Monthly Archives: August 2019

शिक्षेची तरतूद असलेले प्लास्टिकबंदी विधेयक मंजूर

राज्यात प्लास्टिक उत्पादन आणि वापराला बंदी लादणार्‍या गोवा नॉन बायोडिग्रेडेबल कचरा (नियंत्रण) दुरुस्ती विधेयकाला विधानसभेत काल मंजुरी देण्यात आली. गोवा राज्य हे प्लास्टिक मुक्त राज्य म्हणून जाहीर करण्यात येणार असून प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी १ जानेवारी, २०२० पासून केली जाणार आहे. प्लास्टिकच्या पिशव्या व प्लास्टिकपासून वस्तू तयार करणारे उत्पादक आणि वापर करणार्‍यांना दंड किंवा कारावासाच्या शिक्षेची तरतूद विधेयकामध्ये आहे, अशी माहिती ... Read More »

जम्मूमधून संचारबंदी उठवली

गेल्या सहा दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये संचारबंदी (कलम १४४ ) लागू असून काल ङ्गक्त जम्मूमधून ही संचारबंदी पूर्णपणे उठवण्यात आली आहे. मात्र, राज्याच्या इतर भागात संचारबंदी कायम असणार आहे. दरम्यान, संचारबंदी उठवण्यात आल्याने जम्मूमधील शाळा आणि महाविद्यालये आज सुरू होणार आहेत. जम्मू जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी सुषमा चौहान यांनी जम्मूमधील संचारबंदी आणि जमावबंदी उठवली आहे. तसे आदेशच काढण्यात आले आहे. या आदेशानुसार शनिवार १० ... Read More »

सरकारी भूखंडासाठी २५ वर्षांच्या निवासी दाखल्याची अट ः मॉविन

राज्यातील गृहनिर्माण वसाहतीत घरासाठी भूखंड खरेदी करण्यासाठी आतापर्यंत १५ वर्षांच्या निवासी दाखल्याची जी अट होती ती आता वाढवून २५ वर्षे एवढी करण्यात येणार असल्याचे गृहनिर्माण खात्याचे मंत्री माविन गुदिन्हो यांनी काल विधानसभेत सांगितले. कॉंग्रेस आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी काल विधानसभेत मांडलेल्या खासगी ठरावावर बोलताना गुदिन्हो यांनी वरील घोषणा केली. माविन गुदिन्हो म्हणाले, की बरेचसे गोमंतकीय गृहनिर्माण वसाहतीत भूखंड खरेदी ... Read More »

लोकायुक्त, दक्षता खाते सक्षम करणार : मुख्यमंत्री

भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी दक्षता खाते आणि लोकायुक्तालय सक्षम करण्यात जाणार येणार आहेत. सरकारकडून अनावश्यक खर्चाला आळा घातला जाणार असून सरकारी निधीचा योग्य विनियोग करण्यावर भर दिला जाणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत गोवा विनियोग विधेयकावरील चर्चेत बोलताना काल दिली. पंधराव्या वित्त आयोगाकडे निधीबाबत विचारविनिमय करण्यापूर्वी सर्व आमदारांना विश्‍वासात घेण्यात येणार आहे. केंद्राकडून मार्गदर्शक तत्त्वानुसार राज्यांना निधी उपलब्ध ... Read More »

भय इथले संपत नाही…

>> साळ, पेडण्यात पाणी ओसरले पण भीती कायम तिलारी धरणाच्या जलविसर्गामुळे व मुसळधार पावसामुळे महापुराचा तडाखा बसलेल्या साळ गावातील पूर ओसरला आहे. पुलाखाली पाणी गेल्याने व पाणी ओसरू लागल्याने साळवासीयांना थोडा धीर आला असला तरी लाखो रुपयांची शेती बागायतीची, घरांची हानी झाल्याने ते भीतीच्या छायेत आहेत. दरम्यान, साळ नदीवरील बंधारा ङ्गूटब्रिज पूर्णपणे उखडला असून भलीमोठी लाकडे, ओंडके अडकून असल्याने या ... Read More »

बीसीसीआय झुकली

>> ‘नाडा’ करणार भारतीय क्रिकेटपटूंची उत्तेजक चाचणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य विरोधी संस्था (नाडा) अंतर्गत येण्यास काल शुक्रवारी सहमती दर्शवली. मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी व महाव्यवस्थापक (क्रिकेट व्यवहार) साबा करीम यांनी क्रीडा सचिव राधेश्याम झुलनिया व नाडाचे महासंचालक नवीन अगरवाल यांची नवी दिल्ली येथे भेट घेतल्यानंतर मंडळाचा निर्णय जाहीर केला. बीसीसीआयने आमच्यासमोर तीन मुद्दे ... Read More »

मोईनच्या जागी लिच

>> ‘लॉडर्‌‌स’साठी इंग्लंड संघात बदल ऑस्ट्रेलियाविरुद्ध लॉडर्‌‌स येथे १४ ऑगस्टपासून होणार्‍या दुसर्‍या ऍशेस कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने अष्टपैलू मोईन अली याला वगळले आहे. त्याच्या जागी सॉमरसेटचा डावखुरा फिरकीपटू जॅक लिच याचा १२ सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे. जेम्स अँडरसन व ओली स्टोन यांना दुखापतीमुळे अपेक्षेप्रमाणे स्थान मिळालेले नाही. एजबेस्टन येथे पहिल्या कसोटीत मोईनला १७२ धावा मोजून केवळ तीन गडी बाद ... Read More »

पोनप्पा-रेड्डी उपांत्य फेरीत

अव्वल मानांकित अश्‍विनी पोनप्पा व सिक्की रेड्डी यांनी काल शुक्रवारी हैदराबाद ओपन बीडब्ल्यूएफ टूर सुपर १०० स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. काल शुक्रवारी त्यांनी मेघना जक्कमपुडी व पूर्विशा राम यांचा पराभव केला. पोनप्पा -रेड्डीने आठव्या मानांकित जोडीचा २१-१६, २१-१५ असा पराभव करत हॉंगकॉंगच्या कान यान फान व यी टिंग वू यांच्याशी गाठ पक्की केली. पुरुष एकेरीत सातव्या मानांकित सौरभ वर्मा ... Read More »

 क्षण एकच पुरे !

–  अनुराधा गानू (आल्त-सांताक्रूझ, बांबोळी) कोणत्यातरी एका क्षणी वादळ येतं किंवा पूर येतो किंवा भूकंप होतो आणि होत्याचं नव्हतं होऊन जातं. कोणत्या तरी एका क्षणी झाडावर कळी फुटते आणि दुसर्‍या एका क्षणात कळीचं फूल होतं. श्रावणातल्या पावसाचं वर्णनच- ‘क्षणात येती सरसर शिरवे.. क्षणात फिरुनी ऊन पडे’ असं आहे.  ‘क्षण’ हा माणसाच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा भाग. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक क्षण ... Read More »

स्वमग्नता (अणढखडच) भाग – १

वृंदा मोये (संचालक- आनंद निकेतन, म्हापसा) ऑटिझम असलेली मुलं काही गोष्टी उत्तमरीत्या करू शकतात. एखाद्या कठीण इंग्लिश शब्दाचं स्पेलिंग सांगणं, कोडी सोडवणं, अनेक गाणी चालीसकट पाठ असणं, एखाद्या दिवशी कोणता वार, कोणती तारीख, कोणता महिना हे न शिकवता पटापट सांगतात. विशेष मुलांची शाळा असल्याकारणाने प्रवेश घ्यायला येणार्‍या पालकांना आम्ही कधीही परत पाठवत नाही. याचं कारण स्पेशल स्कूल म्हटल्यावर आपल्या मुलांच्या ... Read More »