी केला. संपूर्ण देश एकजूट व्हावा असे भाजपला वाटत नाही का असा सवाल सूरजेवाला यांनी केला. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचे राजकीय संतुलन बिघडले असून भाजप खालच्या पातळीवर जाऊन टीका करत असल्याचे सूरजेवाला म्हणाले. राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीर आणि लडाख प्रदेश ... Read More »

नदाल, ओसाका दुसर्‍या फेरीत

>> डॉमनिक थिम, स्टेफानोस त्सित्सिपासला पराभवाचा धक्का स्पेनच्या द्वितीय मानांकित राफेल नदाल याने सरळ तीन सेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिल्मन याचा ६-३, ६-२,६-२ असा फडशा पाडत युएस ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीत प्रवेश केला. दुसर्‍या फेरीत नदालचा सामना ऑस्ट्रेलियाच्या थानिस कोकिनाकिस याच्याशी होणार आहे. जागतिक क्रमवारीत कोकिनाकिस २०३व्या स्थानी आहे. महिला एकेरीत जपानच्या अव्वल मानांकित नाओमी ओसाका हिला रशियाच्या ऍना ब्लिंकोवा ... Read More »

विंडीजचे सिसिल राईट ८५व्या वर्षी निवृत्त

>> खात्यात तब्बल ७००० बळींची नोंद वेस्ट इंडीजच्या सिसिल राईट यांनी वयाच्या ८५व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा काल केली. मंगळवार ७ सप्टेंबर रोजी ते आपला शेवटचा सामना खेळणार आहेत. राईट यांनी जमैकाकडून बार्बेडोसविरुद्ध वेस हॉल, कॉली स्मिथ, सेमूर नर्स यांच्यासारख्या दिग्गजांसोबत प्रथमश्रेणी सामना खेळला होता. या सामन्यात राईट यांनी दोन्ही डावांत मिळून ६६ चेंडूंत ४१ धावा मोजून एकही गडी बाद ... Read More »

तानाजी-पीटर उपांत्यपूर्व फेरीत

गोव्याच्या तानाजी सावंत व पीटर तेलीस यांनी योनेक्स सनराईज खिल भारतीय मास्टर्स मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत ६० वर्षांखालील पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. गोवा बॅडमिंटन संघटनेने अखिल भारतीय बॅडमिंटन महासंघाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या स्पर्धेतील सामने पेडे येथील बहुउद्देशीय सभागृहात खेळविण्यात येत आहेत. पीटर व तानाजी यांनी काल गुजरातच्या अरुण कौल व आनंद थिरानी यांचा २१-१२, २१-११ असा पराभव केला. ... Read More »

ट्रम्प यांची माघार

काश्मीर प्रश्नी मध्यस्थी करण्याची अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची खुमखुमी अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या भेटीनंतर जिरल्याचे स्पष्ट झाले. उभय नेते जेव्हा संयुक्तपणे पत्रकारांना सामोरे गेले, तेव्हा दोघांनीही काश्मीरचा प्रश्न भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय प्रश्न असून ते तो सोडवू शकतील अशी भूमिका घेतली. भारताचे हे मोठे यश आहे असे म्हणावे लागेल, कारण ट्रम्प यांनी काश्मीरप्रश्नी मध्यस्थीचा आपला हेका ... Read More »

सोशल मीडिया आणि मतनिर्मिती

ऍड. प्रदीप उमप सोशल मीडियाला आधारशी लिंक करण्याची योजना सरकारच्या विचाराधीन आहे. यामागे सोशल मीडियाचा गुन्हेगारीसाठी होणारा वापर हे मुख्य कारण आहे. तथापि, सोशल मीडियाबाबत गोपनीयतेसंदर्भातीलही अनेक मुद्दे चर्चेत आहेत. तसेच सोशल मीडिया हा आज राष्ट्रीय मत बनवण्याचे काम करण्यात मोठा हातभार लावत आहे, ही बाब सर्वांनीच विचार करण्याजोगी आहे. एखाद्या मुद्द्यावर देशातील जनमत जाणून घेण्यासाठी पूर्वी बराच काळ सातत्यपूर्ण ... Read More »

पूरग्रस्तांना नुकसान भरपाई वितरण सुरू

>> डिचोली तालुक्यातील ४० जणांना मुख्यमंत्र्यांहस्ते झाले वितरण गणेश चतुर्थीपूर्वी राज्यातील पूरग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यात येईल या गोवा विधानसभेत दिलेल्या आश्‍वासनानुसार सरकारने पूरग्रस्तांना नुकसान भरपाई वितरीत करण्याचे काम कालपासून सुरु केले. काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते डिचोली तालुक्यातील ४० पूरग्रस्तांना नुकसान भरपाईवे वितरण करण्यात आले. डिचोली तालुक्यातील १०५ पूरग्रस्तांना टप्प्या टप्प्याने ही नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. तर ... Read More »