Monthly Archives: August 2019

‘त्या’ युवतीच्या जन्म दाखल्यासाठी बाबूश मोन्सेरात यांचा अर्ज

पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी कथित बलात्कार प्रकरणातील पिडीत युवतीचा जन्म दाखला मिळविण्यासाठी येथील जिल्हा न्यायालयात अर्ज काल सादर केला. न्यायालयाने सरकार पक्षाला या प्रकरणी बाजू मांडण्याची सूचना केली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी १९ सप्टेंबर २०१९ रोजी ठेवण्यात आली आहे. आमदार मोन्सेरात यांच्याविरोधात युवतीवरील कथित बलात्कार प्रकरणी येथील जिल्हा न्यायालयात खटला सुरू आहे. या बलात्कार प्रकरणातील युवतीच्या वयाबाबत आम्ही ... Read More »

फेडरर, जोकोविचची तिसर्‍या फेरीत धडक

सर्बियाचा अव्वल मानांकित नोवाक जोकोविच व स्वित्झर्लंडच्या तिसर्‍या मानांकित रॉजर फेडरर यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत युएस ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या तिसर्‍या फेरीत प्रवेश केला आहे. विद्यमान विजेत्या जोकोविच याने सामन्या दरम्यान आपल्या दुखर्‍या डाव्या खांद्यावर उपचार घेत जागतिक क्रमवारीत ५६व्या स्थानावरील अर्जेंटिनाच्या जुआन इग्नासियो लोंडेरो याचा सरळ तीन सेटमध्ये ६-४, ७-६, ६-१ असा पराभव केला. दुसरीकडे फेडररला मात्र विजयासाठी चार ... Read More »

भारत-विंडीज दुसरी कसोटी आजपासून

भारत व वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून किंग्सटन येथे सुरु होणार आहे. पहिला सामना जिंकून भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली असून आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील ६० मौल्यवान गुणदेखील आपल्या खात्यात जमा केले आहेत. विंडीजला व्हाईटवॉश देऊन अजून साठ गुणांची कमाई करण्यासाठी भारत मैदानात उतरणार आहे. भारतीय संघाचा विचार केल्यास रविचंद्रन अश्‍विनला खेळविण्याचा प्रश्‍न सर्वप्रथम येतो. पहिल्या कसोटीसाठी ... Read More »

बुडत्याला आधार

देशातील आर्थिक मंदीशी झुंजणार्‍या सरकारला मदतीचा हात देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने तब्बल १.७६ लाख कोटी रुपये देऊ केल्याने मतमतांतरे व्यक्त होऊ लागली आहेत. विरोधकांनी या हस्तांतराला जोरदार आक्षेप घेतला आहे. रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक भांडवल संरचनेच्या फेररचनेसाठी सरकारने नियुक्त केलेल्या बिमल जालान यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीच्या शिफारशीनुसार रिझर्व्ह बँक सरकारला ही मदत देणार आहे व त्याला रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाने नुकतीच ... Read More »

जी – ७ परिषदेचे फलित आणि अपयश

 शैलेंद्र देवळणकर फान्समध्ये पार पडलेल्या जी-७ परिषदेमध्ये अत्यंत महत्त्वाच्या मुद्दयांबाबत ठोस निर्णय होणे आवश्यक होते; पण संघटनेच्या सदस्य राष्ट्रांमध्ये असणार्‍या मतभेदांमुळे कोणत्याही प्रस्तावावर सहमती न होता या परिषदेचे सूप वाजले. असे असले तरी अतिथी म्हणून बोलावण्यात आलेल्या भारतासाठी ही परिषद ङ्गलदायी ठरली, कारण ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्‍न हा भारत-पाक यांच्यातील द्विपक्षीय मुद्दा असल्याच्या पंतप्रधान मोदींच्या भूमिकेला दुजोरा दिला. फान्समध्ये बिअरित्झ ... Read More »

देशात ७५ नवी वैद्यकीय महाविद्यालये उभारणार

>> केंद्रीय मंत्रिमंडळाचे अनेक महत्वाचे निर्णय >> एफडीआय नियम शिथिल केंद्र सरकारने काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले असून येत्या २०२२ सालापर्यंत देशात ७५ नवी वैद्यकीय महाविद्यालये सुरू केली जाणार आहेत. याबाबतची घोषणा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत केली. या प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयांमुळे एमबीबीएसच्या आणखी १५,७०० जागा निर्माण होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ... Read More »

३ हजार एलईडी दिवे वितरीत; आज, उद्या ७ हजार देणार

गणेश चतुर्थीपूर्वी राज्यातील चाळीसही मतदारसंघांत प्रत्येकी ३०० एलईडी दिवे देण्याची सोय करण्यात येणार असून वीज खात्याने यापूर्वीच ३ हजार एलईडी दिव्यांचे वितरण केले आहे, अशी माहिती वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी काल दिली. गुरुवारपर्यंत (आज) वीज खाते विविध मतदारसंघात आणखी २ हजार एलईडी दिव्यांचे वितरण करणार आहे. तर शुक्रवारी (उद्या) आणखी ५ हजार एलईडी दिवे मतदारसंघांसाठी देण्यात येणार असल्याची माहिती काब्राल ... Read More »

काश्मीरात माध्यम निर्बंधांवरून सर्वोच्च न्यायालयाकडून नोटिसा

घटनेतील ३७० कलम रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरातील प्रसार माध्यमांवर कडक निर्बंध लागू केल्यामुळे प्रसार माध्यमांच्या कामात मोठी बाधा निर्माण झाल्याबाबतच्या याचिकांना अनुसरून सर्वोच्च न्यायालयाने काल केंद्र सरकार व जम्मू-काश्मीर प्रशासनाला नोटिसा बजावल्या आहेत. काश्मीर टाईम्सच्या संपादक अनुराधा भसिन व कॉंग्रेस कार्यकर्ते तेहसीन पुनावाला यांच्या याचिकांवरून न्यायालयाने या नोटिसा बजावल्या आहेत. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. एस. ए. बोबडे व न्या. एस. ए. ... Read More »