Monthly Archives: August 2019

केवळ कठोर कायद्याने अपघात टळतील?

ऍड. प्रदीप उमप देशात अपघातांत दरवर्षी सुमारे दीड लाख लोकांना जीव गमवावा लागतो. ही आकडेवारी पाहून परिवहनासंबंधी कठोर कायदे आणि नियम असावेत तसेच ते मोडणार्‍यांना जबर शिक्षा व्हावी, असे वाटणे स्वाभाविकच आहे. या दृष्टिकोनातून पाहिले असता संसदेत नुकतेच मंजूर झालेले मोटार वाहन दुरुस्ती विधेयक-२०१९ हे योग्य दिशेने टाकलेले एक पाऊल मानता येईल. दरवर्षी आपल्या देशात अनेक अपघात होतात आणि त्यात ... Read More »

युगान्त!

तुम अपना रंजो गम, अपनी परेशानी मुझे दे दो ऽ तुम्हें उनकी कसम, इस दिलकी वीरानी मुझे दे दो ऽऽ तुम्ही एखादे गाणे ऐकता आणि त्याचे शब्द, स्वर आणि सूर जेव्हा तुमची पाठ सोडत नाहीत, दिवसभर पिच्छा पुरवतात.. छळत राहतात, मनातल्या मनात तुम्ही ते गीत गुणगुणतच राहता, तेव्हा त्या गीतामागील अलौकिक प्रतिभेचीच ती साक्ष असते! खय्याम यांनी संगीतबद्ध केलेली अशी ... Read More »

पाण्यासाठी सलग सहाव्या दिवशी दाहीदिशा

>> डेडलाइन वाढल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप केरये – खांडेपार येथे फुटलेल्या ९०० मिमी मुख्य जलवाहिनीची सहाव्या दिवशी दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरू करण्यात यश प्राप्त झाले नाही. परिणामी राजधानी पणजीसह तिसवाडी आणि फोंडा तालुक्यातील काही भागातील नागरिकांना नळाद्वारे पाणी पुरवठ्यासाठी आणखीन प्रतीक्षा करावी लागणार आहे. नळाद्वारे पाणीपुरवठा बंद झाल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामाला विलंब होत असल्याने राजधानी ... Read More »

पुरामुळे राज्यात शेतीचे ८.९२ कोटींचे नुकसान

>> कृषिमंत्री चंद्रकांत कवळेकर यांची माहिती राज्यात ऑगस्ट महिन्यात आलेल्या पुरामुळे राज्यभरातील ६,३३६ शेतकर्‍यांच्या १९२० हेक्टर जमिनीतील पिकाची नासधूस झाली असून पुरामुळे शेतीचे सुमारे ८.९२ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा कृषिमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. कृषी खात्याने राज्यातील पुरामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीचा आढावा घेतला असून सविस्तर अहवाल तयार केला आहे. डिचोली, बार्देश, पेडणे ... Read More »

पणजी – मडगाव ‘मेगा ब्लॉक’

कॉंग्रेसचे तिरंगा मोर्चा आंदोलन रद्द पणजी-मडगाव महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी व त्यामुळे होणारा ‘मेगा ब्लॉक’ ही समस्या पुढील पाच दिवसांत सोडवण्याचे आश्‍वासन पोलीस महासंचालक प्रणब नंदा यांनी दिल्यामुळे आज बुधवारी आगशी ते कुठ्ठाळी असा कॉंग्रेस पक्षाने जो तिरंगा मोर्चा आयोजित केला होता तो रद्द करण्यात आला आहे. पाच दिवसानंतरही जर वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटला नाही तर तिरंगा मोर्चाचे आयोजन केले ... Read More »

अमित शहा उद्या गोव्यात

>> पश्‍चिम विभागीय परिषद पश्चिम विभागीय राज्यांच्या परिषदेची २४ वी बैठक २२ ऑगस्ट रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली पणजी येथे होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत परिषदेचे उपाध्यक्ष या नात्याने बैठकीला उपस्थित असतील. पश्चिम विभागीय परिषदेच्या बैठकीसाठी गुजरात, महाराष्ट्र आणि गोव्याचे मुख्यमंत्री तसेच दमण आणि दीव, दादरा-नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासकीय प्रमुख, राज्यांचे मुख्य सचिव आणि ... Read More »

पुराचे निमित्त करून खुल्या बाजारात महागाईचा भडका

>> भाजीपाल्याचे दर कडाडले >> कडधान्याच्या दरामध्येही भरमसाठ वाढ राज्यात ऐन गणेश चतुर्थीच्या तोंडावर खुल्या बाजारात कडधान्य, साखर, भाजीपाल्याचे दर वाढल्याने महागाईचा भडका उडाला आहे. कोल्हापूर, सांगली या भागातील पुरामुळे भाजी, साखर आणि कडधान्यांच्या दरामध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. खुल्या बाजारात कडधान्ये व इतर सामानाचे दर वाढलेले असले तरी गोवा मार्केटिंग फेडरेशनच्या येथील सहकार भंडारातील वस्तूंच्या किमतीमध्ये कोणतीही वाढ झालेली ... Read More »

विल्यमसन, बोल्टला विश्रांती

>> टिम साऊथीकडे न्यूझीलंड टी-ट्वेंटी संघाचे नेतृत्व श्रीलंकेेविरुद्धच्या टी-ट्वेंटी मालिकेसाठी न्यूझीलंडने कर्णधार केन विल्यमसन व अनुभवी जलदगती गोलंदाज ट्रेंट बोल्ट यांना विश्रांती दिली आहे. विल्यमसनच्या अनुपस्थितीत टिम साऊथी संघाचे नेतृत्व करणार आहे. टी-ट्वेंटी स्पेशलिस्ट यष्टिरक्षक टिम सायफर्ट याच्यासह मिचेल सेंटनर, टॉड ऍस्टल व ईश सोधी या तीन तज्ज्ञ फिरकीपटूंचा या संघात समावेश आहे. चार दिवसीय सामन्यांच्या प्लंकेट शिल्ड स्पर्धेत सायफर्टला ... Read More »

अकिलावर निलंबनाची टांगती तलवार

श्रीलंकेचा प्रमुख फिरकी गोलंदाज अकिला धनंजया याच्या गोलंदाजी शैलीविषयी मागील दहा महिन्यांत दुसर्‍यांदा शंंका उपस्थित करण्यात आली आहे. पुढील १२ दिवसांत त्याला बायोमॅकेनिक्स चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. या चाचणीत अपयशी ठरल्यास धनंजयावर वर्षभरासाठी निलंबनाची कारवाई केली जाणार आहे. आयसीसीच्या नियमानुसार दोन वर्षांच्या कालावधीत दोववेळा चाचणीत नापास होणार्‍या खेळाडूंवर या तर्‍हेची कारवाई केली जाते. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याच्या शैलीविषयी ... Read More »

पाण्याचे मोल जाणूया

तिसवाडी तालुक्याला पाणीपुरवठा करणार्‍या दोन मोठ्या जलवाहिन्या मुसळधार पावसात दरड कोसळल्याने फुटल्या आणि हजारो नागरिकांचे गेले चार दिवस हाल सुरू आहेत. नागरिकांना पर्यायी सुविधा उपलब्ध करून देण्यात सरकारचे सार्वजनिक बांधकाम खाते सपशेल अपयशी ठरले. लोकांवर अक्षरशः पागोळ्यांचे पाणी साठवण्याची पाळी ओढवली. पाणी हे ‘जीवन’ का आहे आणि पाण्याची किंमत काय असते हे अशा आणीबाणीच्या प्रसंगीच कळते. खरे तर गोव्यामध्ये ठिकठिकाणच्या ... Read More »