Daily Archives: August 28, 2019

ट्रम्प यांची माघार

काश्मीर प्रश्नी मध्यस्थी करण्याची अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची खुमखुमी अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या भेटीनंतर जिरल्याचे स्पष्ट झाले. उभय नेते जेव्हा संयुक्तपणे पत्रकारांना सामोरे गेले, तेव्हा दोघांनीही काश्मीरचा प्रश्न भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय प्रश्न असून ते तो सोडवू शकतील अशी भूमिका घेतली. भारताचे हे मोठे यश आहे असे म्हणावे लागेल, कारण ट्रम्प यांनी काश्मीरप्रश्नी मध्यस्थीचा आपला हेका ... Read More »

सोशल मीडिया आणि मतनिर्मिती

ऍड. प्रदीप उमप सोशल मीडियाला आधारशी लिंक करण्याची योजना सरकारच्या विचाराधीन आहे. यामागे सोशल मीडियाचा गुन्हेगारीसाठी होणारा वापर हे मुख्य कारण आहे. तथापि, सोशल मीडियाबाबत गोपनीयतेसंदर्भातीलही अनेक मुद्दे चर्चेत आहेत. तसेच सोशल मीडिया हा आज राष्ट्रीय मत बनवण्याचे काम करण्यात मोठा हातभार लावत आहे, ही बाब सर्वांनीच विचार करण्याजोगी आहे. एखाद्या मुद्द्यावर देशातील जनमत जाणून घेण्यासाठी पूर्वी बराच काळ सातत्यपूर्ण ... Read More »

पूरग्रस्तांना नुकसान भरपाई वितरण सुरू

>> डिचोली तालुक्यातील ४० जणांना मुख्यमंत्र्यांहस्ते झाले वितरण गणेश चतुर्थीपूर्वी राज्यातील पूरग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यात येईल या गोवा विधानसभेत दिलेल्या आश्‍वासनानुसार सरकारने पूरग्रस्तांना नुकसान भरपाई वितरीत करण्याचे काम कालपासून सुरु केले. काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते डिचोली तालुक्यातील ४० पूरग्रस्तांना नुकसान भरपाईवे वितरण करण्यात आले. डिचोली तालुक्यातील १०५ पूरग्रस्तांना टप्प्या टप्प्याने ही नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. तर ... Read More »

उद्यापर्यंत खाण अवलंबितांना एक लाख द्या; अन्यथा आंदोलन

>> पिळये येथे खाण मंचच्या सभेत सरकारला इशारा राज्यातील खाणी बंद झाल्यामुळे खाण अवलंबितांची रोजीरोटी बंद झाली आहे. गणेश चतुर्थी कशी साजरी करायची हा प्रश्‍न निर्माण झाला असून सरकारने खाण अवलंबितांच्या बँक खात्यात प्रत्येकी एक लाख रुपये २९ ऑगस्टपूर्वी घालावेत, अन्यथा शुक्रवारी ३० रोजी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर खाण अवलंबित धरणे आंदोलन छेडतील असा इशारा गोवा खाण मंचच्या सभेत देण्यात आला. कामगार ... Read More »

आरबीआय : टीकेआधी कॉंग्रेसच्या वित्तमंत्र्यांना विचारायला हवे होते

>> राहूलच्या हल्ल्यावर सीतारमणांची प्रतिक्रिया भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) १ लाख ७६ हजार कोटी रुपयांची रक्कम भारत सरकारकडे हस्तांतरीत केल्याप्रकरणी कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण संतप्त झाल्या आहेत. राहूल गांधी यांनी सदर वक्तव्य करण्याआधी कॉंग्रेसच्या माजी वित्तमंत्र्यांशी चर्चा करायला हवी होती. त्यांच्या ‘त्या’ वक्तव्याला आपण महत्त्व देत नाही अशी टिप्पणी सीतारमण यांनी पत्रकार परिषदेत ... Read More »

पणजीतील वाहतूक कोंडीमुळे नाराजी

राजधानी पणजीतील दुचाकी, चार चाकी वाहनचालक गेल्या काही दिवसांपासून शहरात कोणत्याही वेळी होणार्‍या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त बनले आहेत. मात्र या कोंडीपासून वाहन चालकांना दिवसा देण्याबाबत वाहतूक पोलिसांकडे कोणतीही नियोजनबद्धता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गणेश चतुर्थी ऐन तोंडावर येत असताना पणजीतील वाहनचालकांची डोकेदुखी वाढणार आहे. यावर नियंत्रणासाठी वाहतूक पोलिसांनी गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अष्टमीची फेरी नुकतीच मांडवी ... Read More »

एलईडी पथदीप, रस्ते दुरुस्तीचे आश्‍वासन हवेत विरले ः कॉंग्रेस

गेल्या विधानसभा अधिवेशनात विरोधकांनी राज्यातील दुरवस्था झालेले रस्ते व एलईडी पथदीप पेटत नसल्याने सर्वत्र होणार्‍या अंधाराच्या प्रश्‍नावर आवाज उठवल्यानंतर सरकारने चतुर्थीपूर्वी राज्यभरातील खराब झालेल्या रस्त्यांची डागडुजी करण्याचे व सर्वत्र नवे पथदीप बसवण्याचे आश्‍वासन दिले होते. पण हे आश्वासन हवेतच विरुन गेल्याचा आरोप काल विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी काल पत्रकार परिषदेत केला. चतुर्थी आता दोन दिवसांवर येऊन ठेपलेली असताना ... Read More »

जोकोविच, मेदवेदेवची विजयी सलामी

>> सुमीत नागलने फेडररला झुंजवले युएस ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या पहिल्या दिवशी अव्वल मानांकित नोवाक जोकोविच याने स्पेनच्या रॉबर्टो कार्बेलास बाएना याचा ६-४, ६-१, ६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव करत दुसरी फेरी गाठली. भारताच्या सुमीत नागल याच्याविरुद्ध पहिला सेट गमवावा लागल्यानंतर तृतीय मानांकित रॉजर फेडरर याने स्वतःला सावरत सामना ४-६, ६-१, ६-२, ६-४ असा जिंकत आगेकूच केली. विजयानंतर फेडरर याने सुमीतचे ... Read More »

बुमराहची सातव्या स्थानी झेप

अँटिगा येथे पार पडलेल्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी सामन्यात अप्रतिम कामगिरी करत टीम इंडियाचा गोलंदाज जसप्रीत बुमराहने आयसीसी क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत प्रथमच अव्वल दहा खेळाडूंत स्थान मिळवले आहे. बुमराहने विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील दुसर्‍या डावात पाच बळी मिळवत १६व्या स्थानावरून थेट ७व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. बुमराहच्या खात्यात ७७४ गुण जमा झाले आहेत. वेस्ट इंडीजचा किमार रोच ( + ३, आठवे स्थान) ... Read More »