Daily Archives: August 26, 2019

अनाठायी लुडबूड

संविधानाच्या कलम ३७० खालील विशेषाधिकार हटवले गेल्यापासून तणावाखाली असलेल्या काश्मीर खोर्‍याला भेट द्यायला खास विमानातून गेलेले कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी आणि इतर विरोधी पक्षनेत्यांना श्रीनगर विमानतळावरूनच परत पाठवले गेले. त्यामुळे त्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली व सरकार काश्मीरमधील सद्यस्थिती लपवू पाहात असल्याचा आरोप केला. इतकेच सांगून हे विरोधी नेते थांबले नाहीत तर काश्मीरमधील सध्याची परिस्थिती भयावह असल्याचा आरोप त्यांनी केला. ... Read More »

पराभव चिदंबरम यांचा आणि कॉंग्रेसचाही!

ल. त्र्यं. जोशी ज्या पध्दतीने तपासयंत्रणा विजय मल्ल्‌या, नीरव मोदी, चोकसी मामा आणि आता कार्ती आणि बाबा पी. चिदंबरम यांच्या मुसक्या आवळायला लागलेल्या आहेत, त्यावरुन ही मोहीम आता माध्यमांमधून बाहेर पडली आहे असे म्हणावे लागेल व तीच चिदंबरम प्रकरणाची महत्वाची उपलब्धी आहे. भारताचे संपुआ काळातील गृहमंत्री आणि अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या अटकेच्या निमित्ताने गेल्या आठवड्यात वेगाने घडलेल्या घटना पाहता पंतप्रधान ... Read More »

अरुण जेटली पंचत्वात विलीन

शनिवारी निधन झालेले भारताचे माजी वित्त व संरक्षणमंत्री अरूण जेटली यांच्यावर काल येथील निगमबोध घाट येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्री, विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते विविध राज्यांचे मुख्यमंत्री, जेटली यांचे हजारो चाहते तसेच विदेशी प्रतिनिधीही उपस्थित होते. ६६ वर्षीय जेटली यांचे एम्स ... Read More »

सिंधूचे ऐतिहासिक जगज्जेतेपद :

स्वित्झर्लंड : बीएमएफ विश्‍व बॅडमिंटन स्पर्धेची पहिली विजेती भारतीय खेळाडू ठरण्याची ऐतिहासिक कामगिरी पी. व्ही. सिंधू हिने साकारली आहे. अंतिम लढतीत जपानच्या नोझोमी ओकुहारा हिचा अवघ्या ३६ मिनिटात पराभव करण्याची किमया सिंधूने साधली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधूची कामगिरी देशासाठी अभिमानस्पद आहे अशा शब्दात तिचे अभिनंदन केले आहे. Read More »

जम्मू-काश्मीरातील निर्बंधांना प्रेस कौन्सिलचा पाठिंबा

>> विरोधी याचिकेवर न्यायालयात हस्तक्षेप याचिका जम्मू-काश्मीर सरकारने सध्या संपर्क सुविधांवर घातलेल्या निर्बंधांना प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने पाठिंबा दिला असून या निर्बंधांच्या विरोधातील सर्वोच्च न्यायालयातील एका याचिकेवर हस्तक्षेप याचिका कौन्सिलने सादर केली आहे. काश्मीर टाईम्स दैनिकाच्या कार्यकारी संपादक अनुराधा भसिन यांनी जम्मू-काश्मीरमधील संपर्क सुविधांवरील निर्बंध हटविण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. सरकारने घातलेल्या या निर्बंधांमुळे पत्रकारांच्या व्यावसायिक ... Read More »

राज्यात सरासरीहून २१ टक्के अधिक पावसाची झाली नोंद

मागील चार वर्षे सलग तुटीचा मोसमी पाऊस पडल्यानंतर यंदा केवळ ८६ दिवसात सरासरीपेक्षा २१ टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत १२३.६२ इंच पावसाची नोंद झाली असून मोसमी पावसाचे आणखी ३६ दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे यंदा मोसमी पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार गोव्यात सरासरी पावसाचे प्रमाण साधारण ११७ इंच एवढे धरले जात आहे. राज्यात मागील ... Read More »

अटल सेतूवरील विद्युत कामात मोठ्या घोटाळ्याचा कॉंग्रेसचा पुन्हा आरोप

मांडवी नदीवरील तिसर्‍या पुलाच्या (अटल सेतू ) विद्युत कामात मोठा घोटाळा झाल्याचा पुनरुच्चार गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत काल केला. विद्युत खांब आणि विद्युत सामान खरेदीची बनावट बिले तयार करून गोवा साधन सुविधा विकास महामंडळाला सादर करण्यात आली आहेत. राज्यात भ्रष्टाचाराला थारा देणार नाही अशी घोषणा करणार्‍या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येत्या ८ दिवसात ... Read More »

सिंधू चॅम्पियन

>> विश्‍व अजिंक्यपद स्पर्धेतील भारताचा सुवर्ण दुष्काळ संपवला भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने काल रविवारी विश्‍व बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत जपानच्या नोझोमी ओकुहाराला एकतर्फी लढतीत २१-७, २१-७ असे पराभूत केले. विश्‍व अजिंक्यपदावर मोहोर उमटवणारी सिंधू पहिली भारतीय खेळाडू आहे. सिंधूने चीनची स्टार झांग निंग हिच्या विक्रमाशी बरोबरी साधली. विश्‍व अजिंक्यपद स्पर्धेत निंग हिच्याप्रमाणेच सिंधूने १ सुवर्ण, ... Read More »

स्टोक्सचा मास्टरस्ट्रोक

>> इंग्लंडने केला ३५९ धावांचा यशस्वी पाठलाग >> यजमानांची मालिकेत बरोबरी बेन स्टोक्सच्या धाडसी शतकाच्या जोरावर यजमान इंग्लंडने तिसर्‍या ऍशेस कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा एक गडी राखून पराभव केला. या विजयासह इंग्लंडने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. स्टोक्सने शेवटच्या गड्यासाठी जॅक लिच (१) याच्यासह ७६ धावांची अविभक्त भागीदारी रचली. यात स्टोक्सचा वाटा ७४ धावांचा होता. इंग्लंडने ३५९ धावांचे विक्रमी लक्ष्य १२५.४ ... Read More »

अमृतमहोत्सव ः लिहित्या हाताचा ः कर्त्या माणसाचा

 डॉ. सोमनाथ कोमरपंत  २६ ऑगस्ट २०१९ रोजी डॉ. अनिल अवचट आपल्या कृतिशील जीवनाची ७५ वर्षे पूर्ण करीत आहेत. शुभंकर हातांची देणगी लाभलेल्या डॉ. अवचटांनी अनेक विधायक कार्ये केली… करत आहेत… लिहिणारा हात त्यांना लाभला आहे… आनंदनिर्मितीबरोबरच अंतर्मुख करणे हे त्यांच्या लेखनाचे प्रयोजन… त्यांच्या लेखनातून त्यांचे प्रगल्भ समाजभान व्यक्त झाले आहे… समाजातील निष्क्रियतेवर त्यांनी नेमकेपणाने बोट ठेवले… दुबळ्या समाजघटकांविषयी वाटणारी कणव ... Read More »